नवी दिल्ली : कोरोनाची दुसरी लाट ओसरत नाही, तोच आता पुन्हा एकदा तिसरी लाट येण्याच्या शक्यते याबाबत देशभरात चर्चा सुरू असून याबाबत केंद्र सरकार तसेच विविध राज्यांकडून उपाययोजना करण्यात येत आहेत. परंतु कोरोनाच्या डेल्टा प्लस प्रकाराबद्दल घाबरण्याची गरज नाही. कारण भारतात, दुसऱ्या लाटेने ८० ते ९० टक्के लोकांना संक्रमित केले. या संक्रमित लोकांमध्ये तयार केलेली ही अँटीबॉडी डेल्टा प्लसच्या विरोधात प्रभावी ठरेल. तसेच कोरोनाच्या प्रत्येक नवीन प्रकाराला संरक्षण मिळेल. त्याशिवाय लस घेतली आहे, अशा लोकांमध्ये तयार केलेल्या अँटीबॉडीज तिसऱ्या लाटेपासून संरक्षण करतील त्यांना जीवघेणा कोरोना होणार नाही.
दरम्यान, लाला लाजपत राय वैद्यकीय महाविद्यालयातील सूक्ष्मजीवशास्त्र विभागाचे प्रभारी डॉ. अमित गर्ग म्हणतात की, भारतातील दुसरी लाट डेल्टा व्हायरसमुळे झाली. जीनोममध्ये थोडासा बदल केल्याने ते आता डेल्टा प्लस बनले. कोरोनाची दुसरी लाट ही यावर्षी मार्च ते मे दरम्यान आली. केजीएमयू लखनौ आणि एलएलआरएम वैद्यकीय महाविद्यालयाच्या सेरो सर्वेक्षण अहवालात असे दिसून आले आहे की, उत्तरप्रदेशाच्या बहुतेक जिल्ह्यांमध्ये ८० टक्क्यांहून अधिक लोकांमध्ये अँटीबॉडीज आहेत. या अँटीबॉडीज कोरोनाच्या इतर प्रकारांवरही काम करेल.
तसेच डॉ.अमित गर्ग पुढे म्हणाले की, डेल्टा प्लस व्हेरियंट अधिक प्राणघातक असेल, असा कोणताही पुरावा जगात नाही. व्हायरसच्या स्पाइक प्रोटीनमध्ये बदल केल्यास संसर्ग वाढू शकतो, परंतु दुसरी लाट आणि लशीकरण यामुळे तयार झालेली अँटीबॉडीज मोठ्या लोकसंख्येचे संरक्षण करतील. दरम्यान , नवीन संशोधन अहवाल दर्शवतात की, जगातील ज्या देशांमध्ये २० टक्क्यांहून अधिक लोकांना लस मिळाली आहे, तेथे संसर्ग मंदावला आहे. वैद्यकीय महाविद्यालयाच्या औषध विभागाचे प्राध्यापक डॉ अरविंद म्हणतात की, नवीन प्रकार लशीचा प्रभाव किंचित कमी करू शकतो, परंतु तो शून्य असू शकत नाही. जर लस ५० टक्के प्रभावी असेल तर ती गंभीर आजार होण्यापासून रोखेल. कारण अनेक लोकांचे लशीकरण करण्यात आले आहे.