इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – वंदे भारत एक्स्प्रेस आणि अपघात हे समीकरण ठरले आहे. प्राप्त माहितीनुसार, एका प्रवाशाने वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये धुम्रपान करणाऱ्याने इतर प्रवाशांचा जीव मेटाकुटीला आणल्याचा प्रसंग घडला आहे.
बुधवारी वंदे भारत ट्रेनच्या टॉयलेटमध्ये धुम्रपान करताना एका व्यक्तीला पकडण्यात आले आहे. धुर्मपानामुळे ट्रेनमधील फायर अलार्म वाजला आणि एरोसोल अग्निशामक यंत्रणा सुरू झाली, यामुळे ट्रेनमध्ये सर्वत्र धूर पसरला, अधिकाऱ्यांनी तपास केला असता एक व्यक्ती विडी ओढत असल्याचे आढळून आले. ही घटना तिरुपती-सिकंदराबाद वंदे भारत एक्सप्रेसमध्ये घडली. तो व्यक्ती ट्रेनच्या टॉयलेटमध्ये बसून विडी पीत होता. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
ज्यामध्ये ट्रेनच्या केबिनमध्ये सर्वत्र धूर दिसत असून प्रवाशांना ट्रेनमधून बाहेर काढले जात आहे. या घटनेमुळे रेल्वे सुमारे अर्धा तास थांबवावी लागली. ट्रेनमध्ये भूर पसरल्यामुळे ट्रेनला आग लागल्याचे वाटून प्रवाशांनी ट्रेनच्या काचा फोडल्याचे व्हिडिओत दिसत आहे. या घटनेनंतर आरोपी प्रवाशाला नेल्लोर येथे रेल्वे पोलीस दलाने ताब्यात घेतले असून त्याच्यावर रेल्वे कायद्यानुसार योग्य ती कारवाई करण्यात येईल. विशेष म्हणजे तो आरोपी विना तिकीट प्रवास करत होता.
यापूर्वी घडलेय अपघात
काही महिन्यांपूर्वी भारतातील सर्वात आधुनिक ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ सुरू झाली. रेल्वे विभागाकडून एक-एक करत या ट्रेन्सची संख्या वाढवली जात आहे. पण, ही ट्रेन सुरू झाल्यापासून ट्रेनबाबतीत कोणती ना कोणती घटना घडत आहे. कधी ट्रेनला जनावरे धडकत आहेत तर कधी दगड मारून काचा फोडल्या जात आहेत. आता परत एकदा या ट्रेनमध्ये धक्कादायक घटना घडली आहे.
vande bharat express smoke cigarate passengers video
train railway