नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक मध्य विधानसभा मतदार संघात महाविकास आघाडीतर्फे ठाकरे गटाचे माजी आमदार वसंत गीते यांना उमेदवारी निश्चित झाली असून त्यांना एबी फार्मही मिळाला आहे. महाविकास आघाडीची अधिकृत घोषणा होण्याअगोदर ठाकरे गटाने एबी फार्म देण्यास सुरुवात केली. हा एबी फार्म गीते यांना सुध्दा मिळाला आहे. त्यामुळे नाशिक पश्चिमधून सुधाकर बडगुजर व मध्य मधून वसंत गीते हे दोन उमेदवार असणार आहे. तर नाशिक पूर्वची जागा राष्ट्रवादीला जाणार आहे.
नाशिक मध्यच्या जागेवर तिढा असतांना वसंत गीते यांनी कालच प्रचाराला सुरुवात केली होती. त्यांनी काल काठे गल्ली, माणेकशा नगर येथे मतदारांच्या भेटी घेऊन संवाद साधला. नाशिक मध्य मध्ये महाविकास आघाडीतर्फे काँग्रेसने या जागेसाठी आग्रह धरला होता. गेल्या वेळी या मतदार संघातून डॅा. हेमतला पाटील या उमेदवार होत्या.
महायुतीचा उमेदवार वेटींगवर
या मतदार संघातून महायुतीतर्फे भाजपच्या विद्यमान आमदार देवयानी फरांदे यांना पुन्हा उमेदवारी मिळेल असे बोलले जात होते. पण, भाजपच्या पहिल्या यादीत त्यांचे नाव आले नाही. त्यामुळे त्यांनी थेट समर्थक नगरसेवकांसह मुंबईत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या जागेवर महायुतीतही तिढा आहे. शिवसेना शिंदे गटाने ही जागा आपल्याला सुटावी यासाठी आग्रह धरला आहे. ही जागा शिंदे गटाला सुटली तर या जागेवर कोण उमेदवार असेल हे अद्याप निश्चित नाही.
यांनाही मिळाले एबी फार्म
नाशिक मध्य – वसंत गीते
नाशिक पश्चिम – सुधाकर बडगुजर
मालेगाव बाह्य – अव्दैय हिरे
निफाड –
नांदगाव – गणेश धात्रक
येवला – …..
सोशल मीडियावर फिरत आहे ही पोस्ट