पालघर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गेल्या काही दिवसांमध्ये मुंबई, ठाणे आणि परिसरातील उपनगरांमध्ये गुन्हेगारीच्या आणि घटना घडत आहेत. विशेष म्हणजे यात तरुणी आणि महिला प्रमाणेच लहान बालिका देखील बळी पडत आहेत. असाच एक भयानक व धक्कादायक प्रकार वसई मध्ये घडला. एका शाळेत स्वयंपाक म्हणून काम करणाऱ्या एका कामगाराने एका निरागस व लहान या बालिकेवर लैंगिक अत्याचार केले. या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे.
सात वर्षीय बालिका
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, वसई शहरात एक धक्कदायक घटना घडली आहे. सात वर्षीय मुलीला खाऊ देण्याचे आमिष दाखवून तिच्यावर लैगिंक अत्याचार केल्याची घटना घडली आहे. पीडित मुलगी शाळेत शिक्षण घेते. याच शाळेत मौर्य हा स्वंयपाकी म्हणून काम करतो. तो मुलीकडे खाऊसाठी रोज पैसे देत असे. आपण मुलीला इतके पैसे देत नाही, मग तिच्याकडे इतके पैसे येतात कुठून? असा प्रश्न पीडित मुलीच्या पालकांना पडला. त्यांनी याबाबत तिच्या मित्र-मैत्रीण आणि शाळेत विचारपूस करण्याचे ठरवले. यानंतर पालक पीडित मुलीसोबत शाळेत आले. तेव्हा त्यांना एक धक्कादायक माहिती मिळाली.
जमावाने दिला चोप
याच शाळेत स्वयंपाकी म्हणून काम करत असलेला मौर्य हा मुलीला रोज खाऊसाठी पैसे देत होता. खाऊसाठी पैसे देत असताना हा विकृत इसम रोज या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करत होता. मुलीसोबत घडलेल्या घटनेची माहिती मिळाल्यानंतर इतर विद्यार्थ्यांचे पालक देखील मोठ्या संख्येने शाळेत जमले. सर्वजण खूपच संतप्त झाले. यावेळी संतप्त जमावाने मौर्यला चांगलाच चोप दिला. याची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले, अखेर त्यांनी जमावाला शांत करत आरोपीला ताब्यात घेतले. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत. या आरोपीला कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी संत पालकांनी केली आहे
Vasai Crime Girl Sexual Abuse School Cook Police