नवी दिल्ली – खासदार वरुण गांधी आणि मेनका गांधी या दोघांनाही भाजपच्या नवीन राष्ट्रीय कार्यकारिणीत स्थान देण्यात आलेले नाही. त्यामुळे वरुण गांधी आणि पक्ष नेते यांच्यातील अंतर वाढू लागले आहे. यापूर्वी पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस असलेले वरुण यांना पक्षात अनेक दिवसांपासून दुर्लक्षित केले जात आहे. सध्या त्यांना पक्षाच्या कार्यकारिणी महत्त्वाचे स्थान मिळाले नाही, तसेच केंद्र सरकारमध्ये स्थान मिळलेले नाही, त्यामुळे ते आणि त्यांच्या मातोश्री मनेका गांधी हे काँग्रेसमध्ये जातात की काय अशी चर्चा सध्या सुरू आहे.
सध्या लखीमपूर खेरीची घटना आणि भाजपच्या नवीन राष्ट्रीय कार्यकारिणीची निर्मिती, वरुण यांच्या नाराजीचे मोठे कारण काय बनले आहे. त्यातच पक्षातील त्यांची घटते स्थान हेही यामागील एक कारण आहे. भाजप कार्यकारिणीच्या पुनर्रचनेत सुमारे ३० टक्के सदस्य बदलले जातात. यावेळीही पक्षातील अनेक प्रमुख नेते बदलले गेले आहेत. त्यातच वरुण गांधी आणि त्याची आई मनेका गांधी हे गांधी घराण्यातील असल्याने त्यांना काढून टाकणे हा चर्चेचा विषय ठरला आहे.
विशेष म्हणजे मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळात मनेका गांधी यांना मंत्री करण्यात आले नाही, तेव्हापासून हे अंतर वाढताना दिसत होते. वरुण गांधी देखील भाजपच्या कामात फारसा रस घेत नव्हते. त्यांनी स्पष्टपणे याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. दुसरीकडे आता उत्तर प्रदेश निवडणुका तोंडावर आल्या आहेत. यावेळी वरुण गांधींची विधाने भाजपला अस्वस्थ करणारी आहेत. मात्र, भाजप नेतृत्वही वरूण गांधींच्या वक्तव्यांना फारसे महत्त्व देत नाही. त्यांच्या कोणत्याही विधानावर नेत्यांनी कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही. यावरून स्पष्टपणे होते की, भाजप वरूण गांधींबाबत फारसे गंभीर नाही. भाजपमध्ये डावलले जात असल्याने मनेका आणि वरुण गांधी हे पुन्हा काँग्रेसमध्ये जाणार का, याची सर्वांना उत्सुकता आहे.