शुक्रवार, डिसेंबर 5, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

वास्तू शंका समाधान – घरात सुखसमृद्धी हवी आहे? हे नक्की करा….

जुलै 31, 2023 | 5:12 am
in इतर
0
Home Flat e1681892298444

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – अतिशय दर्जेदार वृत्तसेवा देणाऱ्या ‘इंडिया दर्पण’च्यावतीने वाचकांच्या आग्रही मागणीस्तव वास्तू शंकासमाधान या सदराद्वारे वाचकांना आता विविध प्रकारचे अचूक मार्गदर्शन मिळत आहे. गृहस्वप्न पूर्ण होणे ही फार मोठी बाब असते. मात्र, कुठली वास्तू घ्यावी, कशी असावी, वास्तूशास्त्र काय सांगते, आपल्या राहत्या घरातील अनेक बाबी कशा असाव्यात, काही समस्या असतील तर त्या कशा दूर कराव्यात आदींविषयी या सदराद्वारे शास्त्रोक्त माहिती दिली जात आहे.

या आठवड्याचा प्रश्न असा
घरातील सुख-समृद्धीसाठी काय करावे, असा प्रश्न सुनयना गायकवाड आणि राजलक्ष्मी सोळंकी यांनी विचारला आहे.

उत्तर असे
वास्तुशास्त्रात आमच्या पूर्वजांनी घऱात शांतता रहाण्यासाठी अनेक उपाय सुचविले आहेत.
१. घरात तयार केलेल्या स्वयंपाकातील प्रत्येक प्रकारचे थोडेसे अन्न एका थाळीत वेगळे काढून हात जोडून वास्तुदेवाला अर्पित केले पाहिजे, त्यानंतर घरच्यांनी जेवण केले पाहिजे. असे केल्याने वास्तुदेवता त्या घरावर नेहमी प्रसन्न राहते. वेगळे ठेवलेले अन्न नंतर गायीला द्यावे.
२. घरात तूटफूट झालेली यंत्रे ठेवू नयेत. ती घराच्या बाहेर काढून द्यायला पाहिजे. जर ती घरात ठेवली तर घऱच्यांना *मानसिक अशांतता* किंवा आजारपणाला तोंड द्यावे लागते.

३.ज्या घरात एका पायाचा पाट असतो, तेथे नेहमी पैशांची चणचण असते. घरातले लोक मानसिक व्याधींनी ‍त्रस्त राहातात. त्यासाठी घरात एका पायाचा पाट ठेवू नये.
४. घरातल्या केरसुणी (झाडू) कधीही उभी ठेवू नये. जेथे पाय लागतील किंवा ओलांडावे लागेल, अशा ठिकाणीही केरसुणी ठेवू नका. तशी ठेवल्यास घरात पैसा टिकत नाही.

५. घरातल्या देवालयात तीन गणपती ठेवू नका. जर असेल तर त्यातील एकाला विसर्जित करून द्या किंवा दुसर्‍या ठिकाणी ठेवून द्या. तीन गणपती असतील तर त्या घरात कायमची अशांती राहते. त्या प्रकारे 3 देवींना किंवा 2 शंखांसुद्धा एकत्र पूजाघरात ठेवणे वर्जित आहे.
६.घरातल्या ईशान्य भागात कोणताही पाळीव पशू ठेवू नका. कुत्रे, कोंबडे व म्हैस यांच्या बाबतीत सावधगिरी बाळगली पाहिजे. अन्यथा घरात अशांती पसरते.

७.प्रत्येक घरात तुळस, सीताफळ, अशोक, आवळा, हरश्रृंगार, अमलतास, निरगुडी या पैकी किमान 2 झाडे अवश्य लावावीत. या झाडांमुळे घरात सुख शांती नांदते.
८.घरात नेमाने देवाचे पूजन करावे. पूजा करणार्‍या व्यक्तीचे तोंड सदैव पूर्व किंवा उत्तरेकडे असावे. घरात दररोज तूपाचा दिवा लावावा.

९.घराच्या प्रत्येक खोलीचे दिवे एकाच वेळी लावावे. अर्थात प्रत्येक खोलीत प्रकाश पडणे आवश्यक आहे.
वरील उपाय केले तर घरातील व्याधी दूर होऊन घरातल्यांना सुख शांती मिळेल व त्यांचा भाग्योदयसुद्धा लवकरच होईल.

वास्तूविषयी आपले प्रश्न या नंबरवर व्हॉटसअॅप करावेत
ज्यो. प्रशांत सुधाकर चौधरी, नाशिक
ज्योतिष व वास्तू अभ्यासक
मो. – 9850281917
वरील नंबरवर कॉल करु नये. आपले प्रश्न फक्त व्हॉटसअॅप करावेत. आपले पूर्ण नाव आणि पत्ताही द्यावा. आपल्या प्रश्नांना इंडिया दर्पण शंकासमाधान या सदरामध्येच उत्तर दिले जाईल.

वास्तू तज्ज्ञ प्रशांत चौधरी यांच्याविषयी…
वास्तू तज्ज्ञ आणि ज्योतिषाचार्य प्रशांत सुधाकर चौधरी हे या सदराद्वारे वाचकांना मार्गदर्शन करणार आहेत. गेल्या २१ वर्षांपासून ते ज्योतिष आणि वास्तूशास्त्र क्षेत्रात कार्यरत आहेत. ज्योतिष भूषण आणि वास्तू विशारद या पदवी त्यांनी संपादित केल्या आहेत. त्याशिवाय ते गृहरक्षक दलातही सेवा बजावत आहेत. नाशिकच्या ज्योतिष अभ्यास मंडळात ते शिक्षक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. वैवाहिक, घरगुती समस्या,अडचणी समुपदेशक म्हणूनही त्यांचा नावलौकिक आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जनकल्याण समितीत ते जनकल्याण रुग्नोपयोगी साहित्य केंद्राचे सहप्रमुख आहेत. त्याशिवाय नाट्य कला क्षेत्रात नैपथ्यकार, लहान व तरुण मुलांनमध्ये संस्कार वर्ग आयोजन, भारतीय संस्कृतीचा प्रचार-प्रसार यात त्यांचे योगदान उल्लेखनीय आहे. सिंहस्थ कुंभमेळ्यात केलेल्या विशेष कामगिरीबद्दल त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला आहे. पोलिस अधिक्षक ग्रामीण यांच्याकडूनही त्यांचा अनेकवेळा सन्मान झाला आहे. “कोरोनायोद्धा” म्हणूनही त्यांना गौरविण्यात आले आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

मला आतल्या खोलीत नेलं अन्…. अभिनेत्री उर्मिला निंबाळकरने सांगितला ऑडिशनचा तो भयानक अनुभव

Next Post

आमदार, खासदार माजी होतात, पण कार्यकर्ता… नितीन गडकरींनी स्पष्टच सांगून टाकलं…

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा शुक्रवारचा दिवस… जाणून घ्या, १४ नोव्हेंबरचे राशिभविष्य…

नोव्हेंबर 13, 2025
Vishwadharmi Manavta Teertha Rameshwar Rui
महत्त्वाच्या बातम्या

उध्वस्त मंदिर व मशिदीच्या जागी ‘विश्वधर्मी मानवतातीर्थ भवन’… उद्या होणार लोकार्पण… अशी आहेत त्याची वैशिष्ट्ये…

नोव्हेंबर 13, 2025
traffic signal1
महत्त्वाच्या बातम्या

अहिल्यानगर – मनमाड मार्गावरील वाहतुकीबाबत झाला हा महत्वाचा निर्णय…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0024
मुख्य बातमी

कुंभमेळ्यासाठी साडेपाच हजार कोटी रुपये खर्चाच्या विकासकामांचे भूमीपूजन…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0023
महत्त्वाच्या बातम्या

पंचवटीतील रामकाल पथचे मुख्यमंत्र्यांनी केले भूमीपूजन… रामकुंडाचा चेहरामोहरा बदलणार…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0021
महत्त्वाच्या बातम्या

नाशिक जिल्हा परिषदेच्या नूतन इमारतीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण… अशी आहेत तिची वैशिष्ट्ये…

नोव्हेंबर 13, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा गुरुवारचा दिवस… जाणून घ्या, १३ नोव्हेंबरचे राशिभविष्य…

नोव्हेंबर 12, 2025
thandi
महत्त्वाच्या बातम्या

या शहरात तीव्र थंडीची लाट… असा आहे हवामानाचा अंदाज…

नोव्हेंबर 12, 2025
Next Post
DSC 4796 01 e1690731200110

आमदार, खासदार माजी होतात, पण कार्यकर्ता... नितीन गडकरींनी स्पष्टच सांगून टाकलं...

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011