मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – बहुप्रतिक्षित मुंबई–साईनगर शिर्डी वंदे भारत एक्स्प्रेसला प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभतो आहे. पण, त्याचवेळी या न्यू जनरेशन रेल्वेगाडीतील सेवांबावत अनेक त्रुटीही समोर येत आहेत. प्रवाशी या गाडीतील अनुभव सोशल मिडियावरून शेअर करीत आहेत. बहुतेकांनी गाडीतील समस्यावरच बोट ठेवले आहे.
वंदे भारत एक्स्प्रेसबाबत मुंबईकरांची उत्सुकता चांगलीच ताणली गेली होती. नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते मुंबई -साईनगर शिर्डी वंदे भारत एक्स्प्रेसचे उद्घटन पार पडले. या गाडीतून प्रवास करीत प्रवासी आणि साईभक्त आपली हौस भागवून घेत आहेत. गाडीतील सेवांमधील त्रुटीही समोर येऊ लागल्या आहेत. एका प्रवाशाने कॉर्नफ्लेक्सची ऑर्डर दिली. मात्र, त्यात धुळमिश्रित कॉर्न्स असल्याचे निदर्शनास आल्याने सोशल मीडियावर संताप व्यक्त होत आहे. दरम्यान, रेल सेवेनेही तातडीने या तक्रारीची दखल घेतली आहे.
खाद्यपदार्थांचा दर्जा सुमार
वीरेश नारकर या प्रवाशाने रविवारी ट्विटरवर एक फोटो शेअर करून साईनगर शिर्डीला जाताना ट्रेनमध्ये दिल्या जाणाऱ्या जेवणाच्या दर्जाबाबत तक्रार केली आहे. खाद्यपदार्थाचा दर्जा सुधारला पाहिजे. भारतात धूळयुक्त कॉर्नफ्लेक्स नंबर प्रथम क्रमांकाची पसंती मिळत आहे, असा उपरोधिक टोला त्यांनी लगावला आहे. वंदे भारतला एक्झिक्युटिव्ह क्लास ट्रेनच्या मधोमध दिला आहे. हा डबा गाडीच्या शेवटी किंवा सुरुवातीला असावा, अशी सूचना त्यांनी केली आहे. अन्य एका प्रवाशाने एक्झिक्युटिव्ह क्लासमध्ये सर्व्ह केल्या जाणाऱ्या अन्नाचा वास येत असल्याचे तक्रार नोंदवली आहे.
फक्त पाणी, लोणचे चविष्ट
आणखी एक प्रवासी उदय पटवर्धन यांनी एक्सप्रेसच्या दरवाजांच्या उघडझाप संदर्भात तक्रार नोंदविली आहे. ट्रेन सुरू होताच दरवाजे बंद होतात, त्यामुळे प्रवाशांना उतरण्याची आणि नंतर चढण्याची घाई करावी लागते. प्रवाशांना सेवा देणाऱ्या वेटरचा सतत राबता असतो. यामुळे केबिनचे दार उघडते. बहुतेक वेळा ते उघडेच राहत असल्याने एअर कंडिशनिंगचा प्रभाव कमी होतो. ट्रेन स्वच्छ आहे, अर्थातच ती नवीन आहे, अशीच स्वच्छता कायम ठेवूया, असे त्यांचे म्हणणे आहे. गाडीत अन्न मिळाले, पण भात कमी शिजला होता, भाजी हाफ प्लेट मिळीली, पराठाही कमी शिजलेला होता, फक्त पाणी, लोणचे आणि दही चांगले होते, असे या प्रवाशाचे म्हणणे आहे.
https://twitter.com/vireshnarkar/status/1624622243706986496?s=20&t=-DoEqovjso777vysOIFMLQ
Vande Bharat Express Passengers Bad Experience Observations