इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – व्हॅलेंटाईन डे तरुण-तरुणींसाठी अत्यंत महत्वाचा मानला जातो, इतकेंच नव्हे तर आजच्या काळात हा स्पेशल डे अनेक जण साजरा करतात, त्यामुळेच अॅमेझॉनवर व्हॅलेंटाईन डे स्टोअर सुविधा थेट करण्यात आली आहे. या स्टोअरमधून स्मार्टफोनसह इलेक्ट्रॉनिक उत्पादने स्वस्तात खरेदी आणि भेट देऊ शकता. विशेष म्हणजे या सेलसाठी अॅमेझॉन कंपनीकडून मोठ्या सवलती आणि डील्स ऑफर केल्या जात आहेत. अॅमेझॉनवर व्हॅलेंटाईन डे स्टोअर हे भेटवस्तू खरेदीसाठी एक-स्टॉप डेस्टिनेशन आहे. या स्टोअरमध्ये iQOO, OnePlus, Samsung, Xiaomi सह अनेक दिग्गज स्मार्टफोन सवलतीत उपलब्ध आहेत.
Samsung Galaxy M52
या फोनची किंमत – 29,999 रुपये असून यामध्ये 6.7-इंचाचा Infinity-O डिस्प्ले आहे. हा फोन FHD प्लस सुपर AMOLED डिस्प्ले सह येईल. त्याचा रिफ्रेश दर 120Hz असेल. Galaxy M52 5G स्मार्टफोनमध्ये 6nm स्नॅपड्रॅगन 778G चिपसेट समर्थित आहे. फोन ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप सह येईल. त्याचा मुख्य कॅमेरा 64MP आहे. याशिवाय 12MP अल्ट्रा-वाइड अँगल लेन्स देण्यात आली आहे. तसेच 5MP मॅक्रो लेन्स उपलब्ध आहे. सेल्फीसाठी 32MP कॅमेरा देण्यात आला आहे. पॉवर बॅकअपसाठी फोनमध्ये 5000mAh बॅटरी देण्यात आली आहे. फोन 25W फास्ट चार्जिंग सपोर्टसह येईल. हा फोन Android 11 आधारित One UI 3.1 वर काम करतो.
Xiaomi 11T Pro 5G
या स्मार्टफोनची किंमत – 39,999 रुपये असून यामध्ये 6.67 इंच फुल एचडी प्लस AMOLED डिस्प्ले आहे. त्याचे रिझोल्यूशन 1,080×2,400 पिक्सेल आहे. तसेच या फोनला 120Hz डायनॅमिक रिफ्रेश रेट सपोर्टसह येईल. फोन ऑक्टा-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 888 SoC प्रोसेसरसह येतो. या फोनला ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. त्याचा प्रॉयमरी कॅमेरा 108-मेगापिक्सलचा आहे. याशिवाय 8-मेगापिक्सलची अल्ट्रा-वाइड लेन्स देण्यात आली आहे. तसेच 5-मेगापिक्सलची टेलीमॅक्रो लेन्स देण्यात आली आहे. या फोनमध्ये 16-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे. या फोनला 5,000mAh ड्युअल सेल बॅटरी देण्यात आली आहे. जे 120W हायपरचार्ज फास्ट चार्जिंग सपोर्टसह येईल.