वैभव शिंगणे, नाशिक
गोदावरीच्या काठावर वसलेलेले एेतिहासिक शहर म्हणून नाशिकचा उल्लेख केला जातो. तर नाशिकचा प्रवास सांगतांना मंत्रभुमी ते यंत्रभुमी असे सांगितले जाते. पण, असे असले तरी नाशिकची खरी ओळख धार्मिक शहर अशीच आहे. देशोविदेशातून पर्यटक या शहराला भेट देत असतात. तिर्थश्रेत्रातही नाशिकचे वेगळे महत्व आहे. त्यामुळेच भाविक विविध धार्मिक विधीसाठी नाशिकला येत असतात. धार्मिक विधींच्या आधी वंशावळ बघितली जाते. वंशावळीस नामावळ असेही म्हणतात. नाशिक प्रमाणे इतर तिर्थांवरही वंशावळ लेखनाचे काम पुरोहिताच्या माध्यमातून केले जाते. केवळ पुरोहीतच नाही तर पुरोहितर कुंटुंब ही या व्यवयायात पिढ्यान पिढया काम करित आहेत. वेगवेगळया भाषा व वेगवेगळया लिखाणाच्या पध्दतीवरुन या वंशावळी लेखकांना संबोधले जाते. पुरोहित वंशावळी लेखकांचा उदर्निवाह यजमानांच्या धार्मिक विधिच्या दक्षिणेतून तर पुरोहिततर वंशावळी लेखकांचा उदर्निवाह यजमानांच्या वंशावळी देऊन मिळणा-या उत्पन्नातुन होतो. वंशावळी लेखनाचा व्यवसाय भारतीय दस्तनोंदणीच्या बराच आधी सुरु झाल्याने या वंशावळी लेखकांकडे मिळणारा इतिहास हा जुना व मार्गदशक ठरतो. जुन्या काळी दत्तक घेतल्याची नोंद व एकाच वंशाच्या एकाहून अधिक अडनावे (विविध पदव्यांना आडनावे लावण्याची प्रथा देशभरात होती.) नोंद केवळ वंशावळीतच आढळते आणि यातील मयत व्यक्तींचीही नोंद केवळ वंशावळच आढळते. यामुळे कोर्टकचेरीच्या कामात या वंशावळींचा उपयोग होतो. वंशावळीत प्रत्येक नोंदी खाली त्या त्या कुंटुंब प्रमुखाच्या व इतर सदस्याच्या सह्या व त्या दिवशीच्या दिनांकांची नोंद असल्याने याच्या सत्यतेच्या बाबतीत शंका घेतली जाऊ शकत नाही.
वंशावळ काय आहे.
वंशावळ हा संबधीत परिवाचा (वंशाचा) गोषवारा असतो. यात कुटुंबातील सभासदांची नावे. मुळ गाव, जात, पोट जात, गोत्र, कुलदेवी, कुलदेवता, यांची नोंद असते. यासह परिवारातिल लहान मोठया घडामोडी यांची ही नोंद काही वंशावळी लेखक ठेवतात.
वंशावळी लेखनाची सुरुवात
वंशावळी लेखनाची सुरुवात राजपरिवारातील सदस्यांच्या नोंदी ठेवण्यापासून झाली. पण नंतर त्याची लोकप्रियता वाढल्याने उच्चभ्रु ते सर्वसामान्य असा प्रवास झपाट्याने झाला. वंशावळी लेखनाची सुरुवात कधी झाली ? हे नक्की सांगता येणार नाही, पण कमीत कमी १०० ते ३५० वर्षे झाली असावी असा कयास आहे. शिवाजी महाराजांची वंशावळ ही असस्तिवात असल्याने असे सांगता येईल.
कोण आहेत वंशावळी लेखक
अशी व्यक्ती की जिच्याकडे स्वत:च्या वडिलोपार्जित वंशावळी आल्या आहेत किंवा कोणीतरी सोपवल्या आहेत व तो आजही वंशावळीत नवीन भर सातत्याने करतो त्यास वंशावळी लेखक म्हणतात.
वंशावळी लेखनाच्या दोन पद्धती
१) घरी जाऊन केलेल्या नोंदी
२) तिर्थक्षेत्रावर झालेल्याच्या नोंदी
भाषा
मराठी भाषिकाची नोंद मराठीत तर इतर भाषिकांची नोद हिंदीत घेतली जाते. याचे कारण झालेली नोद यजमानांना कळावी यासाठी ही पद्धत असते.
वंशावळी लेखकांच्या तीन नोंदी
१) वही
२) वंशावळ किंवा नामावळ
३) गोषवारा
वही
हा सर्वात महत्वाचा दस्त असतो. यास नामावळीचा आत्मा म्हणतात. कारण यात यजमानांच्या सह्या असतात.
वहीची नोंद या प्रकारे.
घरी जाऊन नोंद केल्यास कुटुंब प्रमुखापासून सुरुवात केली जाते. तर तिर्थक्षेत्रावर विधिंसाठी आलेल्या यजमानापासून सुरुवात केली जाते.
असा असतो क्रम
नाव, वडील, आजोबा, आई, पत्नी, मुले, भाऊ, व त्यांची मुले असल्यास, भावाची नातवंड असल्यास, काका व त्याची मुले असल्यास, काकांची नातवंड असल्यास. मुळ गाव, जात, पोट जात,गोत्र,कुलदेवी,कुलदेवता,सध्याचा वास्व्याचा पत्ता त्याखाली सही व दिनांक. पूर्वी कुटुंबातील अविवाहीत मुलींची लग्न फार कमी वयात होत होती व लग्नानंतर सासरी त्यांची वंशावळीत नोद होतच होती. त्यामुळे त्यांची नोंदी वंशावळीत होत नव्हती. पण बदलत्या काळात मुलीचीच्याही नावांचा समावेश वंशावळीत हळुहळु होऊ लागला आहे.
याप्रमाणे नोंद झाल्यावर खाली दोन रेषामारुन रेषाखाली दुस-या वंशाची नोद केली जाते. या प्रमाणे एका खाली एक नोंद केली जाते, जोपर्यंत वही भरत नाही. वही भरल्यावर नव्या वहीत नोंद घेण्यास सुरुवात केली जाते.
वहीची लांबी
वही ची लांबी २ बित लांब तर १ बित रुंद असते. नामावळीत वही वरील सर्व बाबींचा जसाचा तसा उतारा असतो. नामावळीत ज्या वहीच्या ज्या पानावरुन उतारा घेण्यात आला आहे त्या वहीचे व पानाचे उल्लेख असणे आवश्यक असते.
नामावळीची रचना
नामावळीत वरच्या वरच्या बाजुला डाव्या बाजुला वही पान असणे आवश्यक असते. नंतर जात व मुळगावाचा उल्लेख असतो.ज्या गावांच्या किंवा जातींच्या नोंदी जर वंशावळी लेखकांकडे जास्त असतील, तर त्यांची स्वतंत्र नामावळ असते पण जर कमी नोंदी असतील तर त्याच्या नोंदी एकत्र ठेवल्या जातात.
नामावळींत नावे शोधण्याची पध्दत
नाममावळी तीन प्रकारच्या असतात
१) मुळ गावाच्या नामावळी
यात मुळ गावाच्या आधारेच नामावळी बनवल्या जातात कारण सध्याच्या वास्तव्याच्या गावांवर नामावळी बनवणे शक्य नसते. कारण हल्लीच्या काळात एकाच वंशाताल लोक ऐकाच गावात किंवा शहरात वास्तव्यास नसतात. काही लोक नोकरी किंवा अन्य कारणाने राहण्याची गावे बदलतात. त्यामुळे मुळ गावांवरुन नामवळी लिहिल्या जातात.
या प्रकारात मुळ गाव केंद्र मानुन नामावळ केली जाते. पण यात जात उपजात यांचा उललेख असतोच. मोठी गावे स्वतंत्र पानावर तर छोटी गावे एकत्र लिहिली जातात.
मराठी वर्णमाले नुसान नामावळींची रचना असते.
उदा क,ख ग,घ इत्यादी
क या अक्षरापासुन सुरु होणारी गावे क च्या नामावळीत,ख या अक्षरापासुन सुरु होणारी गावे ख च्या नामावळीत असतात. ई
२) जातिंच्या नामावळी
या नामावचळींचा केंद्र बिंदु जात असते. मुख्य जातिच्या नामावळी असतात. तर त्यात पोट जाती मराठी वर्णमाले नुसार असतात.
उदा क,ख ग,घ इत्यादी
क या अक्षरापासुन सुरु होणारी क अक्षरापासुन सुरु होण्या-या पोट जाती क च्या नामावळीच्या पानांवर, ख या अक्षरापासुन सुरु होणारी क अक्षरापासुन सुरु होण्या-या पोट जाती ख च्या नामावळील्या पानांवर.
३) बिडवळ नामावळी
ही नामावळ कमी नोदी असलेल्या जातींसाठी असते. यात जात केंद्र मानुन त्याच्या खालोखाल पोट जात जातिंचा समावेश असतो.
वरिल सर्व प्रकारात माहितीची सारखिच असते. पण नामावळीचा केंद बदलतो इतकाच फरक असतो.
नामावळी लिहिण्याची पद्धत
एकखादा वंशचा समावेश वरील ल प्रकारे कोणत्या प्रकारात करावा याचे निश्चीत असे धोरण असते व ते कधीच बदलले जात नाही. वहीतील वंशाचा इतिहास कुळे लिहायचा याचे निश्चीत असे धोरण असते व प्रत्येक वंशावळी लेखक आपल्या पुढच्या पिढीला हे धोरण शिकवत असतो. प्रत्येक वंशाच्या एका वेळच्या संपूर्ण माहितीला लेख असे म्हणतात. लेख नामावळीत नोंदवण्याची प्रक्रीया चुकली तर तो लेख कधीच सापडत नाही. त्यामुळे तज्ञ वंशावळी लेखक याचे निर्णय घेत असतात. शिकाऊ वंशावळी लेखक केवळ माहिती घेत असतात. ते या प्रक्रियेत विद्यार्थ्याच्या भूमिकेत असतात.
नामावळीची गरज
वहयांवर त्या भरेपर्यंत सर्व यजमानांची नाव असतात. त्यामुळे ठराविक नावे शोधण शक्य नसते. वहीत केवळ ज्या दिवशी नोंद केली त्या दिवशीच्या तारखाच्याच आधारे नावे शोधली जाऊ शकतात. सर्व तारखा लक्षात कोणाच्याच नसतात. त्यामुळे गाव किंवा जाती वरुन केवळ नामावळीतूनच नावे शोधता येतात. वह्या हया खुप महत्वाच्या असल्याने खूप वापरल्याने फाटतात. नामावळ फाटल्यास बनवता येते पण वही बनवता येत नाही. कारण यात सह्या असतात. नामावळच्या कमी पानात संपूर्ण वंशाचा इतिहास सामावला जातो तर हाच इतिहास वहितून शोधणे अशक्य असते.
नामावळी साठवण्याच्या पद्धती
एक मऊ कापड तिरपे ठेउन एक नामावळीच्या आकाराच प्लाऊड घेउन एकावर एक नामावळ ठेवली जाते.त्यावर दुसरा प्लाऊड ठेऊन कापडाची विशिष्ट अशी गाठ मारली जाते. सर्व नामावळींचे सारखे गठ्ठे करुन मग ते कपाटात ठेवले जातात. कोणतीही नामावळ कापडाने बांधल्या शिवाय कपाटात ठेवली जात नाही, कारण धुळी ने नामावळ. खराब होते आणि फाटुही शकते
नामावळींची मापे व बांधणी
नामावळींची बांधणी वह्यांप्रमाणेच असते त्यामुळे वही तयारा करणे व नामावळ तयार करणारे कारागिर एकच असतात.
नामावळींचा पुठ्ठा
हा चामडयाचाच असतो व तो असावा असा संकेत आहे. रेक्झीच्या आवरणाने नामावळीफार टिकत नाही असा अनेकांचा अनुभव आहे.
नामावळींचा कागद
नामावळींचा कागद केवळ हँडमेड असावा असा संकेत आहे कारण हा कागद हलका असल्याने टिकतो व तुकडाही लवकर पडत नाही.
नामावळीची समस्या
कोणत्याही नामावळीं या ५० वर्षात खराब होत असल्याने त्या नवीन करण्याचा खर्च व वेळ जातो. ऐवढे करुनही काही पान खराब झाल्याने नवीन नामावळीत त्यांचा समावेश करणे कठीण जाते.
इंडेक्स
आजकालच्या परिस्थितीत गावाची व पोटजातींची अचुक माहिती सांगणे यजमानांना अवघड जात आहे. या समस्येवर उपाय म्हणुन इंडेक्स केली जाते. संपूर्ण वर्षभरात ज्या यजमानांची नोद झाली त्यांची इंडेक्स केली जाते. यामुळे केवळ तारखच्या आधारे नोंद शोधून त्या नोंदीच्या आधारे मुळ गाव जात उपजातिची माहिती घेऊन संपूर्ण इतिहास सांगितला जातो.
इंडेक्सची रचना
यात वही पान क्रमांक गाव जात आडनाव यजमानांचे नाव, वडील, अजोबा, पंजोबाची नावे, भेटीचे कारण, व हल्लीचे गाव यांचा समावेश असतो. इंडेक्सचा उपयोग केवळ नोद शेधण्यासाठीच होतो. वंशाचा इतिहास सांगण्यासाठी नामवळींचाच आधार घ्यावा लागतो.
शोध वही
याचा उपयोग केवळ नोंद शोधण्यासाठी आवश्य असलेल्या माहितीचे त्या दिवसा पुरता साठवण्यासाठी होतो. एकाच दिवशी अनेक यजमानांच्या नोंदी शोधायच्या असल्याने विस्मरण किंवा गडबड होऊ शकते म्हणून शोध वहीचा उपयोग केला जाते. वही भरली की ठेऊन दिली जाते कारण त्या वहीचा नंतर उपयोग शून्य असतो.या वहीत त्या दिवसाचा संपूर्ण लेखाजोखा असतो.
नामावळी साठी तंत्रज्ञानाचा उपयोग व समस्या
नामावळी साठी लागणारा कागदचा वाढत जाणार आभाव,शिलाईचे साठी लागणा-या कारागिरांची मंदावत जाणारी संख्या, दुर्मिळ होत जाणारा चांबड्याचा पुठ्या,व ऐवढे करुनही कालांतराने फाटत जाण्याची नामावळींची समस्या यावर उपाय म्हणून काही वंशावळी लेखकांनी संगणकीय प्रणालीचे उपयोग करुन वहिचे पान स्कॅन करुन सॉफ्टवेअरच्या मदतीने यजमानांना दाखवण्याची प्रक्रिया आवलंबली आहे. पण जुन्या वंशावळी लेखकांचा विश्वास आजही पारंपारीक नामावळींवरच आहे. यजमान ही नामावळी संकणकीय करा असा सल्ला देत असले. तरी पंरंपारीक नामावळीतून नाव बघण्याचे समाधान संगणकाच्या स्क्रीन वर मिळेल असे काही वाटत नाही. याचे कारण म्हणजे परिवारातील मोठी माणसे आपल्या मुलाबाळांना नामावळी बघायला घेऊन येतात आणि ते विस्मयचकित होऊन सर्व काही बघतात. ते कुतूहल संगणकीय प्रणालित राहिल का ? हा प्रश्नच आहे.
हाच खरा यक्ष प्रश्न आहे.
जुनी हस्ताक्षर,विविध समाजातिल साचेबद्ध नावे,विविध प्रांतातील गावांची समज, विविध समाजातील जात उपजातीची समज वंशावळी लेखानांच्या शिवाय इतर कोणालाही नसल्याने वंशावळी संगणकीय प्रणालित आणण्यासाठी कोणाची मदत घ्यावी हा प्रश्न वंशावळी लेखकांच्या समोर गंभीर आहे. वंशावळींची संख्या व त्यातील माहिती बघता वंशावळी लेखकांना तज्ञांच्या मदतीची गरज आहे व ती मिळत नाही. ही फार मोठी समस्या आहे.वहीची लांबी व शिलाई ही देखील मोठी समस्या आहे. लांबीमुळे पाने स्कॅन करणे व वही उघडून पाने स्कॅन करावी लागत असल्याने स्कॅन झाल्यानंतर वही जशिच्या तशी शिवण्यासाठी कारागिरांचा आभाव आहे. नावे टाईप करणे फार वेळ खाऊपणाचे होत आहे. व्हाईस टाईप करावे तर जसेच्या तसे टाईप होत नाही. फारसे कोणाला वंशावळी बद्दल माहिती नसल्याने सॉफ्टवेअर बनवणारे मिळत नाही आणि मिळाले तर परवडत नाही. एकुणच काय हा वारसा टिकावा यात संशय नाही पण इतक्या समस्यांवर मात करुन टिकेल का ? हाच खरा यक्ष प्रश्न आहे.