इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – अतिशय दर्जेदार वृत्तसेवा देणाऱ्या इंडिया दर्पणच्यावतीने वाचकांच्या आग्रही मागणीस्तव नवे सदर सुरू करण्यात आले आहे. वास्तू शंकासमाधान या सदराद्वारे वाचकांना विविध प्रकारचे अचूक मार्गदर्शन मिळणार आहे. गृहस्वप्न पूर्ण होणे ही फार मोठी बाब असते. मात्र, कुठली वास्तू घ्यावी, कशी असावी, वास्तूशास्त्र काय सांगते, आपल्या राहत्या घरातील अनेक बाबी कशा असाव्यात, काही समस्या असतील तर त्या कशा दूर कराव्यात आदींविषयी आता शास्त्रोक्त माहिती दिली जाणार आहे. वास्तू तज्ज्ञ आणि ज्योतिषाचार्य प्रशांत सुधाकर चौधरी हे या सदराद्वारे वाचकांना मार्गदर्शन करीत आहेत.
या आठवड्याचा प्रश्न असा
श्री. दीपक, श्री. सचिन, श्री. श्लोक, श्री. नकुल व श्री वाईकर यांनी देवघराबाबत प्रश्न विचारला आहे.
उत्तर असे – देवघर हे आपल्या घरात च्या ईशान्य दिशेत असणे केव्हाही चांगले. त्याचप्रमाणे उत्तर दिशेला, वायव्य दिशेला, ईशान्य दिशेला, पूर्व दिशेला व पश्चिम दिशेला सुद्धा देवघर चालू शकते.
देवघराची रचना
अशी असावी की देवांचे मुख हे नेहमी पश्चिमेकडील व आपले मुख पूर्वेकडे किंवा देवांचे मुख हे पूर्वेकडे व आपले मुख पश्चिमेकडे येईल. याप्रमाणे रचना ठेवावी.
हे कायम लक्षात असू द्या
जिन्याच्या खाली कधीही देवघर ठेवू नये.
दक्षिण दिशेला देवघर ठेवून पूजा करू नये.
पूजा घर हे नेहमी स्वच्छ व नीटनेटके असावे. यामुळे घरातली पॉझिटिव्हिटी नेहमी चांगली राहते.
देवघरामध्ये जास्त फोटो, पुस्तके, एकाच प्रकारच्या दोन किंवा तीन मुर्ती असू नयेत.
देवघरामध्ये शक्यतो गणेश मूर्ती, बालकृष्ण मूर्ती, अन्नपूर्णा मूर्ती, महादेवाची पिंड तसेच आपली इष्टदेवता (आपली ज्या देवतेवर जास्त श्रद्धा आहे ती देवता), विठ्ठल रुक्माई, दत्त महाराज अशा ठराविक मूर्ती असाव्यात.
पूजा झाल्यानंतर घरामध्ये रोज सकाळ-संध्याकाळ कापूर नक्की फिरवावा.
वास्तूविषयी आपले प्रश्न या नंबरवर व्हॉटसअॅप करावेत
ज्यो. प्रशांत सुधाकर चौधरी, नाशिक
ज्योतिष व वास्तू अभ्यासक
मो. – 9850281917
वरील नंबरवर कॉल करु नये. आपले प्रश्न फक्त व्हॉटसअॅप करावेत. आपले पूर्ण नाव आणि पत्ताही द्यावा. आपल्या प्रश्नांना इंडिया दर्पण शंकासमाधान या सदरामध्येच उत्तर दिले जाईल.
वास्तू अभ्यासक प्रशांत चौधरी यांच्याविषयी
गेल्या २१ वर्षांपासून ते ज्योतिष आणि वास्तूशास्त्र क्षेत्रात कार्यरत आहेत. ज्योतिष भूषण आणि वास्तू विशारद या पदवी त्यांनी संपादित केल्या आहेत. त्याशिवाय ते गृहरक्षक दलातही सेवा बजावत आहेत. नाशिकच्या ज्योतिष अभ्यास मंडळात ते शिक्षक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. वैवाहिक, घरगुती समस्या,अडचणी समुपदेशक म्हणूनही त्यांचा नावलौकिक आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जनकल्याण समितीत ते जनकल्याण रुग्नोपयोगी साहित्य केंद्राचे सहप्रमुख आहेत. त्याशिवाय नाट्य कला क्षेत्रात नैपथ्यकार, लहान व तरुण मुलांनमध्ये संस्कार वर्ग आयोजन, भारतीय संस्कृतीचा प्रचार-प्रसार यात त्यांचे योगदान उल्लेखनीय आहे. सिंहस्थ कुंभमेळ्यात केलेल्या विशेष कामगिरीबद्दल त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला आहे. पोलिस अधिक्षक ग्रामीण यांच्याकडूनही त्यांचा अनेकवेळा सन्मान झाला आहे. “कोरोनायोद्धा” म्हणूनही त्यांना गौरविण्यात आले आहे.