मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) -वंचित बहुजन आघाडीने राज्यातील विधानसभेसाठी ३० उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली आहे. पहिली यादी ११ उमेदवारांची होती. आता दुसरी यादी १० उमेदवारांची आहे. त्यामुळे वंचितचे ५१ उमेदवार आतापर्यंत जाहीर झाले आहे. राज्यात सर्वात प्रथम उमेदवार घोषीत करण्याचा निर्णय वंचितने घेतला असून त्यामुळे त्यांनी तीन याद्या आतापर्यंत जाहीर केल्या आहे.
या यादीत नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी येथील विधानसभा मतदार संघासाठी भाऊनाथ काशिनाथ डगळे, तर देवळाली मतदार संघातून अविनाश शिंदे यांना उमेदवारी दिली आहे.