नाशिक -कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासन यंत्रणा, आरोग्य यंत्रणेच्या प्रयत्नातून नाशिक विभागात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण दिलासादायक आहे. विभागातून आजपर्यंत ८ लाख ७८ हजार ७३२ रुग्णांपैकी ८ लाख ४८ हजार २९९ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सद्यस्थितीत १७ हजार ९७२ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. आजपर्यंत विभागात १२ हजार ४२५ रुग्णांचा मृत्यु झाला असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.५३ टक्के आहे, तर मृत्युदर १.४१ टक्के इतका आहे. अशी माहिती आरोग्य विभाग नाशिक परिमंडळ कार्यालयाचे आरोग्य उपसंचालक डॉ. पी. डी. गांडाळ यांनी दिली आहे.
नाशिक विभागातून आजपर्यंत लॅबमध्ये ३९ लाख ८७ हजार ८०४ अहवाल पाठविण्यात आले असून त्यापैकी ८ लाख ७८ हजार ७३२ अहवाल पॉझिटीव्ह आले असल्याची माहिती आरोग्य उपसंचालक डॉ. पी. डी. गंडाळ यांनी दिली आहे.
नाशिक जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७ टक्के
नाशिक जिल्ह्यात आजपर्यंत 3 लाख 88 हजार 561 कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून 3 लाख 76 हजार 896 रुग्ण पुर्णपणे बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच 6 हजार 748 रुग्णांवर उपचार सुरु असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.00 टक्के इतके आहे. आजपर्यंत 4 हजार 917 रुग्णांचा मृत्यु झाला असून जिल्ह्याचा मृत्युदर 1.26 टक्के आहे .
अहमदनगर जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.१० टक्के
अहमदनगर जिल्ह्यात आजपर्यंत २ लाख ६७ हजार ८५ कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून २ लाख ५६ हजार ६७५ रुग्ण पुर्णपणे बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच ६ हजार ९६७ कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरु असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.१० टक्के इतका आहे. आजपर्यंत ३ हजार ४४३ रुग्णांचा मृत्यु झाला असून जिल्ह्याचा मृत्युदर १.२८ टक्के आहे.
धुळे जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.२५ टक्के
धुळे जिल्ह्यात आजपर्यंत ४२ हजार २६० कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ४१ हजार १०० रुग्ण पुर्णपणे बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच ४९४ कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरु असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.२५ टक्के इतके आहे. आजपर्यंत ६६६ रुग्णांचा मृत्यु झाला असून जिल्ह्याचा मृत्युदर १.५७ टक्के आहे.
जळगांव जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 95.76 टक्के
जळगांव जिल्ह्यात आजपर्यंत १ लाख ४० हजार ७३५ कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून १ लाख ३४ हजार ७६८ रुग्ण पुर्णपणे बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच ३ हजार ४१५ कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरु असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.७६ टक्के इतका आहे. आजपर्यंत २ हजार ५५० रुग्णांचा मृत्यु झाला असून जिल्ह्याचा मृत्युदर १.८१ टक्के आहे.
नंदुरबार जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.९२ टक्के
नंदुरबार जिल्ह्यात आजपर्यंत ४० हजार ९१ कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ३८ हजार ८६० रुग्ण पुर्णपणे बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच ३४८ कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरु असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.९२ टक्के इतके आहे. आजपर्यंत ८४९ रुग्णांचा मृत्यु झाला असून जिल्ह्याचा मृत्युदर २.११ टक्के आहे.
(स्त्रोत: उपसंचालक आरोग्य विभाग नाशिक परिमंडळ कार्यालयाची ५ जून २०२१ रोजीची रात्री १२ पर्यंतची माहिती )