शुक्रवार, नोव्हेंबर 14, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

वैनगंगा नळगंगा नदीजोड प्रकल्प अंतिम टप्प्यात… संपूर्ण विदर्भाला असा होणार फायदा…

जलअभ्यासक डॉ. प्रवीण महाजन यांच्या प्रयत्नांना यश

मार्च 7, 2023 | 11:50 am
in इतर
0
E52ASY3UUAIS db e1678169903629

इंडिया दर्पण विशेष लेखमाला
– आपलं पर्यावरण –
वैनगंगा नळगंगा नदीजोड प्रकल्प आणि जलसमृद्ध विदर्भ

विदर्भाला सुजलाम – सुफलाम करणारा वैनगंगा – नळगंगा नदी जोड प्रकल्प प्रशासकीय मान्यतेच्या अंतिम टप्प्यात पोहोचला. जलअभ्यास डॉ. प्रवीण महाजन यांनी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना 3 नोव्हेंबर 2014 ला पत्र देवून प्रथम मागणी केली होती, त्यानुसार या वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्प अहवाल बनवण्यासाठी भारत सरकारच्या, जलसंसाधन नदी विकास व गंगा संरक्षण मंत्रालय यांच्या राष्ट्रीय जलविकास अभिकरणाला जलसंपदा विभागाने कळविले होते. त्या सविस्तर अहवालावर महाराष्ट्र शासनाच्या राज्यस्तरीय तांत्रिक सल्लागार समिती कार्यालयातून 27 फेब्रुवारीला शासनास सर्व अभ्यास करून प्रकल्प साकारण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व परवानग्या देत, प्रशासकीय मान्यतेसाठी दाखल केलेला आहे. 3 लाख 71 हजार 277 हेक्टर असलेला हा भव्य दिव्य नदीजोड प्रकल्पासाठीची प्रशासकीय मान्यता प्राप्त होण्यासाठी आता काहीच घंटे बाकी आहेत.

Dr Pravin Mahajan
डॉ. प्रवीण महाजन
जल अभ्यासक
मोबाईल – 9822380111

वैनगंगा नदीवरील वाहून जाणारे पा़णी या प्रकल्पामुळे विदर्भाला मिळणार. 1772 दलघमी पाणी उपलब्ध होणार आहे. या नदीजोड योजनेतून सिंचनासाठी 1286 दलघमी पाणी राखीव ठेवले असून यात घरगुती वापरासाठी 32 दलघमी. औद्योगिक वापरासाठी 397 दलघमी. वैनगंगेपासून – नळगंगेपर्यंत पाणी जात असताना वाहन अपव्यय म्हणून 57 दलघमींची तरतूद करण्यात आली आहे.

वैनगंगा ते नळगंगा या नदीजोड योजनेचा कालवा 426.542 किलोमीटर असणार असून हे पाणी या कालव्याद्वारे थेट बुलढाणा जिल्ह्यातील नळगंगा पर्यंत जाणार आहे. या कालव्याला काही जोड कालवे सुद्धा असतील त्यातून 41 साठवण तलावात पाणी नेण्यात येईल. 31 साठवण तलाव नव्याने बांधण्यात येणार असून उर्वरित 10 तलाव अस्तित्वात आहेत त्यांचा समावेश करण्यात आला, यातील काही तलावांची उंचीही वाढविण्यात येणार आहे.

गोसीखुर्द धरण ते नळगंगा धरण या 426.542 किलोमीटर लांबीच्या कालव्यावर 7 बोगद्यांची योजना असून या बोगद्यांचे अंतर 13.83 किलोमीटर राहील, काही ठिकाणी पीडीएनच्या माध्यमातून 25.98 किलोमीटर पाणी जाईल. 386.73 किलोमीटरचा कालवा हा खुला असेल. या सर्व योजनेत 6 ठिकाणी पंपांच्या साह्याने पाणी उचलून टाकण्यात येणार असून या लिफ्टची उंची 155 मीटर असेल.

88 हजार 575 कोटी रूपये किंमत असलेला हा विदर्भातील सर्वात मोठा प्रकल्प असेल. काही दिवसातच प्रशासकीय मान्यता प्राप्त होवून या भव्य दिव्य नदी जोड प्रकल्पाची सुरुवात होईल. राज्यस्तरीय तांत्रिक सल्लागार समिती जलसंपदा विभाग नाशिक यांनी 27 फेब्रुवारीला मान्यता देऊन या प्रकल्पा ला हिरवी झेंडी दिली असेच म्हणावे लागेल. या प्रकल्पासाठी भूसंपादन हे 28 हजार 41. 30 हेक्टर जमीन लागणार असून त्यात खाजगी जमीन 18768 हेक्टर असेल. शेतजमिनी 7591.80 हेक्टर आहे. खाजगी जमीन 18768 हेक्टर लागणार आहे. 395.30 हेक्टर वन जमिनीची आवश्यकता या प्रकल्पासाठी राहील. पडीक असलेली जमीन 736.50 हेक्टर असेल. या नदी जोड मार्गावर शासनाची असलेली 609 हेक्टर जमीन लागणार आहे. 201.80 हेक्टर जमीन ही रहिवासी क्षेत्रातली येत आहे, तर जलसाठे असलेली 38.90 हेक्टर जमीनीचा यात समावेश असेल.

https://twitter.com/Dev_Fadnavis/status/1607699187671437314?s=20

वैनगंगा – नळगंगा नदी जोड मार्गावर सहा जिल्हे येत असून, 15 तालुक्यांचा यात समावेश होत आहे. या नदीजोड प्रकल्पामुळे 26 गावे पूर्णता बाधित होणार असून 83 गावे हे अंशता बाधित होतील असा पूर्व अंदाज आहे. संपूर्ण 109 गावांतर्गत 11166 गावकरी बंधू बाधित होणार असून यात एकूण कुटुंब संख्या ही 2646 असेल.

आज विदर्भासाठी, विदर्भातील शेतकरी बांधवांसाठी, दहा-पंधरा दिवस पिण्यासाठी पाणी नसणाऱ्या भागातील भगिनींसाठी, नागरिकांसाठी हा आनंदाचा क्षण आहे, अनेक दिवस वैनगंगा – नळगंगा नदीजोड प्रकल्पाला प्रशासकीय मान्यता कधी मिळते याची आतुरतेने आम्ही वाट पाहत होतो. तो सुदिन लवकरच उगवणार हे ऐकून आनंद झाला. 2014 ला मी नदीजोड प्रकल्पाची केलेली मागणी विदर्भासाठी वरदान ठरणार. या अनुभवाने आज मन सुखावत आहे. गेली 8 वर्ष सतत दोन्ही सरकारच्या माध्यमातून या प्रकल्पाला रेटण्याचा सातत्याने केलेला प्रयत्न, आज फळाशी आला आहे. हा प्रकल्प जेव्हा प्रत्यक्षात पूर्ण होईल तेव्हा मी केलेल्या प्रयत्नाला खऱ्या अर्थाने खूप मोठे यश प्राप्त झाले असे समजेल. यासाठी मी माझे मित्र मा. ना. देवेंद्रजी फडणवीस यांचे आभार मानतो व धन्यवाद देतो. तत्कालीन जलसंपदा मंत्री मा. जयंतराव पाटील यांचेही आभार मानतो व धन्यवाद देतो. 8 वर्षात ज्यांनी ज्यांनी नदीजोडसाठी मदत केली ते जलसंपदाचे सर्व अमुस, सचिव काडा, सचिव प्रकल्प समन्वयक, कार्यकारी संचालक, मुख्य अभियंता, अधिक्षक अभियंता व जलसंपदातील अभियंते व कर्मचारी यांना धन्यवाद देतो..

https://twitter.com/MahaDGIPR/status/1607776178835972097?s=20

डॉ. प्रवीण महाजन
????जल अभ्यासक,
????डॉ. शंकररावजी चव्हाण राज्यस्तरीय जलभूषण पुरस्कार्थी, महाराष्ट्र शासन.
????स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवा अंतर्गत चला जाणूया नदीला राज्यस्तरीय समिती सदस्य, महाराष्ट्र शासन.
Vainganga Nalganga River Linking Project Vidarbha Development by Dr Pravin Mahajan

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

सावधान! देशात नव्या फ्लूची साथ… अशी घ्या काळजी… हे घेऊ नका… डॉक्टरांनाही इशारा

Next Post

अवघ्या एक रुपयात तब्बल ३९ वर्षे रुग्णसेवा… पद्मश्री डॉ. रवींद्र व डॉ. स्मिता कोल्हे यांना भेटण्यासाठी येथे नक्की या…

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा शुक्रवारचा दिवस… जाणून घ्या, १४ नोव्हेंबरचे राशिभविष्य…

नोव्हेंबर 13, 2025
Vishwadharmi Manavta Teertha Rameshwar Rui
महत्त्वाच्या बातम्या

उध्वस्त मंदिर व मशिदीच्या जागी ‘विश्वधर्मी मानवतातीर्थ भवन’… उद्या होणार लोकार्पण… अशी आहेत त्याची वैशिष्ट्ये…

नोव्हेंबर 13, 2025
traffic signal1
महत्त्वाच्या बातम्या

अहिल्यानगर – मनमाड मार्गावरील वाहतुकीबाबत झाला हा महत्वाचा निर्णय…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0024
मुख्य बातमी

कुंभमेळ्यासाठी साडेपाच हजार कोटी रुपये खर्चाच्या विकासकामांचे भूमीपूजन…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0023
महत्त्वाच्या बातम्या

पंचवटीतील रामकाल पथचे मुख्यमंत्र्यांनी केले भूमीपूजन… रामकुंडाचा चेहरामोहरा बदलणार…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0021
महत्त्वाच्या बातम्या

नाशिक जिल्हा परिषदेच्या नूतन इमारतीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण… अशी आहेत तिची वैशिष्ट्ये…

नोव्हेंबर 13, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा गुरुवारचा दिवस… जाणून घ्या, १३ नोव्हेंबरचे राशिभविष्य…

नोव्हेंबर 12, 2025
thandi
महत्त्वाच्या बातम्या

या शहरात तीव्र थंडीची लाट… असा आहे हवामानाचा अंदाज…

नोव्हेंबर 12, 2025
Next Post
IMG 20230306 WA0011 e1678172398643

अवघ्या एक रुपयात तब्बल ३९ वर्षे रुग्णसेवा... पद्मश्री डॉ. रवींद्र व डॉ. स्मिता कोल्हे यांना भेटण्यासाठी येथे नक्की या...

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011