विशेष प्रतिनिधी, मुंबई
स्वदेशी बनावटीच्या कोवॅक्सिन लसीच्या तिसऱ्या टप्प्याती चाचण्यांचे निष्कर्ष जाहीर झाले आहेत. कोविडची लक्षणं असलेल्या रुग्णांमध्ये ही लस ७७.८ टक्के परिणामकारक असल्याचे आढळून आले आहे. या लसीची निर्मिती करणाऱ्या भारत बायोटेक कंपनीने आज तिसऱ्या टप्प्यातील चाचण्यांचे निष्कर्ष जाहीर केले आहेत.
वेगवेगळ्या ठिकाणच्या १८ ते ९८ वयोगटातल्या २५ हजार ८०० स्वयंसेवकांवर लसीची चाचणी घेण्यात आली. त्यात गंभीर प्रकारच्या आजारात ही लस ९३ टक्के प्रभावी असल्याचे आढळले तर कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटमध्ये ती ६५ टक्के प्रभावी असल्याचे आढळून आले आहे.
या निष्कर्षांबाबत भारतीय वैद्यकीय परिषदेचे सरसंचालक बलराम भार्गव यांनी समाधान व्यक्त केले आहे. कोवॅक्सिन लस कोरोना विषाणूच्या सर्व प्रकारांवर प्रभावी ठरत असल्याबद्दलही त्यांनी समाधान व्यक्त केले आहे. २ ते १८ वयोगटातील नागरिकांसाठी या लसीवर चाचण्या सुरू असून बूस्टर डोसच्या सुरक्षेबाबतही चाचण्या सुरू असल्याची माहिती भारत बायोटेकचे अध्यक्ष डॉ. कृष्णा इला यांनी दिली आहे.
COVAXIN® Proven SAFE in India's Largest Efficacy Trial. Final Phase-3 Pre-Print Data Published on https://t.co/JJh9n3aB6V pic.twitter.com/AhnEg56vFN
— Bharat Biotech (@BharatBiotech) July 2, 2021