इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – उत्तर प्रदेश एक असे राज्य आहे, जिथे काहीही घडणे शक्य आहे. विशेषतः गुन्हेगारी विश्वात तर उत्तर प्रदेशने सर्व प्रकारचे विक्रम मोडलेले आहेत. अर्थात त्यानंतरही दोषींवर कारवाई होणे ही अत्यंत दुर्मिळ बाब या राज्यात मानली जाते. काही दिवसांपूर्वी एक महिला पोलीस रेल्वेच्या डब्यात रक्ताच्या थारोळ्यात आढळली होती. या घटनेला एक आठवडा लोटला, पण अद्याप कुणावरही कारवाई झालेली नाही.
एवढी मोठी घटना घडते आणि एकही गुन्हा दाखल होत नाही, कुणावर कारवाई होत नाही आणि पोलीस गांभीर्याने तपासही करत नाही. हे फक्त उत्तर प्रदेशातच घडू शकते. पीडित महिलेच्या भावाने तक्रार दाखल केल्यानंतरच पोलिसांनी अज्ञात गुन्हेगारांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. २९ ऑगस्ट रोजी पहाटे ४ वाजता शरयू एक्सप्रेस अयोध्या रेल्वे स्थानकावर दाखल झाली होती. त्याचवेळी या रेल्वेच्या जनरल डब्यात एक महिला हेड कॉन्स्टेबल रक्ताच्या थारोळ्यात पडलेली आढळली. या घटनेने एकच खळबळ उडाली होती. या महिलेचे कपडे अस्ताव्यस्त पडले होते. ही महिला डब्यातील एका सीटच्या खाली होती. या महिलेला लखनौच्या केजीएमसी रुग्णालयात दाखल करण्यात आले. महिलेचा जीव वाचलेला असला तरीही ती बोलण्याच्या अवस्थेत मुळीच नाही. तिच्यावर बलात्कार झाला असावा, असा अंदाज लावण्यात आला. परंतु, अद्याप ते स्पष्ट झालेले नाही, असे पोलिसांनी म्हटले आहे.
मध्यरात्री सुनावणी
३ सप्टेंबरला मध्यरात्री मुख्य न्यायमूर्तींच्या घर खंडपीठ बसवण्यात आले. रेल्वे पोलीस अधीक्षकांनी खंडपिठाला सांगितले की आमची एकूण पाच पथके या प्रकरणाचा तपास करत आहे. न्यायमूर्तींनी दंडाधिकाऱ्यांना रुग्णालयात जाऊन महिलेची चौकशी करण्यास, तसेच तिचे बयाण नोंदविण्याचे आदेश दिले आहेत.
Uttar Pradesh Crime Allahabad High Court Judge Home Hearing