नवी दिल्ली – भाजपचे ज्येष्ठ नेते वरुण गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्यासह भाजपला जोरदार टोला दिला आहे. गांधी हे भाजपमध्ये नाराज आहेत. त्यांना सातत्याने डावलले जात आहे. लखीमपूर खेरी येथे शेतकऱ्यांवर झालेल्या हल्ल्यानंतर गांधी यांनी भाजपला चांगलेच लक्ष्य करण्याचे काम सुरू केले आहे. आता त्यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते, माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांचा एक व्हिडिओ प्रसारीत केला आहे. १९८० मधील हा व्हिडिओ आहे. एका सभेत अटलजी बोलत आहेत. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर अटलजींनी इंदिरा गांधी यांना मोठा इशारा दिला होता. या व्हिडिओतून आताच्या भाजपकर्त्यांनी योग्य तो बोध घ्यावा असेच वरुण यांना सूचवायचे आहे. त्यामुळे या व्हिडिओची सध्या मोठी चर्चा होत आहे. बघा हा व्हिडिओ
https://twitter.com/varungandhi80/status/1448533046148231169