नवी दिल्ली – यंदा देशभरात चक्रीवादळ, ढगफुटी आणि मुसळधार पावसामुळे प्रचंड नुकसान झाले आहे. आता देखील परतीच्या पावसाने उत्तराखंडमध्ये हाहाकार माजविला आहे. याठिकाणी घरे कोसळून आणि पुरात वाहून सुमारे 40 जण ठार झाले असून 9 जण बेपत्ता झाले आहेत. NDRF टीमचे मदत आणि बचावकार्य आज तिसऱ्या दिवशीही सुरू आहे. आतापर्यंत सहाशे जणांना वाचविण्यात यश मिळाले आहे.
मजूर जिंवत गाडले गेले
राज्यात दोन दिवसात मुसळधार पावसादरम्यान भूस्खलनामुळे 40 जणांचा मृत्यू झाला. एकट्या नैनीताल जिल्ह्यातच 25 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये उत्तर प्रदेश आणि बिहारमधील 14 मजूर आहेत. नैनीताल जिल्ह्यातील रामगढ ब्लॉकमध्ये 9 मजुर घरे कोसळून जिवंत गाडले गेले. तर, झुटिया गावात घराच्या ढिगाऱ्याखाली दबून एका दांपत्याचा मृत्यू झाला, तर त्यांचा मुलगा अद्याप बेपत्ता आहे. दोशापाणीमध्ये 5 मजुरांचा भिंतीखाली दबून मृत्यू झाला.
मुख्यमंत्र्यांकडून आढावा
प्रचंड पावसामुळे उद्भवलेल्या या परिस्थितीला तोंड देण्यासाठी मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी दिवसभर संबंधित अधिकाऱ्यांशी ठेवला. मुख्यमंत्र्यांनी आपत्तीमुळे जीव गमावलेल्यांच्या कुटुंबांना प्रत्येकी 4 लाख रुपयांची भरपाई जाहीर केली. धामी त्यांनी सचिवालयातील आपत्ती नियंत्रण कक्षाची पाहणी केली आणि आपत्तीच्या परिस्थितीचा त्यांनी आढावा घेतला.
Prayers for #UttarakhandRain
Respect for the ‘Khaki’.? ?? pic.twitter.com/WUyyBWsLnk— Awanish Sharan ?? (@AwanishSharan) October 19, 2021
तलावाचे पाणी रस्त्यावर
नैनीताल जिल्ह्यातच 25 लोकांचा मृत्यू झाला आहे. तसेच नैनीतालचे सर्व रस्ते पाऊस आणि भूस्खलनामुळे बंद आहेत. राज्यात अवघ्या 24 तासांत 200 मिमी पावसाची नोंद झाली आहे. अनेक भागात पाऊस 400 मि.ली. किंवा त्याहून अधिक झाला आहे. नैनीतालमध्ये, मॉल रोड आणि नैनी तलावाच्या काठावरील रोडवर आणि नैना देवी मंदिरात पूराचे पाणी आले आहे, तर भूस्खलनामुळे वसतिगृहाच्या इमारतीचे नुकसान झाले आहे. नैनीताल जिल्हा प्रशासन शहरात अडकलेल्या पर्यटकांना मदत करण्यासाठी प्रयत्न करत आहे.
ढिगाऱ्याखाली दबले
नैनीताल जिल्ह्यातच, कुरबमध्ये 2, कैंची धामजवळ 2, बोहराकोटमध्ये 2 आणि ज्योलीकोटमध्ये एकाचा मृत्यू झाला. अल्मोडामध्ये 6 जण ढिगाऱ्याखाली दबले गेले. तर, चंपावतमध्ये तीन आणि पिथौरागड-बागेश्वरमध्ये प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला आहे. बाजपूरमध्ये एका वीज प्रवाहामुळे एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला. दुसरीकडे, देवरियाचे आमदार कमलेश शुक्ला यांच्या घरामध्ये वीज पडल्याने त्यांची सून मरण पावली. तर ओखळकांडा आणि चंपावतमध्ये 8 जण बेपत्ता आहेत.
दिवस रात्र बचाव मोहिम
ट्रेकिंग मार्गापासून ते प्रवासाच्या मार्गापर्यंत आणि लोक नदीच्या काठावर अडकले सोमवारी-मंगळवारी रात्री झालेल्या आपत्तीमुळे एसडीआरएफची टीम रात्रभर बचाव आणि मदतकार्यात व्यस्त होती. यावेळी एसडीआरएफने 600 हून अधिक लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात यश मिळवले. राज्यभरात 29 ठिकाणी एसडीआरएफची पथके कार्यरत आहेत. हवामान खात्याने मुसळधार पावसाचा इशारा दिल्यानंतर सर्व टिमला आधीच हाय अलर्टवर ठेवण्यात आले होते.
गंगा नदीने विक्रम मोडला
उत्तराखंडमध्ये 17 वर्षांपूर्वी, ऑक्टोबर महिन्यात, गंगेने धोक्याची पातळी ओलांडली होती. अशीच घटना 19 आणि 20 ऑक्टोबर 2003 रोजी घडली होती. तेव्हा 25 ऑक्टोबर रोजी दिवाळी होती. ऑक्टोबरमध्ये पाऊस पडेल अशी कोणालाही अपेक्षा नव्हती. पण,19 ऑक्टोबरला पाऊस तुफान सुरू झाला. थोड्याच वेळात त्याने भयानक रूप धारण केले. नद्यांच्या पाण्याची पातळी झपाट्याने वाढू लागली. बॅरेजचे दरवाजेही धोक्यात आले होते. त्यावर्षीही ऑक्टोबर महिन्यात गंगाने धोक्याची पातळी ओलांडली होती.
पंतप्रधानांकडून आढावा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी आणि केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री अजय भट्ट यांच्याकडून दूरध्वनीवरून राज्यातील आपत्ती आणि मदत कार्याचा आढावा घेतला. त्यांनी मुख्यमंत्र्यांना सर्व शक्य मदतीचे आश्वासन दिले आणि केंद्रीय यंत्रणांना सतर्क राहण्याचे निर्देश दिले.
लष्कराचे हेलिकॉप्टर्स
मुख्यमंत्री पुष्कर धामी म्हणाले की, आपत्तीसंदर्भात संवेदनशील भागात लष्कराची तीन हेलिकॉप्टर तैनात आहेत. पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे झालेले नुकसान याबाबत सर्व डीएमकडून अहवाल मागवण्यात आला आहे.पूरामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला होता. किच्छा धरणाचे दरवाजे जोरदार प्रवाहाने तुटले. त्यामुळे अनेक वस्त्या पाण्यात बुडाल्या. सुमारे डझनभर घरांचे नुकसान झाले. प्रशासनाने पाण्यात बुडालेल्या वस्त्यांमध्ये बचाव कार्य सुरू केले आहे.