इंडिया दर्पण विशेष
– वास्तू शंका समाधान –
घरातील कर्त्या पुरुषाने
‘त्या’ रुममध्ये राहू नये
इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – अतिशय दर्जेदार वृत्तसेवा देणाऱ्या ‘इंडिया दर्पण’च्यावतीने वाचकांच्या आग्रही मागणीस्तव वास्तू शंकासमाधान या सदराद्वारे वाचकांना आता विविध प्रकारचे अचूक मार्गदर्शन मिळत आहे. गृहस्वप्न पूर्ण होणे ही फार मोठी बाब असते. मात्र, कुठली वास्तू घ्यावी, कशी असावी, वास्तूशास्त्र काय सांगते, आपल्या राहत्या घरातील अनेक बाबी कशा असाव्यात, काही समस्या असतील तर त्या कशा दूर कराव्यात आदींविषयी या सदराद्वारे शास्त्रोक्त माहिती दिली जात आहे.
या आठवड्याचा प्रश्न असा
अनेक ज्योतिषप्रेमींनी प्रश्न विचारला आहे की, घरात किचन आणि बेडरुम कुठे असावा
उत्तर असे
आपल्या घराचा ईशान्य कोपऱ्यात टॉयलेट असू नये. त्याचप्रमाणे तिथे खोली काढल्यास तिथे घरातील कर्त्या पुरुषांनी राहू नये. ती रूम लहान मुलांना, घरातील ज्येष्ठ मंडळी यांना वापरायला द्यावी. ईशान्य कोपऱ्यामध्ये किचन असू नये. पाण्याची टाकी असू नये. जमिनीखाली असेल तर चालते. तसेच स्टोअर रूम किंवा जिना ठेवू नये. कर्त्या पुरुषाचा बेडरूम नसावा. ईशान्य कोपरा शक्यतो वाढलेला किंवा कमी झालेला असा नसावा. ईशान्य कोपऱ्यामध्ये जड वस्तू कोठ्या, कपाटे इत्यादी भंगार सामान ठेवू नये. शक्यतो ईशान्य कोपरा जो आहे तो स्वच्छ व नीटनेटका असावा. तिथे देवघर असल्यास अति उत्तम.
वास्तूविषयी आपले प्रश्न या नंबरवर व्हॉटसअॅप करावेत
ज्यो. प्रशांत सुधाकर चौधरी, नाशिक
ज्योतिष व वास्तू अभ्यासक
मो. – 9850281917
वरील नंबरवर कॉल करु नये. आपले प्रश्न फक्त व्हॉटसअॅप करावेत. आपले पूर्ण नाव आणि पत्ताही द्यावा. आपल्या प्रश्नांना इंडिया दर्पण शंकासमाधान या सदरामध्येच उत्तर दिले जाईल.
वास्तू तज्ज्ञ प्रशांत चौधरी यांच्याविषयी…
वास्तू तज्ज्ञ आणि ज्योतिषाचार्य प्रशांत सुधाकर चौधरी हे या सदराद्वारे वाचकांना मार्गदर्शन करणार आहेत. गेल्या २१ वर्षांपासून ते ज्योतिष आणि वास्तूशास्त्र क्षेत्रात कार्यरत आहेत. ज्योतिष भूषण आणि वास्तू विशारद या पदवी त्यांनी संपादित केल्या आहेत. त्याशिवाय ते गृहरक्षक दलातही सेवा बजावत आहेत. नाशिकच्या ज्योतिष अभ्यास मंडळात ते शिक्षक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. वैवाहिक, घरगुती समस्या,अडचणी समुपदेशक म्हणूनही त्यांचा नावलौकिक आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जनकल्याण समितीत ते जनकल्याण रुग्नोपयोगी साहित्य केंद्राचे सहप्रमुख आहेत. त्याशिवाय नाट्य कला क्षेत्रात नैपथ्यकार, लहान व तरुण मुलांनमध्ये संस्कार वर्ग आयोजन, भारतीय संस्कृतीचा प्रचार-प्रसार यात त्यांचे योगदान उल्लेखनीय आहे. सिंहस्थ कुंभमेळ्यात केलेल्या विशेष कामगिरीबद्दल त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला आहे. पोलिस अधिक्षक ग्रामीण यांच्याकडूनही त्यांचा अनेकवेळा सन्मान झाला आहे. “कोरोनायोद्धा” म्हणूनही त्यांना गौरविण्यात आले आहे.
Vastu Shanka Samadhan Home Gents Room by Prashant Chaudhari