मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) –वंचित बहुजन आघाडीने राज्यातील विधानसभेसाठी १६ उमेदवारांची चौथी यादी जाहीर झाली आहे. या अगोदर पहिली यादी ११ उमेदवारांची होती. दुसरी यादी १० उमेदवारांची तर तिसरी यादी ३० उमेदवारांची होती. त्यामुळे आता वंचितचे ८१ उमेदवार आतापर्यंत जाहीर झाले आहे. राज्यात सर्वात प्रथम उमेदवार घोषीत करण्याचा निर्णय वंचितने घेतला असून त्यामुळे त्यांची चौथी यादी आतापर्यंत जाहीर झाली आहे.
आतापर्यंतच्या यादीत नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी येथील विधानसभा मतदार संघासाठी भाऊनाथ काशिनाथ डगळे, तर देवळाली मतदार संघातून अविनाश शिंदे यांना उमेदवारी दिली आहे.