इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – लहान भावाशी अनैतिक संबंध ठेवणाऱ्या पत्नीची पतीने हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. उत्तर प्रदेशातील या घटनेने समाजमन हादरले आहे.
उत्तर प्रदेशातील झाशी येथील ही घटना आहे. तीन मुलांच्या महिलेचे तिच्या नवऱ्याच्या लहान भावाशी विवाहबाह्य संबंध होते. बायकोच्या या कृत्याबद्दल नवऱ्याला कळल्यावर त्याने पत्नीवर कुऱ्हाडीने वार करून हत्या केली. ज्यावेळी नवऱ्याने पत्नीला रंगहात पकडले त्यानंतर त्या दोघांमध्ये वारंवार भांडण व्हायचे. भविष्यात आपण असे काही करणार नाही, असा शब्द पत्नीने पतीला दिला होता. तिने पतीची वारंवार माफी मागितली होती. मात्र, एकदा विश्वासघात झाल्यानंतर पूर्ण विश्वास ठेवायला वेळ लागतो. नवरासारखा त्याच विषयावरुन तिच्याशी रोज वाद घालत होतो.
बुधवारी रात्री त्यांमध्येल भांडण टोकाला गेलं. या भांडण्यावेळी पतीने पत्नीवर कुऱ्हाडीने वार केले ज्यामध्ये तिचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर पती फरार झाला. महिलेच्या नातेवाइकांनी पतीबद्दल पोलिसात तक्रार केली. अखेर शुक्रवारी पोलिसांनी त्याला अटक केली. पोलिसांनी त्याचा लहान भावालाही ताब्यात घेतले आहे. त्या दोघांची पोलीस कसून चौकशी करत आहेत.
बारा वर्षांपूर्वी झाले लग्न
मृत महिलेले लग्न १२ वर्षांपूर्वी न्यू प्रेमगंजमधील सचिन मोटे या व्यक्तीशी झाले होते. त्यांना तीन मुले झाली पण यादरम्यान तिचे नवऱ्याच्या लहान भावावर जीव जडला. लव्ह अफेयरच्या वेळी त्यांचे शारीरिक संबंध प्रस्थापित झाले. या अफेयरची कल्पना नवऱ्याला लागली. त्यानंतर दोघांमध्ये रोज भांडण व्हायला लागले. घटनेच्या १५ दिवसांपूर्वीच महिला भांडणाला कंटाळ तिच्या माहेरी गेली होती.