इंडिया दर्पण ऑनलाई डेस्क – गेल्या काही दिवसांमध्ये उत्तर प्रदेशात अल्पवयीन मुली, तरुणी आणि महिलांवर अत्याचारांच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. भर दिवसा गुंड प्रवृत्तीचे लोक महिलांवर लैंगिक अत्याचार व बलात्कार करत असल्याने पोलीसांचा धाकच उरला नाही, असे दिसून येते. त्यामुळे महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सहारपूरमध्ये एक धक्कादायक व खळबळजनक घटना घडली आहे.
घरी सोडण्याच्या बहाण्याने
एक कनिष्ठ महाविद्यालयात शिकणारी तरुणी कॉलेज सुटल्यानंतर एकटी घरी चालली होती, ती एकटी असल्याचे पाहून वाहनामधून लिप्ट देऊन घरी सोडण्याच्या बहाण्याने ५ जणांनी एका विद्यार्थिनीवर सामूहिक लैगिंक अत्याचाराची वाईट घटना घडली आहे. या घटनेनंतर पोलिसांनी तातडीने तपास करीत या ५ गुंडांना अटक केली आहे. तसेच या प्रकरणी सामूहिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून परिसरात एकच खळबळ उडाली आहे. आणखी वाईट गोष्ट म्हणजे आरोपी पीडितेला एका चौकात फेकून फरार झाले. बेशुद्धी अवस्थेत हे तरुणी रस्त्यात वरच खूप वेळ पडून होती त्यानंतर कोणीतरी ही घटना पोलिसांना कळविली. या पीडितीचे माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पीडितेला गाडीत बसवून पोलीस ठाण्यात नेले. या तरुणीने घाबरलेल्या अवस्थेतच आपल्यावर घडलेल्या वाईट प्रसंगाची माहिती दिली.
कुटुंबात एकच आक्रोश
मुलीवर घडलेल्या या दुर्दैवी प्रसंगाची कुटुंबीयांना काहीच माहिती नव्हती. त्यामुळे पोलिसांनी तातडीने पीडित मुलीच्या कुटुंबीयांची संपर्क साधला, तसेच या घटनेची माहिती तिच्या कुटुंबीयांना दिली. त्यानंतर तिच्या कुटुंबात एकच खळबळ उडाली. घरातील महिला तर या घटनेने अक्षरशः आक्रोश करू लागल्या, तसेच या संदर्भात विद्यार्थिनीच्या काकांनी तक्रार देताना सांगितले की, आसरा खेडी येथील दोन गुंड तरुण अंकुर व अमन हे मुलीच्या शाळेजवळ पोहोचले. हे तरुणांनी सांगितले की आम्ही तुच्या आत्याच्या गावातील आहोत, त्यामुळे ओळख सांगितल्याने ती बिचारी तरुणी विश्वास ठेवून त्यांच्यासोबत वाहन बसली. त्यांनी मात्र विश्वासघात करीत मुलीला निर्जण जागेवर नेले. त्याठिकाणी तीन जण आणखी होते. या पाच जणांनी मिळून विद्यार्थिनीवर अत्याचार केले. त्यानंतर या आरोपींनी विद्यार्थिनीला चौकावर ठेऊन फरार झाले. पोलिसांनी मात्र गुंड तरुणांचा तपास करत त्यांना जेरबंद केले.
Uttar Pradesh Kanpur Crime Gang Rape Girl Student