नवी दिल्ली – कोरोना संसर्गाविरूद्ध योग्य प्रतिकारशक्ती प्राप्त करण्यासाठी संपूर्ण लशीकरण अत्यंत महत्वाचे आहे. तज्ज्ञांनी स्पष्ट केल्यानुसार लसीचा पूर्ण लाभ मिळवण्यासाठी दुसरा डोस वेळेवर मिळणे महत्वाचे आहे. तसेच डेल्टा प्रकाराचा धोका लक्षात घेता हे आणखी आवश्यक आहे. परंतु अनेक वेळा लस उपलब्ध नसल्यामुळे तर कधी ताप किंवा इतर कोणत्याही कारणामुळे काही लोक दुसरा डोस वेळेवर घेऊ शकत नाहीत. ३ कोटी ८६ लाखांहून अधिक भारतीयांना लशीचा दुसरा डोस देण्यास विलंब झाला असल्याचे एका माहिती अधिकार (आरटीआय ) च्या माध्यमातून उघड झाले आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आरटीआयला उत्तर देताना सांगितले की, कोरोना लढयात निर्धारित वेळेमध्ये दोन्ही डोस घेणे निश्चितपणे अधिक प्रभावी आहे, परंतु थोडा विलंब झाला तरी घाबरण्या सारखे काही नाही. कारण तुमचा पहिला डोस कुचकामी होणार नाही, किंवा तुम्हाला पुन्हा लसीकरण करण्याची गरज नाही. जर दुसरा डोस नियत तारखेपासून दहा ते १५ दिवसांच्या विलंबाने दिला गेला तरी त्याचा योग्य किंवा समान लाभ होईल.
– दुसरा डोस हा ‘बूस्टर डोस’ म्हणून काम करतो. तो केवळ कोविड-विरोधी अॅन्टीबॉडीजची पातळी वाढवत तर रोगप्रतिकारक प्रणालीमध्ये ‘मेमरी-बी पेशी’ चे उत्पादन देखील सुनिश्चित करते. मेमरी बी सेल हा पांढऱ्या रक्तपेशीचा एक प्रकार आहे.
– विशिष्ठ विषाणू शरीरात प्रवेश करताच, त्यात उपस्थित असलेले रिसेप्टर्स रोगप्रतिकारक शक्तीला सतर्क करतात. यामुळे, ते संसर्गाशी लढण्यासाठी प्रभावी अॅन्टीबॉडीज तयार करण्यास सुरवात करते.
– कोविड -19 लशीचा पहिला डोस घेतल्यानंतर तुम्हाला संसर्ग झाल्यास, दुसऱ्या डोससाठी दोन ते तीन महिने थांबावे असा सल्ला दिला जातो. वास्तविक, संसर्ग झाल्यानंतर, आपले शरीर पुन्हा अॅन्टीबॉडीज बनवू लागते.
– दुसरा डोस आवश्यक आहे, कारण तो कोरोना विषाणूच्या नवीन रूपांपासून संरक्षण करण्यासाठी उपयुक्त आहे. ‘ पब्लिक हेल्थ इंग्लंड ‘ने मे मध्ये प्रकाशित केलेल्या अभ्यासानुसार, कोविड लसीचा दुसरा डोस सार्स-कोव्ही -2 विषाणूच्या नवीन प्रकारांपासून चांगले संरक्षण देऊ शकतो. या लसीचा प्रभाव ३३ टक्क्यांवरून ६० ते ८८ टक्क्यांपर्यंत वाढतो.
– अमेरिकास्थित वेंडरबिल्ट विद्यापीठाच्या संशोधकांनी जूनमध्ये प्रकाशित केलेल्या एका अभ्यासात दावा केला आहे की पूर्ण लसीकरणानंतर कोरोनाची लागण होण्याची शक्यता केवळ ०.०७ टक्के आहे. संसर्गग्रस्त रूग्णालयात दाखल होण्याचा किंवा मरण्याचा धोका कमी करण्यासाठी देखील ही लस प्रभावी आहे.
– नॉर्थ कॅरोलिना युनिव्हर्सिटीने केलेल्या अभ्यासात, लसीकरणानंतर कोरोनाची लागण झालेले बहुतेक रुग्ण ‘लक्षणविरहित’ अर्थात लक्षणे नसल्याचे आढळून आले. यावरून हे स्पष्ट होते की, सदर लस कदाचित व्हायरसला हल्ला करण्यापासून रोखू शकली नसेल, परंतु ती गंभीर आजारी पडण्याचा किंवा व्यक्तीचा मृत्यू होण्याचा धोका कमी करण्यात यशस्वी झाली.
दोन डोस मध्ये किती अंतर असावे ? तर
-कोविशील्डचा दुसरा डोस ८४ ते ११२ दिवसांच्या दरम्यान घ्यावा.
– कोव्हॅक्सीनच्या दोन्ही डोसमध्ये २८ ते ४२ दिवसांचे अंतर असावे.
– स्पुटनिक-व्हीचा दुसरा डोस २१ दिवसांच्या अंतराने दिला पाहिजे.