इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – सुमारे ४० वर्षापूर्वी शालेय अभ्यासक्रमात बाबल्या चित्तेतून पळाला अशी कथा होती, या कथेचा अर्थ, खरे तर बाबल्या मेलाच नव्हता, तो जिवंत होता, असा होता. उत्तरप्रदेशात मुझफ्फरनगरमधून अशीच एक धक्कादायक घटना उघड झाली आहे. पोलिसांनी मृत घोषित केलेला तरुण जिवंत सापडल्याचा प्रकार घडला आहे. मात्र या घटनेनंतर पोलिसांना सापडलेला मृतदेह नेमका कुणाचा हा प्रश्न आता निर्माण झाला आहे.
असा उडाला गोंधळ
जगात कधी कधी आश्चर्यकारक घटना घडतात, पण काही वेळा गैरसमज किंवा निट माहिती करून घेतली नाही म्हणून गोंधळ उडतो, अगदी जिंवत माणूस मेला असे कुणाला तरी वाटते, वास्तविक तो मेलेला नसतो, आणि नंतर मग तो जिंवत असल्याचा उलगडा होतो, चित्रपटात देखील अशा घटना दाखवतात, मेरठच्या धौराला भागात अशी घटना घडली. पोलिसांना एक मृतदेह तुकडे केलेल्या अवस्थेत आढळला आहे. स्थानिक पोलिसांनी त्यानंतर हा मृतदेह नेमका कुणाचा आहे याचा शोध सुरु केला. तेव्हा मन्सूरपूर शहरात माँटी हा २० वर्षीय तरुण बेपत्ता झाल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यानंतर तरुणाच्या कुटुंबीयांनी देखील हा सापडलेल्या मृतदेह आपल्या मुलाचा असल्याचा दावा केला. मृतदेह सापडल्यामुळे कुटुंबीयांनी पोटच्या गोळ्याच्या अंत्यविधीची तयारी देखील केली होती. खरे तर बेपत्ता मुलाच्या मानेवर आणि हातावर टॅटू असल्याने हल्लेखोरांनी ओळख लपवण्यासाठी शरीराचे अवयव तोडले असावेत, असा अंदाज कुटुबीयांनी बांधला होता. कुटुंबीय आपल्या मुलाच्या मृत्यूने दु:खात आकंठ बुडाले होते.
प्रेमसंबंधातून पळून गेला
खरे म्हणजे त्या कुटुंबियातील मुलगा माँटीचे त्याच भागातील एका १८ वर्षीय मुलीसोबत प्रेमसंबंध होते. तो प्रेयसीसोबत चंदीगडला पळून गेला होता. त्यानंतर तिच्या कुटुंबीयांनी मन्सूरपूर पोलीस ठाण्यात माँटीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता. कारण माँटीने आपल्या मुलीला फुस लावून पळून नेले आहे. तसेच तिच्याकडील दागिने आणि ५० हजार रुपये काढून घेतले. अशी तक्रार मुलीच्या वडिलांनी पोलिसात दाखल केली होती. त्यानंतर मेरठमध्ये मृतदेह सापडल्याची माहिती तरुणाच्या कुटुंबीयांना मिळाली, त्यावेळी मुलाच्या हत्येचा तपास नीट करत नसल्यामुळे कुटुंबीय नाराज होते. मुलाच्या कुटुंबीयांनी यासाठी आंदोलनही केले होते. आता तर त्याचा मृतदेह सापडला होता, मात्र चौकशीत कळाले की तो मृतदेह त्या पळून गेलेल्या मुलाचा नव्हता, मात्र त्यांचा मुलगा सुखरुप असल्याने त्यांची जीव भांडयात पडला आहे. मात्र, आता पुढे प्रश्न निर्माण झाला आहे की सापडलेला मृतदेह नेमका कुणाचा आहे, याचा शोध घेण्याचे काम आता पोलिसांना लागले आहे.
Uttar Pradesh Muzzafarpur Young Boy Return Cremation Family