विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
जगाला हादरवून सोडणाऱ्या भयंकर षडयंत्राचा पर्दाफाश करीत उत्तर प्रदेश दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) काही आरोपींना ताब्यात घेतले आहे. धर्मांतरणाच्या खेळांतर्गत मुकबधीर विद्यार्थ्यांचा मानवी बॉम्ब म्हणून वापर होणार होता. त्यामुळे भारतासह संपूर्ण जगाला हादरे बसण्याची शक्यता होती. नोएडा सेक्टर ११७ येथील डेफ सोसायटीमध्ये शिकणाऱ्या मूक-बधीर विद्यार्थ्यांचा यात वापर केला जात होता.
मूकबधीर मुलांचे धर्मांतरण करून त्यांचा वापर करणे सोपे आहे, याची आरोपींना खात्री पटली. त्यांच्या माध्यमातून मोठी दहशतवादी घटना घडवून आणणे शक्य होते. त्यासाठी षडयंत्र रचण्यात आले. धर्मांतरणासाठी देशात मोठ्या प्रमाणात फंडींग सुरू करण्यात आले. हे सारे फंडींग पाकिस्तान व अरब राष्ट्रांमधून होत आहे, हे स्पष्ट झाले आहे. या षडयंत्राचा भाग म्हणूनच विपूल व कासिफ या दोघांना गाझियाबादच्या डासना देवी मंदिरात पाठविण्यात आले होते. या दोघांचाही देशातील अनेक कट्टरपंथी संघटनांसोबत संबंध असल्याचेही पुढे आले आहे. तपास यंत्रणा त्यांच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न करीत आहेत.
महिलांनाही केले टार्गेट
मुकबधीर विद्यार्थ्यांसोबत महिलांनाही यात टार्गेट केले जात आहे, असे नोएडा पोलिसांनी तपासात सिद्ध केले आहे. विशेषतः चॅरिटेबल ट्रस्ट चालविणाऱ्या संस्थांमधील विद्यार्थ्यांना निशाण्यावर घेतले जाते. त्याअंतर्गतच नोएडा डेफ सोसायटीलाही फंडींग सुरू झाले होते.
देश हादरवून सोडण्याचे षडयंत्र
मुकबधीर विद्यार्थ्यांना ऐकायला येत नाही आणि बोलताही येत नाही, त्यामुळे त्यांना या मिशनमध्ये सामील करण्यात आले. त्यांचे धर्मांतरण केले की आपल्या मूळ धर्माचा ते तिरस्कार करायला लागतात. त्यामुळे त्यांचा वापर करून देश हादरवून सोडण्याचे षडयंत्र रचण्यात आले. विद्यार्थ्यांना मानवी बॉम्बच्या रुपात देशाच्या प्रमुख शहरांमध्ये पाठविण्याची पूर्ण तयारी झाली होती.