गुरूवार, नोव्हेंबर 6, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

नाशिक : ज्येष्ठ सर्वोदयी कार्यकर्त्या वासंती सोर यांचे निधन

जुलै 19, 2021 | 12:15 pm
in स्थानिक बातम्या
0
20210719 121422

 

नाशिक : येथील ज्येष्ठ सर्वोदयी कार्यकर्त्या वासंती सोर यांचे, रविवारी, १८ जुलै रोजी रात्री नाशिक येथील राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले.  त्या ८५ वर्षांच्या होत्या. त्यांना गांधी-विनोबांचा त्यांना सहवास लाभला होता. त्या ज्येष्ठ  विचारवंत, सामाजिक कार्यकर्त्या, लेखिका आणि शिक्षणतज्ज्ञ म्हणून परिचित होत्या. विनोबांच्या वर्धा येथील ‘महिलाश्रमा’त त्यांचे बालपण व प्राथमिक शिक्षण झाले. विनोबांच्या भूदान यात्रेतही त्या वर्धा व गया (बिहार) येथे सहभागी झाल्या होत्या. त्यांच्या पश्चात दोन मुले तुषार आणि तरंग, सुना गीता आणि सायली आणि नात तेजस्विनी असा परिवार आहे. नाशिकमधील सर्वोदय आणि जीवनउत्सव परिवाराच्या त्या आधारस्तंभ होत्या. त्यांच्यावर सोमवारी भावपूर्ण वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

गांधी व विनोबा हा त्यांच्या अभ्यासाचा व चिंतनाचा विषय होता. या विषयांवर त्यांची बारा पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. ‘गांधी विचार व राष्ट्रीय एकात्मता’ या विषयाचा एम्एचा अभ्यासक्रम त्यांनी तयार केला होता. दूरदर्शनवर ‘विनोबा आणि गीताई’यावर त्यांची दोन भागात मुलाखतही प्रसारित झाली होती. खादी हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय होता. आयुष्यभर त्यांनी स्वतः कातलेल्या सुताचेच वस्त्र वापरले. ‘सूत-कताई मंडळ’ स्थापून, त्याद्वारे त्यांनी शास्त्रशुद्ध  सूतकताई वर्ग चालवले. जुन्या पिढीतील निष्ठावंत कार्यकर्ते स्वातंत्र सैनिक मालतीताई थत्ते व श्रीधर उर्फ काका थत्ते यांच्या तेवढ्याच निष्ठावंत कन्या प्रा. वासंती सोर या महात्मा गांधींजींनी स्थापन केलेल्या आणि आचार्य विनोबाजी भावे यांच्या मार्गदर्शनाखाली चालणाऱ्या वर्धा येथील महिलाश्रमात लहानाच्या मोठ्या झाल्या.

विनोबाजींच्या सानिध्यात शिकण्याचे भाग्य त्यांना लाभले होते. त्याच ठिकाणी त्यांनी ६ वर्षे अध्यापनाचेही काम केले. विनोबाजींच्या भूदान पदयात्रेत काही काळ त्यांच्या सहभाग होता. महात्मा गांधीजींच्या मांडीवर बसण्याचे भाग्य लाभल्याचे त्या अभिमानाने सांगत. तसेच जन्मापासून अंगाला खादी शिवाय दुसऱ्या वस्त्राचा स्पर्श ही न झाल्याचा उल्लेख ही त्या नेहमी करत. आयुष्यभर स्वतः काताई केलेल्या खादीचे वस्त्र आणि कपडे वापरण्याचे व्रत त्यांनी जपले होते. लौकिक अर्थाने त्या एम. ए. (हिंदी) एम. एड. झाल्या व नाशिकच्या बी. एड. कॉलेजमध्ये अनेक वर्ष अध्यापनाचे काम केले. त्याच कॉलेजच्या प्राचार्य म्हणून त्या निवृत्त झाल्या. निवृत्तीनंतर त्या पूर्णपणे सामाजिक जीवनात कार्यरत झाल्या. तसेच सर्वोदय विचार, स्त्री शक्ती जागरण, खादी, गीता या विषयांवर अभ्यासपूर्ण लिखाण त्यांनी केले. याच सर्व विषयांवर अनेक व्याख्यानेही त्या देत असत. एम.ए. साठी ‘गांधी विचार आणि राष्ट्रीय एकात्मता’ या विषयाचा अभ्यासक्रम त्यांनी तयार केला होता.

मुक्त विद्यापीठाचा बी.एड. अभ्यासक्रम, बी.एड.साठी ऑडीओ कॅसेट बी.एड. प्रश्नपेढी यांची निर्मिती त्यांनी केली होती. वयाच्या ८५ वर्षापर्यंत ही त्या पूर्ण कार्यरत होत्या. खादी आणि वस्त्र स्वावलंबन हा त्यांचा दुसरा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय. त्या स्वतः तर रोज सूत कताई करतच, पण नाशिकमध्ये त्यांनी एक कताई मंडळ स्थापन केले होते. त्या कोणालाही अगदी आवडीने आणि मेहनतीने शास्त्र शुद्ध सूत कताई आणि चरखा शिकवत असत. नाशिकच्या महिला हक्क संरक्षण समितीच्या कार्यात त्यांच्या सक्रीय सहभाग असे. १९८८ ते ९० या काळात समाजवादी महिला सभेच्या नाशिक शाखेच्या त्या अध्यक्षाही होत्या. सर्वोदय प्रेस सर्व्हिसच्या त्या ४ वर्षे सहसंपादक होत्या. नाशिकच्या जीवन उत्सव या पर्यावरणीय जीवन शैली व गांधी विचारावर काम करणाऱ्या उपक्रमाच्या त्या आधारस्तंभ होत्या. त्या अंतर्गत होणाऱ्या सगळ्या कार्यक्रमांमध्ये त्यांचा सहभाग तरुणांनाही लाजवणारा असे. सर्व कार्यकर्त्यांवर अत्यंत आपुलकीने मातृवत प्रेम त्यांनी केले.स्वतःचा जीवन प्रवास समस्यामय असूनही त्यांनी कधी ही त्याचे प्रदर्शन, तर केले नाहीच पण सर्व समस्यांना खंबीरपणे तोंड देऊन त्या स्वतः सदैव हसतमुख असत. त्यांच्या जाण्याने गांधी आणि सर्वोदय परिवाराची कधीही न भरून येणारी हानी झाली असून जीवन उत्सव परिवार पोरका झाल्याची भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

इंजिनिअरींगच्या या विद्यार्थ्याला गुगलने दिले तब्बल ३१.६ लाखांचे पॅकेज; कोण आहे तो?

Next Post

बनावट शैक्षणिक प्रमाणपत्रे रोखण्यासाठी आता ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा वापर होणार

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

bath tub
महत्त्वाच्या बातम्या

अतिशय दुर्दैवी… गरम पाण्याच्या टबमध्ये पडून बालिकेचा मृत्यू…

नोव्हेंबर 6, 2025
575211735 10239725133169293 595243740486033833 n
महत्त्वाच्या बातम्या

टाटा मोटर्सची विश्वविजेत्या महिला संघाला मोठी भेट

नोव्हेंबर 6, 2025
thandi
महत्त्वाच्या बातम्या

पाऊस पुन्हा येणार का? थंडी कधीपासून लागणार?

नोव्हेंबर 6, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा शुक्रवारचा दिवस… जाणून घ्या, ७ नोव्हेंबरचे राशिभविष्य…

नोव्हेंबर 6, 2025
rohit pawar
इतर

डोनाल्ड ट्रम्प यांचे खोटे आधारकार्ड बनविले… आमदार रोहित पवार अडचणीत…

ऑक्टोबर 29, 2025
post
महत्त्वाच्या बातम्या

नाशिक, धुळे,जळगाव आणि नंदुरबार जिल्ह्यातील पोस्ट पार्सल सुविधेबाबत मोठा निर्णय… मिळणार हा फायदा…

ऑक्टोबर 29, 2025
IMG 20251029 WA0033
महत्त्वाच्या बातम्या

नाशिकमध्ये रंगणार एमआरएफ सुपरक्रॉस स्पर्धेचा थरार…

ऑक्टोबर 29, 2025
salher
मुख्य बातमी

साल्हेर किल्ल्यावर साकारले जाणार हे केंद्र… तब्बल ५ कोटींचा निधी मंजूर…

ऑक्टोबर 29, 2025
Next Post
nabab malik

बनावट शैक्षणिक प्रमाणपत्रे रोखण्यासाठी आता ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा वापर होणार

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011