वैजापूर – तालुक्यातील करंजखेड येथे अपघातात बिअरच्या बॉक्सने भरलेला कंटेनर पलटी झाल्यानंतर तळीरामांनी बिअरच्या बॉक्स काही तासातच लंपास केले. याचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल झाला असून त्याची सर्वत्र चर्चा आहे. या अपघातात चालक व क्लिनर दोघेही जखमी झाले. पण, बाटल्या, बाँक्स पळवापळवीच्या नादात लोकांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केले. रविवारी रात्री ९ च्या दरम्यान हा अपघात झाला होता. या कंटेनरमध्ये अठराशे बॉक्स होते. त्यातले तासाभरात सोळाशे पन्नास बॉक्स तळीरामांनी अंधारात लंपास केले. चोरीचा हा प्रकार काही जणांनी मोबाईमध्ये शुट केला. हे लंपास करणा-यांच्या लक्षात आल्यानंतर काहींनी शर्टानेच तोंड झाकले. पण, त्याची चोरी शेवटी एका व्हिडिओ क्लीपने व्हायरल झाली….