पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पुण्यामध्ये नाना पेठमधील डोके तालीमच्या समोर साडेआठच्या सुमारास राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्यावर कोयत्याने वार करत गोळीबार करण्यात आला. आंदेकर यांच्यावर पाच गोळ्या झाडल्यावर कोयत्याने वार करण्यात आले.
वनराज आंदेकर यांना केईएम या दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती गंभीर आहे. हा गोळीबार घरगुती वादातून झाल्याचे बोलले जात आहे.
हा गोळीबार करण्याअगोदर परिसरातील लाईट घालवण्यात आले. त्यानंतर दुचाकीवर आलेल्या तीन ते चार जणांनी ते एकटे असल्याचे पाहून हल्ला केला. वनराज यांच्यावर आधी कोयत्याने वार केले आणि त्यानंतर गोळीबार केला. वनराज आंदेकर रक्ताच्या थारोळ्यात पडले असताना तिथून हल्लेखोरांनी पळ काढला.