इंडिया दर्पण विशेष लेखमाला
वारी पंढरीची (भाग ४)
नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी
|| संत नामदेव ||
संत नामदेव (२६ ऑक्टोबर. १२७० – ३ जुलै १३५०) हे महाराष्ट्रातील वारकरी संतकवी होते. त्यांचे आडनाव रेळेकर असे होते. ते मराठी भाषांमधील सर्वाधिक जुन्या काळातील कवींपैकी एक होते. त्यांनी पंजाबी व व्रज भाषांमध्येही काव्ये रचली. शिखांच्या गुरू ग्रंथसाहिबात त्यांच्या बासष्ट काव्यरचना समाविष्ट आहेत. नामदेव हे ‘मराठीतील’पहिले चरित्रकार व आत्मचरित्रकार आणि ‘कीर्तना’च्या माध्यमातून भागवत धर्म पंजाबपर्यंत नेणारे आद्य प्रचारक होते.
नामदेवांचे विठ्ठलप्रेम लहानपणापासून दुथडी ओसंडून बाहात होते. पांडुरंग मूर्तीला ते पाषाणमूर्ती न समजता साक्षात आनंदघन मानीत. या बालभक्त्ताच्या प्रेमपाशात तो आनंदघन पूर्णपणे गोवला गेला होता. या संदर्भात नामदेवांच्या बालपणीची एक आख्यायिका संगतात ती अशी-
नामदेवांच्या वडिलांचा असा एक नेम होता की, दररोज पूजा करून पांडुरंगाला ते नैवेद्य दाखवीत असत. एक दिवस दामाशेटीला कामाकरिता बाहेरगावी जावयाचे होते. म्हणून त्यांनी नामदेवाला देवळात जाऊन पूजा करावयास व नैवेद्य न्यावयास सांगितले. दुसऱ्या दिवशी नामदेव नैवेद्य घेऊन देवळात गेले व नैवेद्य खाण्याविषयी त्यांनी देवाची हात जोडून प्रार्थना केली. पण देव नैवेद्य खाईना. नामदेवांनी पुन्हा देवाला प्रार्थना केली, “देवा, तूं जर आज नैवेद्य खाणार नाहीस, तर मी येथुन हालणार नाही.” असे बोलून ते तेथेच बराच वेळ बसले. भगवंतांनी नामदेवांची परीक्षा पाहाण्याचे ठरविले. बराच वेळ झाल्यावर नामदेव देवाला म्हणाले“विठोबा, तू जर नैवेद्य खाणार नाहीस तर मी तुझ्या पायावर डोके आपटून प्राण देईन.”
जरा वाट पाहून देव नैवेद्य खात नाही असे पाहाताच नामदेव डोके आपटणार तोच भक्त्तवत्सल भगवंताने त्याला धरले व नैवेद्य आनंदाने खाल्ला.
नामदेवांचे जुने-नवे चरित्रकार वरिल अलौकिक घटनेचा निर्देश करीत आले आहेत. ही घटना जरी चमत्कारपूर्ण मानली गेली असली, तरीसुद्धा या प्रकरणावरून बालनामदेवांच्या भोळ्या, श्रद्धाळू मनाचे दर्शन होते आणि या घटनेच्या प्रकाशात त्यांच्या भावी जीवनात क्रमशः घेडलेल्या इतर घटनांचा अर्थ समजून घेण्यास मनाची तयारी होते.
हा बालभक्त्त सर्वकाल पांडुरंगाच्या भक्त्तीत दंग असे. हे पाहून दामाशेटी व गोणाई चिंतातुर झाली. नामदेवाने संसाराकडे लक्ष द्यावे व उद्योगधंदा करावा ही त्यांची इच्छा. म्हणून त्यांच्या वयाच्या अकराव्या वर्षी त्यांनी गोविंदशेट यांची मुलगी राजाई हिच्याशी त्यांचे लग्न लावून दिले. तिच्यापासून नारायण, महादेव, गोविंद आणि विठ्ठल हे चार मुलगे व लिंबाई नावाची एक मुलगी अशी पाच अपत्ये त्यांना झाली. अशा प्रकारे नामदेवांचा संसार झाला.
नामदेवाच्या जीवनात एक घटना घडली. एक दिवशी नामदेव बाजारात काही कापडं विकायला निघाले. ते एका दगडावर भजन करत बसले, व आपण कापड विकायला आलो होतो या गोष्टीचा त्यांना अगदीच विसर पडला. काही घटकांनंतर सूर्यास्त झाला व त्यांना आठवण झाली की आपण कापड विकण्या करिता आलो होतो व आता ते विकले गेले नाही म्हणून घरी वडिलांचा ओरडा खावा लागेल. त्यांनी काय केले की ते सर्व कापडं ते ज्या दगडावर बसले होते त्यालाच विकून दिले, म्हणजे की त्या दगडा वरच सोडून दिले, व दूसर्या एक दगडाला हमी द्यायला म्हणून नेमलं की पहिला दगड दूसर्या दिवशी त्यांना पैसे देईल, आणि ते मंदिरात जाऊन बसले.
नामदेवांचे वडिल त्यांच्या मुलाचे हे अद्भुत कार्य ऐकून संतापले व त्यांनी त्या धोंड्याला (अर्थात् त्या दगडाला, महाराष्ट्राच्या काही लोकांमधे धोंड्या हे नाव पण असतं) आणायला सांगितले ज्याने पैसा देण्याची बहादारी दिली होती. दूसर्या दिवशी नामदेव परत बाजारात गेले आणि बघितलं की रात्रभरात सर्वे कापडं तेथून नाहीसे झाले होते, दूसर्या दगडाला (धोंड्या) त्यांनी घरी आणलं, जसे काही त्याने पैसे द्यायला नकारा दिला होता असे समजून त्याला एका खोलीत बंद करून ठेवले.
त्या नंतर ते मंदिरात गेले व विठोबाला सर्व हकीकत सांगितली व आपली अडचण पण सांगितली. नामदेवांच्या वडिलांनी त्यांना तो पैसे देण्याची हामी देणारा धोंड्या दाखविण्यास सांगितले, नामदेवांनी उत्तर दिले की त्याला घरात एका खोलीत बंद केलं आहे व स्वतः पुन्हा मंदिराकडे निघून गेले. वडिलांनी जसेच पैसे मागण्या करिता खोलीचं दार उघडलं, समोर सोन्याची एक लगडी बघून ते आश्चर्यचकित झाले. वडिलांना अतिआनंद झाला; पण नामदेवांना याचा लेशमात्र लोभ वाटला नाही. त्यांनी देवाचा फक्त या गोष्टी साठी आभार मानला की त्यांना देवानी मार खाण्यापासून वाचवलं.
नामदेव वीस वर्षाचे होते तेव्हां त्यांची भेट महान संत ज्ञानेश्वरांशी पंढरपुरला झाली. ज्ञानदेव सहजपणे विठोबाच्या या महान भक्ताला भेटून खूपच आनंदित झाले. त्यांनी नामदेवांना आपल्या सोबत विविध भक्तीस्थानांची यात्रा करण्यास घेतले. नामदेवाच्या जीवनाचा हा खूप महत्वपूर्ण काल होता. या काळापासून व्यावहारिक दृष्ट्या, दोन महान संत मृत्युपर्यंत बरोबर राहिले. त्यांनी भारतातील जवळजवळ सगळ्या पवित्र तीर्थक्षेत्रांची यात्रा केली.
रस्त्यात, नामदेव व ज्ञानदेवांनी कित्येक चमत्कार दाखविल्याचा उल्लेख आहे. जसे की – नामदेव आणि ज्ञानदेव नागनाथपुरीला आले. नामदेवांनी मंदिरात भजनाला सुरुवात केली. तेथे प्रचंड गर्दी जमली. मंदिराचे मुख्य पुजारी मंदिरात प्रवेश करू शकत नव्हते म्हणून त्यांचा संताप झाला. नामदेव त्या मंदिराच्या पश्चिमद्वारेवर जाऊन बसले व रात्रभर भजन कीर्तन केले. चमत्कार असा झाला की मंदिरातील देवाने आपले मुख देखील नामदेवाकड़े वळविले.
नामदेवांनी कोणत्याही मोठ्या ग्रंथाची रचना केली नाही; पण त्यांनी देवाची भक्ती व प्रेमाने परिपूर्ण असे अनेक अभंग व लघुकाव्यांची रचना केली. त्या अभंगात एक अपूर्व गोडवा आहे. ह्यातले मोठ्या प्रमाणात तर हरवले, पण तरीही सुमारे चार हजार अभंग अजून ही आहे, जे आजही त्याला वाचणार्यासांठी प्रेरणास्रोत आहे. काही अभंगांचा समावेश गुरुग्रंथ साहिब या शिखांच्या धर्मग्रंथात पण झालेला आहे.
नामदेवांनी दिलेल्या संदेशात मूलतत्व हे आहे: “देवाच्या नावाचा नित्य जप करा. त्याच्या कीर्तीचे श्रवण करा. हृदयातील देवाचे ध्यान-आराधना करा. देवाची सेवा करा. त्याच्या कमलाचरणी डोकं ठेवा. कीर्तन करा. तुमची भूक तहान सर्व तुम्ही विसरून जाल. देव तुमच्या अगदी जवळच असेल. तुम्हाला अमरत्व आणि शाश्वत परमानंदाची अनुभूति होईल”.
ते पंजाब मधे वीस वर्ष राहिले व त्यांनी तेथे अभंगांची रचना केली जी सिख आदि ग्रंथांमधे देखील आहे. त्यांनी ८० व्या वर्षी पंढरपुरला समाधि घेतली. त्यांची विठठ्ठल -रखुमाई मंदिराच्या सुरुवातीची पायरी ‘नामदेव पायरी’ म्हणून ओळखली जाते.
संत नामदेव यांचा कालखंड इ.स. १२७० – जुलै ३, इ.स. १३५० हा मानला जातो.त्यांचे आडनाव रेळेकर असे होते. ज्ञानेश्वरानंतरचे ते मराठी भाषांमधील सर्वाधिक जुन्या काळातील कवींपैकी एक होते. त्यांनी पंजाबी व व्रज भाषांमध्येही काव्ये रचली. शिखांच्या गुरू ग्रंथसाहिबात त्यांच्या बासष्ट काव्यरचना समाविष्ट आहेत.
नामदेव हे ‘मराठीतील’पहिले चरित्रकार व आत्मचरित्रकार आणि ‘कीर्तना’च्या माध्यमातून भागवत धर्म पंजाबपर्यंत नेणारे आद्य प्रचारक होते. त्यामुळे आज त्यांच्या जन्म स्थानी पंजाबी मंडळी त्यांवया जन्म स्थानी नर्सी या गावाचा विकास करण्यासाठी धडपडत आहेत.
भक्तशिरोमणी संत नामदेव हे संत ज्ञानेश्वरांच्या कालखंडात होऊन गेले .वारकरी संप्रदायाचे प्रचारक नामदेव महाराज नामवेदाचे व नामविद्येचे आद्य प्रणेते असलेले महाराष्ट्रातील हे एक थोर संत होत. आपल्या कीर्तनकलेमुळे प्रत्यक्ष पांडुरंगाला डोलायला लावणारी अशी त्यांची कीर्ती होती. संत नामदेव प्रत्यक्ष श्रीविठ्ठलाच्या निकटवर्ती असलेला सखा होता, असे मानले जाते. संत नामदेव हे वारकरी संप्रदायाचे महान प्रचारक असून भारतभर त्यांनी त्या बाबतीत भावनिक एकात्मता साधली. भागवत धर्माची पताका पंजाबपर्यंत घेऊन जाण्याचे कार्य त्यांनी स्वकर्तृत्वाने केले.
दामाशेटी हे संत नामदेवांचे वडील व गोणाई त्यांची माता होती. दामाशेटींचा व्यवसाय कपडे शिवणे हा होता.म्हणजे ते शिंपी होते. यांच्या अगोदरच्या सातव्या पिढीतील पुरुष यदुशेट हे सात्त्विक प्रवृत्तीचे भगवद्भक्त होते. सध्याच्या हिंगोली जिल्ह्यातील नरसी-बामणी हे संत नामदेवांचे जन्म गाव होय. नामदेवांचा जन्म प्रभव नाम संवत्सरात, शके ११९२ (इ.स.१२७०) मध्ये कार्तिक शुद्ध एकादशीस, रोहिणी नक्षत्रास, रविवारी झाला. संत नामदेवांना ८० वर्षांचे आयुष्य लाभले. त्यांचे बालपण हे पंढरपूरात गेले. त्यांनी लहानपणापासूनच श्रीविठ्ठलाची अनन्यसाधारण भक्ती केली.
संत गोरा कुंभार यांच्याकडे, तेरढोकी येथे निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर महाराज, सोपानदेव, मुक्ताबाई, संत नामदेव, चोखामेळा, विसोबा खेचर आदी संतांचा मेळा जमला होता. याच प्रसंगी संत ज्ञानेश्वरांच्या विनंतीवरून गोरोबाकाकांनी उपस्थितांच्या आध्यात्मिक तयारीविषयी आपले मतप्रदर्शन केले होते. या प्रसंगानंतरच संत नामदेवांना विसोबा खेचर हे आध्यात्मिक गुरू म्हणून लाभले.
पत्नी राजाई, मोठी बहीण आऊबाई; नारा, विठा, गोंदा, महादा हे त्यांचे चार पुत्र व एक मुलगी लिंबाई असा संत नामदेवांचा परिवार होता. त्यांच्या कुटुंबात एकूण पंधरा माणसे होती. स्वतःला ‘नामयाची दासी’ असे म्हणणार्या संत जनाबाई याही त्यांच्या परिवारातील एक सदस्य होत्या.
संत नामदेवाची अभंगगाथा (सुमारे २५०० अभंग) प्रसिद्ध आहे. त्यांनी हिंदी भाषेत काही अभंग रचना (सुमारे १२५ पदे) केली. त्यातील सुमारे बासष्ट अभंग (नामदेवजीकी मुखबानी) शीख पंथाच्या गुरुग्रंथ साहेबमध्ये गुरुमुखी लिपीत घेतलेले आहेत. संत नामदेवांना मराठी भाषेतील पहिले आत्मचरित्रकार व चरित्रकार मानले जाते. संत नामदेवांनी आदि, समाधी व तीर्थावळी किंवा तीर्थावली या गाथेतील तीन अध्यायांतून संत ज्ञानेश्वरांचे चरित्र सांगितले आहे.
संत ज्ञानेश्ववरांच्या भेटीनंतर (इ.स.१२९१) संत नामदेवांचे आयुष्य पालटले. अनेक संतांबरोबर त्यांनी भारतभर तीर्थयात्रा केल्या. त्यांच्या सद्गुरूंनी म्हणजेच विसोबा खेचर यांनी त्यांना ब्रह्मसाक्षात्कार घडवून आणला, असे म्हणतात. त्यांच्या कीर्तनांत अनेक सद्ग्रंथांचा उल्लेख असे. यावरून ते बहुश्रुत व अभ्यासू असल्याचे लक्षात येते. ‘नामदेव कीर्तन करी, पुढे देव नाचे पांडुरंग’- अशी त्यांची योग्यता होती. ’नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी’ हे त्यांच्या आयुष्याचे ध्येय होते.
भागवत धर्माचे आद्य प्रचारक म्हणून संत नामदेवांनी संत ज्ञानेश्वरांच्या संजीवन समाधी नंतर सुमारे ५० वर्षे भागवत धर्माचा प्रचार केला. प्रतिकूल परिस्थितीमध्ये महाराष्ट्राची भावनिक एकात्मता जपण्याचे अवघड काम त्यांनी केले. पंजाबमधील शीख बांधवांना ते आपले वाटतात. शीख बांधव ‘नामदेव बाबा’ म्हणून त्यांचे गुणगान गातात.
पंजाबातील ‘शबदकीर्तन’ व महाराष्ट्रातील ‘वारकरी कीर्तन’ यांत विलक्षण साम्य आहे. घुमान (पंजाब) येथे शीख बांधवानी त्यांचे मंदिर उभारले आहे. बहोरदास, लढ्विष्णुस्वामी, केशव कलाधारी हे त्यांचे पंजाबी शिष्य होत. राजस्थानातील शीख बांधवांनीही नामदेवाची मंदिरे उभारलेली आहेत. `संत शिरोमणी’ असे यथार्थ संबोधन त्यांच्याबद्दल वापरले जाते.
संत नामदेव समाधी (पंढरपुर):-
संत नामदेव हे ८० वर्षांचे झाल्यानंतर त्यांनी जग सोडून जाण्याचे ठरवले. आषाढ शुद्ध एकादशी शके १२७२ रोजी विठ्ठला पुढे जाऊन आज्ञा द्यावी अशी विनंती केली. त्यानंतर आषाढ वद्य त्रयोदशी शके १२७२ या दिवशी त्यांनी पंढरपूर येथे विठ्ठल मंदिराच्या महाद्वारी समाधी घेतली. विठ्ठल दर्शनासाठी येणाऱ्या सर्व संत सज्जनांची धूळ आपल्या मस्तकी लावावी ही त्यांची इच्छा असल्यामुळे महाद्वाराच्या पहिल्या पायरीवर ते समाधिस्थ झाले .तेथे त्याचे समाधी स्थान तयार करण्यात आले आहे. पंढरपूर येथे विठ्ठल मंदिरात संत नामदेव पायरी आहे.
संत नामदेव मंदिर (नरसी):-
संत नामदेव यांचा जन्म महाराष्ट्र राज्यातील हिंगोली जिल्ह्यापासून १५ ते २० किमी दूर नरसी या गावात झाला . या गावाशेजारुन कयाधू नदी वाहते. त्या नदीकाठी संत नामदेवांचे मंदिर आहे. ह्या गावी त्यांच्या घराची जागा दाखविली जाते.त्यांचे आजोळ कल्याणी किंवा काणणीहेही ह्याच परिसरातले.नरसी आणि बामणी ही दोन स्वतंत्र गावे असली, तरी त्यांचा उल्लेख एकत्रच केला जातो. हे लक्षात घेऊन नामदेवांची नरसी-बामणी ही ह्या दोन गावांत सामावलेली असावी, असे सामान्यतः मानले जाते. नामदेवकृत म्हणून समजले जाणारे एक ‘आत्मचरित्र’ नामदेवांच्या संकलित गाथ्यात अंतर्भूत आहे.
भगवद्भक्तांच्या व साधु-संतांच्या चरण धुळीचा स्पर्श व्हावा म्हणून पंढरपूर येथील विठ्ठल मंदिराच्या महाद्वारी ‘पायरीचा दगड’ होण्यात त्यांनी धन्यता मानली. संत नामदेव हे आषाढ वद्य त्रयोदशी, शके १२७२ मध्ये (शनिवारी, दि. ३ जुलै, १३५० रोजी) पंढरपूर येथे पांडुरंगचरणी विलीन झाले.
( क्रमश:)
विजय गोळेसर मोबा. ९४२२७६५२२७