पुणे – राज्याला इतर कंपन्यांकडून लस घेण्याचाही पर्याय खुला असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे. ते आज येथे प्रसिद्धी माध्यमांशी बोलत होते. लसींच्या पुरवठ्यासाठी राज्य सरकार लवकरच जागतिक निविदा काढणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
मोफत लसीबाबत १ मे रोजी निर्णय घेणार असून सिरम इन्स्टिट्यूट क्षमतेएवढी लस राज्याला देणार असल्याची माहिती पवार यांनी दिली. कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या वाढत असल्याचं त्यांनी सांगितलं.
ऑक्सिजन पुरवठा वाढवण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरु असून केंद्रांनं राज्याचा ऑक्सिजन पुरवठा कमी करू नये अशी मागणी पवार यांनी केली आहे.