मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – दिवाळी म्हटले की, फटाके आलेच फटाके फोडताना दरवर्षी आगीच्या देखील घटना घडतात. यंदा देखील राज्यभरात अनेक ठिकाणी असाच प्रकार घडला. राज्यभरात सोमवार, दि. २४ ऑक्टोबर उत्साहात लक्ष्मीपूजन पार पडल्यानंतर याच दिवशी फटाक्यांची आतिषबाजी करताना वसई मध्ये आगीच्या सहा घटना घडल्या आहेत. सुदैवाने यात जिवीतहानी झालेली नाही.
एकट्या विरारमध्ये फटाक्यांच्या ठिणगीमुळे ३ ठिकाणी आग लागल्याच्या घटना घडल्या होत्या. विरार पूर्वेच्या गोपचर पाडा येथे कापसाच्या गाळ्याला फटाक्याची ठिणगी लागून आग लागली, यात गोदामातील संपूर्ण कापूस जळून खाक झाला. विरार पूर्वेच्या मोहक सिटी येथे बांबूच्या स्टोरेजला रॉकेटची ठिणगी पडून आग लागली होती. तर विरारमधील नवापूर येथे ही रॉकेटच्या ठिणगीमुळे नारळाच्या झाडाला आग लागली होती. मात्र वसई विरार अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचत आग नियंत्रणात आणली.
वसई पश्चिममधील अंबाडी रोड येथे सत्यम बंगल्यात घरातील एसीने अचानक पेट घेतला. मात्र फटाक्यांची दुकाने आणि अग्निशमन केंद्राच्या कर्मचा-यांनी तातडीने धाव घेत मोठी दुर्घटना होण्यापासून वाचवले. आगीची ही घटना घरातील सीसीटीवी कॅमेऱ्यात कैद झाली आहे. विरार पूर्वेच्या गोपचर पाडा येथे कापसाच्या गाळ्याला फटाक्याची ठिणगी लागून आग लागली. गोदामातील संपूर्ण कापूस जळून खाक झाला. विरार पूर्वेच्या मोहक सिटी येथे इमारतीच्या कन्स्ट्रक्शनसाठी वापरण्यात येणाऱ्या बांबूच्या स्टोरेजला रॉकेटची ठिणगी पडून आग लागली. विरार पश्चिमेच्या नवापूर येथे ही रॉकेटच्या ठिणगीमुळे एका नारळाच्या झाडाला आग लागली.
वसई पूर्वेकडील वसई फाटा येथील एका चप्पल गोदामाला भीषण आग लागली . रात्री १०.३० च्या सुमारास ही आग लागली. तीन तासांच्या अथक प्रयत्नानंतर आग विझविण्यात आली. अग्निशमन दलाच्या तीन गाड्या, ७ टॅंकर, २ अधिकारी आणि १६ अग्निशमन दलाच्या जवानांच्या सहाय्याने ही आग विझविण्यात आली. आगीत कुठलीही जीवित हानी झाली नाही. मात्र, सामानाचे अतोनात नुकसान झाले. नायगांवच्या टिवरी येथे नक्षत्र प्रिमायसेस या टॅावरमधील ११ व्या मजल्यावर एका घराला रॅाकेटमुळे आग लागली. वसई विरार पालिकेच्या अग्निशमन दलाकडून त्वरीत आग विझवण्यात आली. मात्र घराच थोडं नुकसान झाले आहे.
Vasai Firecrackers Accident Fire 6 Places