इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – उत्तर प्रदेशात योगी सरकार कडून गुन्हेगार आणि अतिक्रमण करणाऱ्यांवर बुलडोझरचा वापर केला जात आहे. मात्र एका प्रांताधिकाऱ्याने (एसडीएम) ने 2.68 लाख रुपयांचे फर्निचर खरेदी केले. त्याचे पैसे फर्निचर व्यावसायिकाने मागितले. त्याचा राग आल्याने एसडीएमने थेट व्यावसायिकाचे घर पाडण्यासाठी बुलडोझर पाठवला. आपल्या मुलीची हत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही या व्यावसायिकाने केला आहे. तसेच फर्निचरचेही नुकसान केले आहे. या प्रकरणी आयुक्तांच्या सूचनेनुसार अतिरीक्त जिल्हाधिकारी (एडीएम) सुरेंद्र सिंह यांनी तपास सुरू केला आहे. एसडीएमला कारणे दाखवा नोटिस बजावण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी अधिक माहिती देताना सांगितले की, बिलारी येथे राहणारे जाहिद अहमद यांचे घराजवळच फर्निचरचे शोरूम आहे. जाहिद यांनी सांगितले की, बिलारीचे एसडीएम घनश्याम वर्मा यांनी बेड, सोफा, टेबल आणि खुर्ची पाहण्यासाठी त्यांच्या शोरूममध्ये आले. त्यांनी 1.48 लाख रुपयांच्या फर्निचर खरेदी केले दिले. त्यांच्या बिलारी आणि मुरादाबाद येथील निवासस्थानी फर्निचर पाठवल्यानंतर त्यांना बिलही पाठवण्यात आले.
यानंतर एसडीएम पुन्हा आले त्यांना दिवाण आणि सोफा इत्यादींसह 1.19 लाख रुपयांचे फर्निचर आवडले. ते फर्निचर त्यांच्या सांगण्यावरून 5 हरदोई येथील डेप्युटी जेलर अलका वर्मा यांच्या घरी त्यांच्या मुलीला लग्नात भेट म्हणून फर्निचर देण्यात आले. त्या फर्निचरचे बिल घेऊन एसडीएमकडे गेले असता त्यांनी त्याचे पैसे देण्याऐवजी धमकी दिली. याबाबत व्यावसायिकाने आयुक्त अंजनेय कुमार सिंह आणि डीएम शैलेंद्र कुमार सिंह यांच्याकडे तक्रार केली. याबाबत आयुक्तांनी डीएमला चौकशीचे निर्देश दिले.
दरम्यान, एसडीएमने तहसीलदारांना त्या फर्निचर व्यावसायिकाचे घर पाडण्यासाठी बुलडोझर पाठवला आणि एक भिंतही पाडली. मात्र व्यावसायिकाला फोन केल्यावर अधिकाऱ्यांनी कारवाई थांबवली. येथे एसडीएमवर कोणतीही कारवाई होत नसल्याचे पाहून सीएम पोर्टलसह व्यावसायिकाने एसएसपी कार्यालयात सीओ हायवे यांना तक्रार पत्रही दिले. बुलडोझरने भिंत पाडून घरातील फर्निचर वाहनातून उतरवत असल्याची छायाचित्रेही व्यावसायिकाने अधिकाऱ्यांना दिली आहेत.
विशेष म्हणजे एसडीएमने एखादे काम करण्याच्या बदल्यात फर्निचर घेतले होते, परंतु ते काम करू शकले नाहीत, अशीही चर्चा अधिकाऱ्यांमध्ये आहे. दरम्यान, या प्रकरणाची वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून चौकशी करून एका आठवड्यात अहवाल सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. आता या प्रकरणी तपास सुरू आहे. या तक्रारी दरम्यान हे सर्व पुरावे सीएम पोर्टलवर अपलोड करण्यात आले आहेत. फर्निचर व्यापारी म्हणतो की, त्याला पैसे गेल्याची खंत नाही. मात्र एसडीएमने घरावर बुलडोझर चालवून अन्याय केला आहे. न्यायासाठी तो न्यायालयात केस ही लढणार आहे.
Uttar Pradesh SDM Bulldozer action on Furniture Businessman House