- सिद्धी दाभाडे (इंडिया दर्पण वृत्तसेवा)
कोविडच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे चित्रपटगृह बंद ठेवण्यात आली आहेत. परंतु OTT ने प्रेक्षकांना मनोरंजनाची कमी पडू दिलेली नाही. या आठवड्यात विविध मनोरंजक चित्रपट आणि वेब सिरीज आपले मनोरंजन करण्यासाठी सज्ज आहेत. त्यामुळेच या विकेंडमध्ये आपल्याला या चित्रपटांची उत्तम मेजवानी असून त्याचा आपण आनंद घेऊ शकतात
इटरनल्स
मार्वल स्टुडीओचा इटरनल्स हा चित्रपट डिस्ने प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट डिसेंबर मध्ये चित्रपटगृहात आला होता. चित्रपटाची कथा अशाच काही प्राण्यांची आहे जे प्राचीन काळापासून परत येतात. आणि काही नवीन सुपरहिरो या प्राण्यांपासून जगाला वाचवण्यासाठी एकत्र येतात. या चित्रपटात अंजलीना जोली, जेम्मा चॅन, रिचर्ड मॅडेन, कुमेल नानजीयानी, लॉरेन रीडलॉफ, ब्रायन टायरी हेन्री, सलमा हेक यांच्या प्रमुख भूमिका आहेत. इंग्रजी व्यतिरिक्त हा चित्रपट तमिळ, तेलगू, मल्याळम, कन्नड आणि हिंदी मध्ये देखील प्रदर्शित झाला आहे.
रंजिश ही सही
voot select यावर नवीन रिलीज झालेली वेब सिरीज आहे ‘रंजिश ही सही’. ही सिरीज हिंदी सिनेमाच्या गोल्डन पिरीयडवर आधारित आहे. या सिरीज मध्ये ताहीर राज भसीन (शंकर), अमृता पुरी (अंजू), आणि अमला पॉल (आमना) यांच्या प्रमुख भूमिका आहेत. ही गोष्ट एका नवोदित चित्रपट निर्मात्याची आहे, जो एका वेगळ्या कथेच्या शोधात आहे.
ह्युमन
मेडिकल क्राईम ड्रामा असलेला ह्युमन हा शो डिस्ने प्लस हॉटस्टारवर रिलीज झाला आहे. या शोची निर्मिती आणि दिग्दर्शन विपुल शाह आणि मोजाज सिंग यांनी केली आहे. या शोमध्ये शेफाली शाह आणि कीर्ती कुल्हारी मुख्य भूमिकेत आहेत. औशाडांची मानवी चाचणी आणि त्याच्याशी संबंधित काळ्या धंद्यावर आधारित हा ड्रामा आहे.
पुष्पा द राईज
बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कामगिरी केल्यानंतर, अल्लू अर्जुन आणि राष्मिका मंदान्ना यांचा चित्रपट पुष्पा – द राईज गेल्या आठवड्यात तेलगु, तमिळ, मल्यालम आणि कन्नड भाषेत prime video वर हिट झाला आहे आणि आता तो हिंदी भाषेत १४ जानेवारीला आला आहे आहे.