स्वतंत्र बैठी वास्तू प्रवेशद्वार दिशा
वास्तुशास्त्राप्रमाणे स्वतंत्र बैठ्या वास्तूमध्ये प्रवेशद्वार व दिशा कोणत्या बाजूस घ्यावी, याबाबत असंख्य वाचकांनी प्रश्न पाठवले आहेत. त्यामुळे त्यावर मार्गदर्शक टिप्स आपण आज जाणून घेऊ. बैठ्या स्वतंत्र वास्तूमध्ये मुख्य प्रवेशद्वार येताना पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण अशा कोणत्या दिशेमध्ये येते आहे, किंबहुना तशीच प्लॉटची रचना असेल तर त्या-त्या दिशासाठी वास्तुशास्त्राप्रमाणे योग्य ठिकाणी प्रवेशद्वार घेण्याबाबत अतिशय सविस्तर मार्गदर्शन शास्त्रात केलेले आहे. प्रत्येक दिशेनुसारची माहिती आपण घेऊ..

व्हॉटसअॅप – 9373913484
पूर्व दिशा
या भागात मुख्य प्रवेशद्वार येत असेल तर पूर्व दिशेकडील वास्तु एरियाचे नऊ समान भागांवर जमिनीवर खुणा कराव्यात. त्यानंतर घराच्या मध्यभागात म्हणजे ब्रह्म तत्वात उभे राहून पूर्वेकडे तोंड करावे. डाव्या बाजूने सुरुवात करून तिसरा चौथ्या अथवा पाचव्या भागात प्रवेश द्वार घ्यावे. या प्रवेशद्वारांना वास्तुशास्त्रात अनुक्रमे जयंत इंद्र पूर्व अशी नावे दिली आहेत. मोठे प्रवेशद्वार हवे असल्यास यातील कोणतेही दोन प्रवेश एकत्र करावे.
दक्षिण दिशा
दक्षिण दिशेकडे मुख्य प्रवेशद्वार येत असल्यास वरील प्रमाणेच जमिनीवर 9 समान भागावर खुणा कराव्यात. दक्षिण दिशेकडे तोंड करून डावीकडून चौथ्या पाचव्या व सहाव्या भागात प्रवेश द्वार घ्यावे. या प्रवेशद्वारांना अनुक्रमे बृहतक्षत यम गंधर्व अशी नावे शास्त्रात आहेत.
पश्चिम दिशा
या दिशेकडे मुख्य प्रवेशद्वारावरील प्रमाणेच या दिशेचे नऊ भागावर वर खुणा करून डाव्या बाजूने तिसरा चौथा व पाचवा भाग प्रवेश द्वारा साठी निवडावा. त्याची अनुक्रमे सुग्रीव पुष्पदंत वरूण अशी नावे आहेत.
उत्तर दिशा
या दिशेला कुबेराची दिशा असे संबोधले आहे. तरी या दिशेचे देखील ९ भाग करून डाव्या बाजूने चौथा व पाचवा मुख्य प्रवेशासाठी घ्यावा… वास्तुशास्त्राप्रमाणे स्वतंत्र वास्तूसाठी प्रवेशद्वारा बाबत निर्णय घेताना चारही दिशा मिळून एकूण 32 समान भागांवर (पद) खुणा कराव्यात. म्हणजे ब्रह्मतत्त्वात उभे राहून योग्य तो भाग प्रवेशद्वारा साठी निवडता येतो. मुख्य प्रवेशद्वार व कंपाऊंड गेट ठरवताना एकमेकांमधील प्रदक्षिणामार्ग साधावा याबाबतचे मार्गदर्शन तज्ञांकडून घ्यावे.