नाशिक- कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासन यंत्रणा, आरोग्य यंत्रणेच्या प्रयत्नातून नाशिक विभागात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण दिलासादायक आहे. विभागातून आजपर्यंत 9 लाख 48 हजार 032 रुग्णांपैकी 9 लाख 21 हजार 847 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सद्यस्थितीत 6 हजार 958 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. आजपर्यंत विभागात 19 हजार 170 रुग्णांचा मृत्यु झाला असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.23 टक्के आहे, तर मृत्युदर 2.02 टक्के इतका आहे. अशी माहिती आरोग्य विभाग नाशिक परिमंडळ कार्यालयाचे आरोग्य उपसंचालक डॉ. पी. डी. गांडाळ यांनी दिली आहे. नाशिक विभागातून आजपर्यंत लॅबमध्ये 59 लाख 99 हजार 685 अहवाल पाठविण्यात आले असून त्यापैकी 9 लाख 48 हजार 32 अहवाल पॉझिटीव्ह आले असल्याची माहिती आरोग्य उपसंचालक डॉ. पी. डी. गंडाळ यांनी दिली आहे.
नाशिक जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.63 टक्के
नाशिक जिल्ह्यात आजपर्यंत 4 लाख 04 हजार 405 कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून 3 लाख 94 हजार 826 रुग्ण पुर्णपणे बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच 1 हजार 022 रुग्णांवर उपचार सुरु असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.63 टक्के इतके आहे. आजपर्यंत 8 हजार 557 रुग्णांचा मृत्यु झाला असून जिल्ह्याचा मृत्युदर 2.11 टक्के आहे .
अहमदनगर जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.08 टक्के
अहमदनगर जिल्ह्यात आजपर्यंत 3 लाख 14 हजार 759 कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून 3 लाख 02 हजार 440 रुग्ण पुर्णपणे बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच 5 हजार 899 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरु असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.08 टक्के इतका आहे. आजपर्यंत 6 हजार 420 रुग्णांचा मृत्यु झाला असून जिल्ह्याचा मृत्युदर 2.03 टक्के आहे.
धुळे जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.41 टक्के
धुळे जिल्ह्यात आजपर्यंत 45 हजार 848 कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून 45 हजार 123 रुग्ण पुर्णपणे बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच 05 कोरोनाबाधित रुग्ण उपचार सुरु असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.41 टक्के इतके आहे. आजपर्यंत 668 रुग्णांचा मृत्यु झाला असून जिल्ह्याचा मृत्युदर 1.45 टक्के आहे.
जळगांव जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.17 टक्के
जळगांव जिल्ह्यात आजपर्यंत 1 लाख 42 हजार 675 कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून 1 लाख 40 हजार 66 रुग्ण पुर्णपणे बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच 32 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरु असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.17 टक्के इतका आहे. आजपर्यंत 2 हजार 575 रुग्णांचा मृत्यु झाला असून जिल्ह्याचा मृत्युदर 1.80 टक्के आहे.
नंदुरबार जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.63 टक्के
नंदुरबार जिल्ह्यात आजपर्यंत 40 हजार 345 कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून 39 हजार 392 रुग्ण पुर्णपणे बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच नंदुरबार जिल्ह्यात एकही कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरु नसून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.63 टक्के इतके आहे. आजपर्यंत 950 रुग्णांचा मृत्यु झाला असून जिल्ह्याचा मृत्युदर 2.35 टक्के आहे.
(स्त्रोत: उपसंचालक आरोग्य विभाग नाशिक परिमंडळ कार्यालयाची दि. 19 ऑगस्ट 2021 रोजीची रात्री 12.00 पर्यंतची माहिती )