इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – उत्तराखंडमधील उत्तरकाशी जिल्ह्यात एक मोठा वेदनादायक रस्ता अपघात झाला आहे. रविवारी (५ जून) सायंकाळच्या सुमारास एक बस राष्ट्रीय महामार्ग ९४ वर हा अपघात झाला आहे. जानकीचट्टीजवळ दामट्यापासून दोन किमी पुढे खोल दरीत बस कोसळली आहे. बसमधील 22 तीर्थयात्रींचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. बसमधील सर्व तीर्थयात्री हे मध्य प्रदेशातील असल्याचे सांगण्यात येत आहे.
माहिती मिळताच प्रशासन-पोलीस यांनी तातडीने रेस्क्यू ऑपरेशन हाती घेतले आहे. बडकोट येथून एक रुग्णवाहिका, नोगाव येथून एक रुग्णवाहिका आणि नैनबाग येथून एक रुग्णवाहिका रवाना करण्यात आली आहे. घटनेच्या वेळी बसमध्ये सुमारे 27-28 जण असल्याची माहिती आहे. एसडीआरएफ आणि पोलिसांचे पथक घटनास्थळी बचावकार्यासाठी रवाना झाले आहेत.
https://twitter.com/AbhishekVermaIN/status/1533459413100425216?s=20&t=hsRJA0uFrd84Tkv1ICDUUw