शुक्रवार, सप्टेंबर 12, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

वारी पंढरीची (भाग – १४) उस डोंगापारी रस नोहे डोंगा |काय भुललासी वरलिया रंगा| || संत चोखामेळा ||

by Gautam Sancheti
जून 30, 2023 | 5:21 am
in इतर
0
sant chokhamela e1688052129599

इंडिया दर्पण विशेष लेखमाला
वारी पंढरीची (भाग – १४)
उस डोंगापारी रस नोहे डोंगा
||काय भुललासी वरलिया रंगा||
|| संत चोखामेळा ||

संत चोखामेळा (चोखोबा) (जन्म : अज्ञात वर्ष; – इ.स. १३३८) हे यादव काळातील नामदेवांच्या संतमेळ्यातील वारकरी संप्रदायातील कवी होते. चोखोबांचा जन्म विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यात देऊळगाव राजा तालुक्यातील मेहुणा किंवा मेहुणपुरी या गावी झाला. संत चोखामेळांचे कुटुंब हे जातीने महार होते. (चोखोबांचा जन्म पंढरपूरला झाल्याचे संत महिपती सांगतात.)

vijay golesar
विजय गोळेसर मो. ९४२२७६५२२७

चोखोबा मूळ वऱ्हाडातील आहेत असेही म्हटले जाते. त्यांची पत्नी सोयरा, बहीण निर्मळा, मेहुणा बंका व मुलगा कर्ममेळा हे सर्व प्रपंचाचे काबाडकष्ट उपसत असतानाच नित्यनेमाने व भक्तिभावाने पांडुरंगाचे नामस्मरण व गुणसंकीर्तन करीत होते. संत चोखामेळा हे प्रापंचिक गृहस्थ. ते उदरनिर्वाहासाठी मोलमजुरी करत, पण ते विठ्ठलाच्या नामात सतत दंग असत. गावगाड्यातील शिवाशिवीच्या वातावरणात त्यांचा श्वास कोंडला जात होता. दैन्य, दारिद्‌ऱ्या, र्वैफल्य यांमुळे ते लौकिक जीवनात अस्वस्थ होते. परंतु प्रत्यक्ष परमेश्वराने त्यांना जवळ केले, त्यांना संतसंग लाभला. त्यांना मंदिरांत प्रवेश नव्हता. श्रीविठ्ठलाला त्यांना इतरांप्रमाणे उराउरी भेटावे असे खूप वाटत होते. परंतु ते सावळे, गोजिरे रूप महाद्वारातूनच पाहावे लागे, ही खंत त्यांच्या मनात होती.

चंद्रभागा नदीच्या वाळवंटात आध्यात्मिक लोकशाही संत ज्ञानदेवांमुळे १३व्या शतकात उदयाला आली. म्हणून संत चोखोबा म्हणतात, ‘खटनट यावे, शुद्ध होऊनी जावे। दवंडी पिटीभावे डोळा।।’ … असा पुकारा करून त्यांनी वारकरी संप्रदायातील अध्यात्मनिष्ठ, अभेद भक्तीचे लोण आपल्या उपेक्षित बांधवांपर्यंत नेऊन पोहोचवले. आत्मविकासाची संधी तत्कालीन समाजरचनेतील अगदी तळातील लोकांनाही मिळावी असे ज्ञानेश्र्वरादी सर्वच संतांना प्रांजळपणे वाटत होते. त्याच वेळी संत चोखोबांनी भक्तिमार्गाचा संदेश आपल्या अभंगांतून समाजबांधवांना दिला. संस्कारसंपन्न, संवेदनक्षम संत चोखोबांचे भावविश्व अनुभवण्याचा प्रयत्‍न केला असता, एक मूक आक्रंदनाचा अनुभव येतो.
१४व्या शतकात संत चोखोबा मातीखाली गाडले गेले. आज त्यांच्या समाज बांधवानी बौद्ध धर्म स्वीकारला आहे. त्यामुळे संत चोखोबांच्या अभंगांचे पारायण कोणीही करत नव्हते. अशा परिस्थितीत वारकरी साहित्य परिषदेने संत चोखोबांच्या अभंग गाथा पारायणास मंगळवेढा जि.सोलापूर येथे सन २०१३मध्ये थाटामाटाने सुरुवात केली.
चोखोबांबद्दल संत बंका, संत नामदेव आणि संत तुकाराम यांची वचने
संत बंका (चोखोबांचे मेव्हणे), संत नामदेव आणि संत तुकाराम यांनी त्यांच्या रचनांमध्ये संत चोखोबांबद्दल आपले भाव व्यक्त केले आहेत –
‘चोखा चोखट निर्मळ। तया अंगी नाही मळ।।
चोखा प्रेमाचा सागर। चोखा भक्तीचा आगर।।
चोखा प्रेमाची माउली। चोखा कृपेची साऊली।।
चोखा मनाचे मोहन। बंका घाली लोटांगण।।’
(- संत बंका)

‘चोखा माझा जीव चोखा माझा भाव। कुलधर्म देव चोखा माझा।।
काय त्याची भक्ति काय त्याची शक्ति। मोही आलो व्यक्ति तयासाठी।।
माझ्या चोखियाचे करिती जे ध्यान। तया कधी विघ्न पडो नदी।।
नामदेवे अस्थि आणिल्या पारखोनी। घेत चक्रपाणी पितांबर।।
(-संत नामदेव)
‘तुका म्हणे तुम्ही विचारांचे ग्रंथ। तारिले पतित तेणे किती।।’

संत तुकाराम
खुद्द तुकोबाराय ज्यांच्याबद्दल असे म्हणतात ते पतितांना तारणारे व उपेक्षितांची र्कैफियत देवापुढे तळमळीने मांडणारे संत म्हणजे चोखा मेळा होय.
कादंबरी
अरुणा ढेरे यांनी चोखा मेळ्याच्या जीवनावर महाद्वार नावाची कादंबरी लिहिली आहे.

अन्य पुस्तके
चोखोबाचा विद्रोह (शंकरराव खरात)
वारकरी संप्रदाय (शंकर वासुदेव अभ्यंकर)
संत चोखामेळा (लीला पाटील)
श्री संत चोखामेळा चरित्र (बाळकृष्ण लळीत)
श्री संत चोखामेळा चरित्र आणि अभंग (सोयराबाई, कर्ममेळा, बंका व निर्मलाबाई यांच्या अभंगांसह) : शब्दालय प्रकाशन.
श्री संत चोखामेळा व परिवार चरित्र व समग्र अभंगगाथा (प्राचार्य डाॅ. आप्पासाहेब पुजारी)
संत चोखामेळा : विविध दर्शन (ॲलिनॉर झेलियट, वा.ल. मंजूळ)
श्री संत चोखामेळा : समग्र अभंगगाथा व चरित्र (प्राचार्य डाॅ. आप्पासाहेब पुजारी)

चित्रपट
सुमीत कॅसेट्स नावाच्या कंपनीने ’संत चोखामेळा’ नावाची दृक्‌श्राव्य सीडी काढली आहे. त्यातील चित्रपटाचे दिग्दर्शन मानसिंग पवार यांनी केले आहे.
फाउंटन म्युझिक कंपनीनेही संत चोखामेळा नावाची सीडी कढली आहे. तिच्यातील चित्रपटाचे दिग्दर्शक राजेश लिमकर आहेत.
याच विषयावरचा पूर्ण लांबीचा मराठी कृष्णधवल चित्रपट ‘जोहार मायबाप (संत चोखामेळा)’ या नावाने सन १९५० मध्ये निघाला. राम गबाले यांनी त्याचे दिग्दर्शन केले होते. कथा-पटकथा-संवाद ग.दि. माडगूळकर यांचे तर संगीत सुधीर फडके यांचे होते. हाच चित्रपट १९७३ साली ‘‘ही वाट पंढरीची” या नावानेही सेन्सॉर झाला होता. इंदू कुलकर्णी, गोपीनाथ सावकार, ग्रामोपाध्ये, परशुराम भोसले, पु.ल. देशपांडे, विवेक, सुलोचना यांनी त्या चित्रपटात कामे केली होती. चित्रपटातील सुमधुर गाणी आजही लोकप्रिय आहेत.

‘धाव घाली विठू आता। चालू नको मंद।
बडवे मज मारिती। ऐसा काही तरी अपराध।।’
‘जोहार मायबाप जोहार। तुमच्या महाराचा मी महार। बहु भुकेला जाहलो।
तुमच्या उष्ट्यासाठी आलो।।’
‘आमुची केली हीन याती। तुज कां न कळे श्रीपती।
जन्म गेला उष्टे खाता। लाज न ये तुमचे चित्ता।।’
‘ऊस डोंगा परि । रस नोहे डोंगा। काय भुललासी वरलीया रंगा।।
चोखा डोंगा परि। भाव नोहे डोंगा।।’
‘विठ्ठल विठ्ठल गजरी। अवघी दुमदुमली पंढरी।’

हे त्यांचे अभंग जनमानसामध्ये आजही लोकप्रिय आहेत. या सर्वांचे विठ्ठलावर अनन्यसाधारण प्रेम होते त्यांना उपेक्षित बांधवांच्या उध्दाराची सतत चिंता होती. त्यांना समान हक्क मिळावेत, समाजातील तेढ कमी व्हावी, जातींमधील संघर्षाची भ्रामक कल्पना नष्ट व्हावी यासाठी त्यांनी भक्तिमार्गाद्वारे प्रयत्न केले.
गावगाड्यातील गावकुसाचे काम चालू असताना भिंत पडून सर्व कामगारांचा अंत झाला. चोखोबाही त्यात होते. संत नामदेवांनी जेव्हा सर्व अस्थी गोळा केल्या तेव्हा ज्या अस्थीतून ‘विठ्ठल विठ्ठल’ असा नाद ऐकू आला त्या अस्थी चोखोबाच्या होत्या असे म्हणतात. नामदेवांनी मात्र चोखोबांना विठठलाजवळच अढळ स्थान दिले. पंढरपूरच्या देवळाच्या महाद्वारात पायरी जवळ नामदेवांनी संत चोखोबांची समाधी बांधली आहे.

विजय गोळेसर मोबा. ९४२२७६५२२७

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

‘७२ हुरे’ हा चित्रपट वादात का सापडला? असं काय आहे त्यात?

Next Post

चक्क यापासून बनवतात कफ सिरप…. तब्बल १९ मुलांच्या मृत्यूस कारण…

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

jilha parishad
संमिश्र वार्ता

राज्यातील ३४ जिल्हा परिषदांमधील अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर…नाशिकचे आरक्षण या गटासाठी आरक्षित

सप्टेंबर 12, 2025
crime 13
क्राईम डायरी

इलेक्ट्रीकचा शॉक लागल्याने ४३ वर्षीय महिलेचा मृत्यू….लहवित येथील घटना

सप्टेंबर 12, 2025
IMG 20250912 WA0302 1
संमिश्र वार्ता

जागतिक पातळीवर नावाजलेल्या हाफकीन संस्थेस मंत्री नरहरी झिरवाळ यांनी दिली भेट…

सप्टेंबर 12, 2025
crime11
क्राईम डायरी

डिजीटल अ‍ॅरेस्टचा बहाणा नाशिकच्या सेवानिवृत्तास सव्वा २१ लाख रूपयाला गंडा

सप्टेंबर 12, 2025
Untitled 13
संमिश्र वार्ता

नाशिकमध्ये शिवसेना मनसे तर्फे जन आक्रोश मोर्चा…खा. संजय राऊत, बाळा नांदगावकरही झाले सामील

सप्टेंबर 12, 2025
kangana
संमिश्र वार्ता

अभिनेत्री कंगना राणौतने सर्वोच्च न्यायालयातील दाखल केलेली याचिका घेतली मागे…हे आहे कारण

सप्टेंबर 12, 2025
Untitled 12
संमिश्र वार्ता

मेरे पास बंगला है, गाडी है, पैसा है, शोहरत है, तुम्हारे पास क्या है?….मेरे पास तेरे जैसे चार…नर्तकी पूजा गायकवाडचा व्हिडिओ व्हायरल

सप्टेंबर 12, 2025
GST 4
महत्त्वाच्या बातम्या

७.५६ कोटी रुपयांची करचोरी…मुंबईत केपी क्रिएशन वर्ल्डचे अंकित गांधी यांना अटक

सप्टेंबर 12, 2025
Next Post
syrup

चक्क यापासून बनवतात कफ सिरप.... तब्बल १९ मुलांच्या मृत्यूस कारण...

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011