नवी दिल्ली – येत्या १ मे पासून सुरू होत असलेल्या कोविड-१९ प्रतिबंधक लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्याकरता राज्य सरकारं आणि केंद्रशासित प्रदेशांनी अतिरिक्त खाजगी लसीकरण केंद्र स्थापन करावीत, असा सल्ला केंद्र सरकारनं दिला आहे.
यासंदर्भात आज आरोग्य सचिव राजेश भूषण आणि कोविड लढ्यासाठीच्या उच्चाधिकार गटाचे अध्यक्ष डॉक्टर आर एस शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक झाली. या बैठकीत लसीकरणासंदर्भात अनेक सूचना केल्या गेल्या.
लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यासाठी खाजगी, औद्योगिक आणि औद्योगिक क्षेत्राकडून चालवल्या जात असलेल्या रुग्णालयात सोबत जोडून घ्यावं, नोंदणीचे अर्ज, अर्जांवरची प्रक्रिया आणि प्रलंबित नोंदणीसाठी नियुक्त केलेल्या यंत्रणांसोबत समन्वय राखावा असा सल्लाही केंद्र सरकारनं दिला आहे.
ज्या रुग्णालयांनी कोविन अॅपवर खरेदी केलेल्या लसी, त्यांचा साठा आणि किमतींबद्दलचा तपशील जाहीर केला आहे, त्याची खातरजमा करायची सूचनाही या बैठकीत केली गेली.
१८ ते ४५ वयोगटाच्या लसीकरणासाठी केवळ ऑनलाइन नोंदणी करण्यासोबतच, लसीकरणाच्या व्यवस्थापनासंदर्भात अनेक या बैठकीत केल्या गेल्या.