मुंबई – अमेरिका आणि ब्रिटनसह काही देशांमध्ये परवानगी असलेले आणि जागतिक आरोग्य संघटनेची मंजुरी असलेले विदेशी लस भारतात इमर्जन्सीमध्ये वापरण्याची मुभा असतानाही लसीचा पुरवठा वाढण्याची कुठलीही आशा दिसत नाही. मेमध्ये स्पुतनिक–व्हीचा पुरवठा सुरू होण्याची आशा आहे. मात्र त्याचे प्रमाण मर्यादित असेल. याशिवाय भारत बायोटेक आणि सीरम इन्स्टिट्यूटचे उत्पन्नही जूनपासून वाढण्याचे संकेत आहेत.
भारतात सीरम इन्स्टिट्यूट आणि भारत बायोटेक सध्या दर महिन्याला कोरोना लसीनचे सात कोटी डोस म्हणजेच दररोज जवळपास २३ लाख डोस तयार करीत आहेत. तर भारतात सरासरी ३ लाख डोज दररोज लावले जात आहेत. त्या तुलनेत डोस कमी आहेत. ही उणीव भरून काढण्यासाठी सरकार विविध स्तरांवर काम करीत आहे.
एकीकडे भारत बायोटेक आणि दुसरीकडे सीरम इन्स्टिट्यूटचे उत्पादन वाढविण्यासाठी चर्चा सुरू आहे. तर दुसरीकडे विदेशी लसीसाठी भारताचे दरवाजे उघडे करण्यात आले आहेत. आरोग्य मंत्रालयाच्या एका वरीष्ठ अधिकाऱ्याने मात्र कबुल केले आहे की मेपर्यंत लसीचा पुरवठा मर्यादित राहणार आहे. स्पुतनिक–व्हीच्या भारतातील उत्पादनासाठी रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंडने तीन भारतीय कंपन्यांसोबत वर्षाला ८५ कोटी डोजच्या उत्पादनाचा करार केला आहे.
जूनपर्यंत स्पुतनिक–व्हीचे उत्पादन
भारतात सारेकाही आलबेल राहिले तर भारतीय कंपन्यांमध्ये जूनपर्यंत स्पुतनिक–व्ही चे उत्पादन सुरू झालेले असेल. तर भारत बायोटेक जूनमध्ये महिन्याला १ कोटी ४० लाख डोसपर्यंत क्षमता वाढविणार आहे. सीरम इन्स्टिट्यूटने दरमहा ११ कोटी डोसच्या उत्पादनाची क्षमता वाढविणार असल्याचा दावा केला आहे.