गुरूवार, ऑगस्ट 28, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

वारी पंढरीची (भाग ६) विजयनगरच्या साम्राज्यातून विठ्ठलाला परत आणणारे || संत भानुदास ||

by Gautam Sancheti
जून 20, 2023 | 4:37 pm
in इतर
0
FXcieCYagAAd Rm e1687259205100

इंडिया दर्पण विशेष लेखमाला
वारी पंढरीची (भाग ६)
विजयनगरच्या साम्राज्यातून विठ्ठलाला परत आणणारे
|| संत भानुदास ||

भानुदासांनी सर्वांना आश्‍वासन दिलं कि, “मी विठ्ठलास परत” येथे आणीन! भानुदास निघाले, काही दिवसांनी ते मध्यरात्रीच्या सुमारास विठ्ठलासमोर येऊन उभे राहिले. देवास म्हणाले, “देवा सर्व भक्‍त तुझी पंढरीत वाट पाहत आहेत चल माझ्याबरोबर!” बाहुबली नावाच्या सुप्रसिद्ध चित्रपटात बाहुबली आपल्या आईच्या पूजेसाठी भगवान शंकराची भली मोठी शिवपिंड उखडून घेउन येतो असा प्रसंग आहे. अगदी तसाच प्रसंग पंढरीच्या विट्ठलाबाबत घडला होता. विजयनगरच्या सम्राटाने बलाने विजयनगर येथे नेलेली विठ्ठलमूर्ती एका विठ्ठल भक्ताने आपल्या भक्तिच्या बळावर पंढरपुर येथे परत आणली होती. विजयनगरच्या सम्राटाने विजयनगर येथे नेलेली पंढरीच्या पांडुरंगाची मूर्ती पुन्हा पंढरपुरला आणण्याचे अवघड कार्य संत भानुदास यांनी केले. त्यांच्याच वंशात पुढे एकनाथ नावाचे महान संत होवून गेले.संत भानुदास हे एकनाथाचे पणजोबा होते.

vijay golesar
विजय गोळेसर मो. ९४२२७६५२२७

भानुदास हे दामाजींचे समकालीन होते.. इ. स. १४४५ ते १५१३ हा त्यांचा काळ. त्यांनी इ. स. १४६८ ते १४७५ या काळातील दुर्गादेवीचा दुष्काळ पाहिला होता. ‘ आमुचिये कुळी पंढरीचा नेम । मुखी सदा नाम विठोबाचे ’ असे त्यांनी म्हटले आहे. यावरून पंढरपूरच्या विठ्ठलाची भक्ती त्यांच्या कुळात परंपरेने चालत आलेली होती.
ज्ञानेश्वरांच्या काळानंतर महाराष्ट्रावर आलेले भयानक परकीय आक्रमण धार्मिक, सांस्कृतिक दृष्ट्याही अत्यंत हानीकारक होते. राजसत्तेच्या आश्रयाने होत राहिलेल्या या धार्मिक आक्रमणामुळे हिंदू लोकांत स्वधर्माचरणाची निष्ठा ढळू लागली होती. उत्तरेकडून येणार्‍या परधर्मीयांबरोबर हजारो सूफी उत्तर – दक्षिण भारतात राजाश्रयाने धर्म प्रचाराचे कार्य करीत होते.

इ. स. १३०० मध्ये निजामुद्दीन अवलिया सातशे सूफींचा तांडा घेऊन दक्षिणेत आला; हे लोंढे सतत येत राहिले. हजारो हिंदू आपणहून किंवा बलात्कारे बाटून मुसलमान झाले. देवळे – मठ उद्ध्वस्त होऊन त्या जागी पीर, दरगे, मशिदी उभ्या राहू लागल्या. हिंदू सरदारांना याचे काहीच वाटत नव्हते, कारण त्यांना आपापल्या जहागिरींचा विस्तार करायचा होता, म्हणून ते बादशहांच्या अंकित राहिले. पुणे, पुरंदर, पैठण, वैजापूर, गंगापूर, कंधार, मंगरूळ, उस्मानाबाद इत्यादी ठिकाणचे पीरांचे दर्गे सूफींचे आहेत. पैठण हे जसे महाराष्ट्राचे सांस्कृतिक केंद्र, पण या काळात सूफींनी पैठणातील गणेशाचे, एकवीरा देवीचे व महालक्ष्मीचे मंदिर उद्ध्वस्त करून त्याठिकाणी दर्गे उभे केले. ही गोष्ट इतिहासात नोंदली गेली आहे.

संत भानुदास यांनी बालपणीच सर्व अध्ययन पूर्ण केले.
ईश्वराच्या भेटीसाठी त्यांनी अनेक दिवस ध्यानधारणा केली, सूर्य नारायणाची उपासना केली. त्यांचा दृढ निश्चय पाहून सूर्यनारायणाने त्यांना ब्राह्मणाच्या रूपात दर्शन दिले असे सांगतात. काहीही असो त्यांनी आत्मसाधना केली होती, हे खरे. त्याचप्रमाणे भोवतालच्या राजकीय, सामाजिक व धार्मिक दुरवस्थेचेही निरीक्षण त्यांनी केले होते. पुढे त्यांचा विवाह झाला. मुलेबाळे झाली. नातेवाईकांनी त्यांना कापडाचा धंदा घालून दिला. त्यांनी तो अत्यंत निष्ठेने चालवला. त्यांच्या सत्यनिष्ठेची, निर्भयतेची व सरळपणाचे ख्याती सर्वत्र पसरली होती. ते थोर कीर्तनकार होते.

विजयनगरचा राजा कृष्णदेवराय याने विठ्ठलाची मूर्ती पंढरपुराहून आपल्या राजधानीत नेली होती. ती भानुदासांनी प्रयत्नाने पंढरपुरात परत आणली. कृष्णदेवरायाची कारकीर्द इ. स. १५०९ पासून १५३० पर्यंत झाली. या काळात केव्हातरी ही घटना घडली असावी. कृष्णदेवरायाने या मूर्तीची प्रतिष्ठा एक भव्य देऊळ बांधून त्यात केली. हे विठ्ठलस्वामींचे मंदिर म्हणून ओळखले जाते. शिल्पकलेचा तो एक अद्वितीय नमुनाच मानला जातो.
विजयनगरचे साम्राज्य इ. स. १५६५ मध्ये नष्ट झाले. तोवर हे काम पूर्ण झाले नव्हते. ते तसेच राहिले म्हणून विठ्ठल मूर्तीची स्थापना झाली नाही असे म्हणतात. विजयनगर स्मारक ग्रंथात इतिहास संशोधक ग. ह. खरे म्हणतात, “ मंदिरातील शिलालेखांवरून आपणाला अगदी निराळीच माहिती मिलते.
हे शिलालेख इ. स. १५३३ ते १५६४ या काळातील आहेत. या लेखांवरून मंदिरात विठ्ठलमूर्ती होती व तिची पूजा – अर्चा मोठ्या थाटाने होत असे ही गोष्ट निश्चित ठरते. मग मंदिराचे बांधकाम पुरे झाले असो वा नसो. ” काही शिलालेखांचे आधार देऊन ग. ह. खरे आपले हे मत सिद्ध करतात.

संत भानुदास यांनी पंढरपुरात आणलेली विठ्ठलमूर्ती ही मूळची की कृष्णदेवरायाने विठ्ठलस्वामींच्या मंदिरात स्थापिलेल्या मूर्तीची ती प्रतिकृती, असा एक प्रश्न संशोधकांनी उपस्थित केला आहे. काही वर्षापूर्वी डॉ. एन. नारायणराव ह्यांस या मंदिरातील परिसरात भग्नावस्थे पडलेली एक विठ्ठलमूर्ती आढळली. ग. ह. खरे ही विठ्ठलमूर्तीच असल्याचा निर्वाळा देतात. ( विजयनगर स्मारक ग्रंथ पुरवणी, पृ. ३५५-३५६ ). पुढे ते असे म्हणतात की, “ तथापि पंढरपुरहून विजयनगरास आणली गेली तीच ही आहे की काय, हा महत्त्वाचा प्रश्न आहे, व तो सोडविण्याचे आपणाजवळ साधन नाही. ”

विठ्ठलाची मूर्ती गेली कशी आणि आणली कशी?
भानुदास महाराज म्हणतात – आमुचिये कुळी पंढरीचा नेम । वाचे सदा नाम विठ्ठलाचे ॥ भानुदासांची कीर्ती पसरली ते एका ऐतिहासिक घटनेने, विजयनगर साम्राज्याचा राजा कृष्णदेवराय एकदा पंढरीस आला. श्रीविठ्ठलास आपल्या राज्यात नेऊन प्रतिष्ठीत करावे असा विचार त्याच्या मनात आला आणि त्याने तसे केले. आषाढी वारी जवळ आल्यानंतर पंढरीत वारकरी श्रीविठ्ठल दर्शनार्थ जमू लागले. परंतु ज्याच्या दर्शनासाठी आपण येथवर आलो आहोत तोच जागेवर नसल्याचे पाहुन वारकरी आलाप करु लागले. त्यावेळी भानुदासांनी सर्वांना आश्‍वासन दिलं कि, “मी विठ्ठलास परत” येथे आणीन! भानुदास निघाले, काही दिवसांनी ते मध्यरात्रीच्या सुमारास विठ्ठलासमोर येऊन उभे राहिले. देवास म्हणाले, “देवा सर्व भक्‍त तुझी पंढरीत वाट पाहत आहेत चल माझ्याबरोबर!”

विठ्ठलानं आपल्या गळ्यातील तुळशीच्या हारासह नवरत्‍नांचा हार भानुदासांच्या गळ्यात घालून थोडा धीर धरण्याचा सल्ला दिला. भानुदास तेथुन बाहेर पडले. पहाटे काकड आरतीच्यावेळी जेव्हां पुजारी तेथे आले तेव्हां त्यांच्या लक्षात आले कि देवाच्या गळ्यात नवरत्‍नांचा हार नाही. राजापर्यंत बातमी पोचली. जो कोणी चोर असेल त्यास परस्पर सुळवर चढविण्याचे फर्मान राजाने सोडले. सैनिक सर्वत्र पसरले. पहाटेच्यावेळी तुंगभद्रा नदीच्या किनारी भानुदास संध्या करित असताना एका सैनिकास त्यांच्या गळ्यात नवरत्‍नांचा हार दिसला. हाच चोर असावा असं गृहीत धरून सैनिकाने भानुदासांस बंदि बनविले. त्यांना सुळावर चढविण्याचा निर्णय घेण्यात आला.
त्यावेळी भानुदासांच्या मुखातुन अभंग प्रकटला – जै आकाश वर पडो पाहे । ब्रह्मगोळ भंगा जाये । वडवानळं त्रिभूवन खाये । तरी तुझीच वाट पाहे गां विठोबा ॥ ज्या सुळावर त्यांना चढविण्यात येणार त्या सुळास पालवी फुटली. सदर प्रसंगाचं वर्णन त्यांच्याच भाषेत पहायचं झाल्यास – कोरडिये काष्ठी अंकुर फुटले । येणे येथे जाले विठोबाचे ॥
ही बातमी राजापर्यंत पोचली. राजाचा थरकांप उडाला, ज्याला आपण चोर समजलो तो चोर नसून महान भगवद्‍भक्‍त असावा हे त्याच्या लक्षात आले. माझ्या भक्‍ताचा छळ झाल्यामुळे मी तुझ्याकडे राहणार नाही असा इशारा विठ्ठलानं दिला. भानुदास विठ्ठलाला घेऊन पंढरीस निघाले. पंढरीजवळ आल्यानंतर आनंदित झालेल्या वारकऱ्यांनी श्रीविठ्ठलाची रथावरून मिरवणूक काढली तो दिवस होता कार्तिक शुद्ध एकादशी इ.स. १५०६ चा. (आजही कार्तिकी एकादशीस रथोत्सव होतो तो या दिवसाचं स्मरण म्हणुन.)

श्रीविठ्ठल दर्शनास जाताना गरुड मंडपामध्ये उजव्या हातास दरवाज्याजवळ ज्या पहिल्या पादुका आहेत ती म्हणजे श्रीभानुदास महाराजांची समाधी होय. आजही त्यांच्या समाधीदिनाचा उत्सव वारकऱ्यांमध्ये साजरा करण्यात येतो. ह्या दिवशी त्यांच्या वंशजांकडुन परंपरेनं प्रतिवर्षी समाधीचे पूजन, नैवेद्य किर्तनादी करण्यात येते.
संत श्रीभानुदासांच्या भक्‍तितून अंशतःउतराई होण्यासाठी विठ्ठलानं त्यांच्या वंशात जन्म घेतला तो संत एकनाथमहाराजांच्या रूपात.
भानुदासाचे कुळी महाविष्णूचा अवतार । क्षेत्र प्रतिष्ठान वस्ती गोदावरीतीर ॥ निळोबा महाराज परंपरा भानुदासांच्या संदर्भात जे सांगते ते महत्त्वाचे मानले जाते. भानुदासांचे काही अभंग आणि आख्यायिका परंपरेने जपून ठेवल्या आहेत. या आख्यायिकांपैकी एक तत्कालीन परिस्थितीस दुजोरा देणारी आहे. तिच्यात अद्भुतता असली तरी इतिहासाचेच ते एक पुराणीकरण म्हणून त्याला महत्त्व प्राप्त होते.
(क्रमश:)

-विजय गोळेसर मोबा ९४२२७६५२२७

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

होमिओपॅथी उपचारांशी संबंधित तुम्हालाही आहेत का हे गैरसमज?

Next Post

नवी पुस्तके प्रसिद्ध केली… विद्यार्थ्यांना वितरीत केली…. आता परत मागवण्याची वेळ… बालभारतीचा सावळा गोंधळ

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

Untitled 1
संमिश्र वार्ता

मुंबईत अभिनेता सलमान खान यांच्या घरचा गणेशोत्सव…बघा, व्हिडिओ

ऑगस्ट 28, 2025
manoj jarange 1
महत्त्वाच्या बातम्या

मनोज जरांगे पाटील मुंबईला येणार की परत माघारी जाणार? सरकारचे प्रयत्न सुरु

ऑगस्ट 28, 2025
GzWb8 LbwAAmwZi e1756344943344
महत्त्वाच्या बातम्या

बघा, शिवतीर्थावरील हा व्हिडिओ….राज ठाकरे उध्दव ठाकरे यांच्या सहकुटुंब भेटीचे चित्रीकरण

ऑगस्ट 28, 2025
modi 111
मुख्य बातमी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संवत्सरीनिमित्त दिल्या शुभेच्छा…क्षमा, करुणा आणि नम्रतेचे केले आवाहन

ऑगस्ट 28, 2025
प्रातिनिधिक फोटो
राष्ट्रीय

या चार नवीन रेल्वे मार्गाला केंद्रीय मंत्रिमंडळाने दिली मान्यता…१२ हजार ३२८ कोटींचा अंदाजित खर्च

ऑगस्ट 28, 2025
Screenshot 20250828 063447 Collage Maker GridArt
महत्त्वाच्या बातम्या

महाराष्ट्रातील या चार शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर…शिक्षक दिनानिमित्त दिल्लीत समारंभ

ऑगस्ट 28, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

या व्यक्तींना व्यवसायात लाभाचे संकेत, जाणून घ्या, गुरुवार, २८ ऑगस्टचे राशिभविष्य

ऑगस्ट 27, 2025
खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते गणरायाची भक्तिमय वातावरणात प्राणप्रतिष्ठा 1024x682 1
राष्ट्रीय

दिल्लीत महाराष्ट्र सदनात ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात गणरायाची प्राणप्रतिष्ठा

ऑगस्ट 27, 2025
Next Post
संग्रहित फोटो

नवी पुस्तके प्रसिद्ध केली... विद्यार्थ्यांना वितरीत केली.... आता परत मागवण्याची वेळ... बालभारतीचा सावळा गोंधळ

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011