मुंबई – राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री डॉ. वर्षा गायकवाड आणि भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड (बीसीसीआय)चे अध्यक्ष सौरभ गांगुली हे कोरोना बाधित झाले आहेत. गांगुली हे वर्षभरात दुसऱ्यांदा कोरोना बाधित झाले आहेत.
डॉ. गायकवाड यांनी ट्विट करुन तशी माहिती दिली आहे. मी स्वतःला विलगीकरणात आहे. मला अत्यंत सौम्य लक्षणे आढळून आली आहेत. त्यामुळे मी चाचणी करुन घेतली. त्यात रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. माझी विनंती आहे की, जे माझ्या संपर्कात आले आहेत त्यांनी स्वतःची चाचणी करुन घ्यावी, असे गायकवाड यांनी म्हटले आहे.
विशेष म्हणजे, राज्याचे हिवाळी अधिवेशन सध्या सुरू आहे. या अधिवेशनाला डॉ. गायकवाड या काल उपस्थित होत्या. त्यामुळे त्यांच्या संपर्कात अधिवेशनातील अनेक जण आले आहेत. त्यामुळे अधिवेशनात चिंतेचे वातावरण आहे.
https://twitter.com/VarshaEGaikwad/status/1475691898954153988?s=20
भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार आणि बीसीसीआयचे अध्यक्ष सौरभ गांगुली हे कोरोना बाधित झाले आहेत. विशेष म्हणजे ते गेल्या वर्षभरात दुसऱ्यांदा बाधित झाले आहेत. त्यांना तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असून काळजीचे कारण नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. तसेच, गांगुली यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी चाचणी करुन घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
https://twitter.com/Oneindia/status/1475690437939634181?s=20