विशेष प्रतिनिधी, मुंबई/नवी दिल्ली
देशभरात १ मे पासून १८ ते ४५ वर्षे वयोगटातील कोरोना लसीकरण मोहीम सुरू झाली आहे. परंतु अनेकांना लसीकरणासाठी नोंदणी करण्यात अडचणी निर्माण होत आहे. अशा परिस्थितीत केंद्र सरकारने लोकांच्या सोयीसाठी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म म्हणजेच व्हॉट्सअॅपवरुन जनजागृती मोहीम सुरू केली आहे. त्याअंतर्गत नजिकचे लसीकरण केंद्र घरी बसून व्हॉट्सअॅपच्या मदतीने मिळू शकेल.
कोणात्याही व्यक्तीला जर लसीकरण करावयाचे असले तर सर्वात आधी जवळच्या केंद्राविषयी संपूर्ण माहिती मिळाली पाहिजे, जेणेकरुन लसीकरण दरम्यान कोणतीही अडचण उद्भवू नये. त्याकरिता १ मे रोजी व्हॉट्सअॅपचे प्रमुख विल कॅथकार्ट यांनी घोषित केले की, मेसेजिंग अॅपवर चॅटबॉट्सवरून हेल्पलाईन चालविण्यासाठी कंपनी हेल्थ पार्टनरबरोबर काम करत आहे. मागील वर्षी ही हेल्पलाईन सुरू करण्यात आली होती. या हेल्पलाइनवरून आता सर्वात जवळचे लसीकरण केंद्र शोधण्यात सोयीचे होईल.
असे शोधा केंद्र
सर्व प्रथम, मोबाईल वापरकर्त्यास आपल्या फोनच्या संपर्क यादीमध्ये +919013151515 हा क्रमांक सेव्ह करावा लागेल. MY Gov हे कोरोना हेल्पडेस्क चॅटबॉटशी जोडलेले आहे. त्यानंतर मोबाईल वापरकर्त्याला या क्रमांकावरून नमस्ते किंवा हाय असा संदेश टाइप करून पाठवावा लागेल. यानंतर चॅटबॉक्स आपल्याला स्वयंचलित प्रतिसाद देईल. त्याच्या मदतीने आपण आपल्या जवळच्या कोविड लसीकरण केंद्राबद्दल माहिती मिळवू शकता. त्यानंतर आपल्याला ६ अंकी पिन कोड देखील प्रविष्ट करावा लागेल.
अशी करा नोंदणी
लसीसाठी ऑनलाईन नोंदणी कोविन व आरोग्य सेतु अॅपद्वारे केली जाईल. आरोग्य सेतु अॅप आणि कोविन वर नोंदणी प्रक्रिया समान आहे. सर्व प्रथम, आपण लॉगिन किंवा नोंदणी वर टॅप करा. यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकावा लागेल. मग आपल्या मोबाईलवर ओटीपी येईल, ज्यावरून मोबाइल नंबरची पडताळणी करावी लागेल.
पर्याय निवडा
मोबाइल नंबरची पडताळणी झाल्यानंतर आधार कार्ड, पॅन, ड्रायव्हिंग लायसन्स यासारख्या फोटो आयडी कार्डांपैकी आपणापैकी एक पर्याय निवडावा लागेल. याशिवाय नाव, जन्मतारीख यासारखी माहिती द्यावी लागेल. यानंतर, सदर फाईल (पृष्ठ ) दिसेल, ज्यावर आपण लस मिळविण्यासाठी आपल्या मोबाइल नंबरवर आणखी ४ लोकांना जोडू शकता. यानंतर, आपण आपला पिन कोड प्रविष्ट करताच, लसीकरण केंद्रांची यादी आपल्या समोर उघडेल. अशाप्रकारे, लसीची तारीख आणि वेळ उपलब्ध होईल जिथून आपल्याला लस दिली जाऊ शकते.