विशेष प्रतिनिधी, नाशिक
अवघ्या साडेनऊ महिन्यांमध्येच तब्बल ४६ लाख दर्शकांचा टप्पा गाठणा-या इंडिया दर्पण वेब न्यूज पोर्टलची यशोगाथा आणि माध्यमांसमोरील नवं-नवीन आव्हाने याचा उलगडा आज सायंकाळी होणार आहे. नाशिकला प्रदीर्घ परंपरा असलेल्या वसंत व्याख्यानमालेच्या डिजीटल रुपात इंडिया दर्पणचे संपादक गौतम संचेती हे आजचे पुष्प गुंफणार आहेत. आज सायंकाळी ७.१० वाजता या व्याख्यानाचे थेट प्रसारण होणार आहे. स्व. माधवराव लिमये स्मृतिप्रीत्यर्थ असलेल्या या व्याख्यानात संचेती हे २० वे पुष्प गुंफणार आहेत.
वर्तमानपत्रे आणि न्यूज चॅनल्ससमोर सामाजिक माध्यमांनी उभे केलेले आव्हान, तसेच जिल्ह्यात स्थानिक तसेच राज्यस्तरीय प्रसारमाध्यमांमध्ये आलेले अनुभव विषद करणार आहेत. कोरोना काळात अनेक स्थित्यंतरे वर्तमानपत्रांवर झाले आहेत, उद्योग व्यवसाय बंद असल्याने त्याचा परिणाम जाहिरातींवर अर्थात उत्पन्नावर झाला. परिणामी अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. त्यात सामाजिक माध्यमांचे आक्रमण, परिणामी प्रसिद्धीचा चेहरा बदलला आहे, खपाचे आकडे फुगवले जात आहेत, शासकीय जाहिराती हा खळगा भरून काढू शकत नाहीत, वर्तमानपत्राचा मुख्य स्तंभ पत्रकार असून, त्याच्यावर होणारा आघात अशा विविध मुद्द्यांवर या व्याख्यानात प्रकाश टाकला जाणार आहे. या व्याख्यानाचा लाभ सर्वांनी घ्यावा, असे आवाहन व्याख्यानमालेचे अध्यक्ष श्रीकांत बेणी व चिटणीस संगीता बाफणा यांनी केले आहे.
वसंत व्याख्यानमाला (डिजिटल)
स्व. माधवराव लिमये स्मृती व्याख्यान
वक्ते :- श्री. गौतम संचेती, संचालक, इंडिया दर्पण नाशिक*
विषय :- *प्रसिद्धी माध्यमांपुढील नव-नविन आव्हाने*
प्रक्षेपण :- गुरूवार २० मे २०२१ सायंकाळी ७.१० वाजता
साईलीला TV
*नाशिक-अहमदनगर जिल्हा*
DEN Digital Network Channel No. 824
*नाशिक जिल्हा*
RAINBOW Digital Network Channel No. 014
*मुंबई*
IN Digital Network Channel No. 989
*रायगड जिल्हा*
S. S. Digital Network Channel No. 1002
*औरंगाबाद जिल्हा*
9 Vision Digital Network Channel No. 137
– पुनःप्रक्षेपण शुक्रवार दि. 21 मे सकाळी 11:00 वाजता.