मुंबई – केंद्र सरकार आणि आयसीएमआरकडून सूचना आलेली नसताना कोरोनापासून संरक्षण करण्यासाठी महाराष्ट्रात परस्पर बूस्टर डोस देण्याचे आले आहेत. कोरोना लशीचा पहिला आणि दुसरा डोस देईपर्यंत बूस्टर डोस देण्याचा निर्णय अद्याप केंद्र सरकारने घेतलेला नाही. तरीही धोरणात्मक निर्णयाचे उल्लंघ करून आरोग्य क्षेत्रातील निवडक व्यक्तींना बूस्टर डोस देण्यात आल्याचे वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने दिले आहे.
कोरोना प्रतिबंधित लशीचे दोन्ही डोस घेतल्यानंतर कोरोनाची बाधा होण्याचे प्रमाण तसेच मृत्यूचे प्रमाण खूपच कमी आहे. लस घेतल्यानंतर मृत्यू झालेले रुग्ण इतर आजारांनी ग्रस्त होते. त्यामुळे सर्वांनी लसीकरण करून घेण्याचे आवाहन सरकारकडून केले जात आहे. कोरोना लशीचे दोन्ही डोस घेतल्यानंतर पुन्हा बूस्टर डोस घेतल्यास लसीकरणाचे नियोजन बिघडण्याची शक्यता आहे.
दरम्यान, भारतात अधिकृतरित्या बूस्टर डोस देण्याची मोहीम अद्याप सुरू झालेली नाही. कोणी परस्पर बूस्टर डोस घेत असेल तर याबाबत माहिती आलेली नाही, अशी प्रतिक्रिया आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी दिली आहे. परस्पर बूस्टर घेणे धोकादायक ठरू शकते. याबाबत आयसीएमआरने अद्याप कोणत्याच सूचना केलेल्या नाहीत. त्यामुळे असे परस्पर डोस घेणे चुकीचे असल्याचे त्यांनी म्हटले आहे.