इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
पुण्यातील मध्यवर्ती स्वारगेट बस डेपोमध्ये तरुणीवर झालेला अत्याचार ही अत्यंत गंभीर घटना आहे. राज्याचे मुख्यमंत्री बदलले पण, परिस्थिती तशीच आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात राज्यातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न सातत्याने उपस्थित होत असून, देशात महिलांच्या सुरक्षेसाठी सरकारने ठोस उपाययोजना करण्याची आवश्यकता असल्याचे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले की, पुण्यातील स्वारगेट सारख्या सार्वजनिक ठिकाणी असलेल्या बस डेपोवर महिला सुरक्षित नाहीयेत तर महिला सुरक्षित आहेत कुठे?
या अत्याचार प्रकरणात पोलीस कारवाईच्या आधीच उलटसुलट चर्चा करताय. महिलेला परत अपमानित करू नका. कधीही पीडितांना ब्लेम केले जात नाही. स्वारगेट प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करावी.
पोलिसांची आठ पथके
स्वारगेट परिसरात शिवशाही बसमध्ये तरुणीवर सोमवारी पहाटे बलात्कार झाला. पीडित तरुणी पुण्याहून फलटणला जाण्यासाठी स्वारगेट बस स्थानकावर आली होती. त्यावेळी हा सर्व प्रकार घडला. दत्तात्रय रामदास गाडे असे आरोपीचे नाव आहे. या आरोपीचा शोध घेण्यासाठी आठ पथक रवाना झाली आहे. या प्रकरणानंतर कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.