नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सटाणा तालुक्यातील ‘नळकस’ गावात प्रेम आणि त्यागाचे प्रतीक असलेल्या ‘ नल – दमयंती ‘ या महाभारतात युगातील प्रेमवीरांचे मंदिर आहे. आज जागतिक व्हॅलेंटाईन डे अर्थातच प्रेमाचा दिवस त्यामुळे जिल्ह्यातील हे मंदिर चांगलेच चर्चेत आहे. राज्यात नळदुर्ग नंतर हे नल- दमयंती मंदिर नळकस येथे आहे.या मंदिरात ग्रामस्थ मनोभावे आराधना करतात. विदर्भाचा राजा असलेल्या नल व दमयंती यांनी एकमेकांना न पाहता स्वच्छ मनाने एकमेकांवर प्रेम केले. दमयंती राणी स्वयंवरातही तिने नल राजाला बरोबर ओळखून स्वयंवर केले. मात्र नंतर पुढे छळ कपटाने नल राजाचे राज्य गेले. अशा बिकट परिस्थितीतही दमयंती त्यांची साथ सोडली नाही. त्या काळात नाशिक दंडक अरण्यात असतांना त्यांची ताटातूट झाली. पुन्हा त्यांची ‘नळकस ‘ येथे भेट झाली. ते परिसराच्या प्रेमात पडले. आणि काही काळ त्यांनी येथेच वास्तव केले. त्यांच्या वास्तव्याचा अनमोल ठेवा जतन करण्यासाठी ग्रामस्थांनी या ठिकाणी त्यांचे मंदिर उभारले अशी आख्यायिका आहे.
या ठिकाणी दोघांच्या प्रेमाचा कस लागला म्हणून या गावाचे नाव ‘नळकस ‘ पडले पुढे ग्रामस्थही नल दमयंतीच्या प्रेमात पडले या ठिकाणी ग्रामस्थानी स्वयं निधीतून ‘नल- दमयंती’ नावाने मंगल कार्यालय उभारले. या ठिकाणी नाममात्र दरात सात – जन्म सोबत राहण्याच्या आना – भाका वधू-वर घेतात. गावकरी मनोभावे त्यांना पुजतात. महाशिवरात्रीला येथे नल – दमयंतीच्या नावाने यात्रा भरते. राज्यात नळ दुर्ग दुसरे मंदिर येथे असल्याने राज्यासह अनेक जण येथे आवर्जून हजेरी लावतात .या मंदिराचे जीर्णोद्धार करण्याचा मनोदयही ग्रामस्थ बोलून दाखवीत आहे. आज व्हॅलेंटाईन डे जगभरात प्रेम दिवस साजरा केला जात असतांना या मंदिराची पुन्हा चर्चा होऊ लागली आहे.
बघा, या मंदिराचा व्हिडिओ