नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – रिलायन्स आणि जिओने देशातील सर्वात मौल्यवान ब्रँड्सच्या यादीत पहिल्या पाचमध्ये स्थान मिळवले आहे. टीसीएस, रिलायन्स, इन्फोसिस, एचडीएफसी, जिओ हे टॉप ५ भारतीय ब्रँड आहेत. इंटरब्रँड या जगातील आघाडीच्या ब्रँड कन्सल्टन्सी कंपनीने भारतातील टॉप 50 सर्वात मौल्यवान ब्रँडची यादी जाहीर केली आहे. 1,09,576 कोटी रुपयांच्या ब्रँड व्हॅल्युएशनसह टीसीएस या यादीत अव्वल स्थानावर आहे.
इंटरब्रँडच्या यादीत रिलायन्सला दुसरे तर जिओला पाचवे स्थान मिळाले आहे. रिलायन्सची ब्रँड व्हॅल्यू अंदाजे 65,320 कोटी रुपये आहे. तर जिओ 49,027 कोटी ब्रँड व्हॅल्यूएशनसह पाचव्या स्थानावर आहे. विशेष म्हणजे, जिओने प्रथमच या यादीत स्थान मिळवले आहे, तर दूरसंचार कंपनी एअरटेल सहाव्या क्रमांकावर जिओच्या मागे आहे. आयटी कंपनी इन्फोसिस 53,323 कोटी रुपयांच्या ब्रँड व्हॅल्यूसह तिसऱ्या स्थानावर आहे आणि देशातील सर्वोच्च खासगी बँक एचडीएफसी 50,291 कोटी रुपयांच्या ब्रँड मूल्यासह चौथ्या स्थानावर आहे.
इंटरब्रँडच्या डेटावरून असे दिसून आले आहे की यादीतील 50 कंपन्यांचे एकत्रित ब्रँड मूल्यांकन प्रथमच $100 अब्ज ओलांडले आहे. टॉप 3 ब्रँड्सचे ब्रँड व्हॅल्यू म्हणजेच TCS, रिलायन्स आणि इन्फोसिस या यादीतील टॉप 10 कंपन्यांच्या एकूण ब्रँड व्हॅल्यूच्या 46 टक्के असल्याचा अंदाज आहे. त्याच वेळी, पहिल्या दहा कंपन्यांच्या ब्रँडचे एकूण ब्रँड मूल्य यादीतील उर्वरित 40 ब्रँडच्या एकत्रित मूल्यापेक्षा जास्त आहे.
एलआयसी, महिंद्रा, एसबीआय आणि आयसीआयसीआय देखील टॉप 10 सर्वात मौल्यवान भारतीय ब्रँडमध्ये सामील आहेत. याशिवाय टाटा, अदानी, मारुती सुझुकी, आयटीसी, बजाज ऑटो, अमूल, डाबर, पतंजली आणि ब्रिटानिया या ब्रँडचाही पहिल्या 50 यादीत समावेश आहे.
Valuable Top 5 Indian Brands