इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – छोट्या पडद्यावरील कलाकार हे चाहत्यांमध्ये लोकप्रिय असतात. त्यामुळेच त्यांच्या सगळ्याच छोट्या – मोठ्या गोष्टी चाहत्यांच्या लक्षात असतात. कलाकारांचा वाढदिवस हा त्यांच्यासाठी सोहोळा असतो. छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री रश्मी देसाई हिने दोन दिवसांपूर्वीच म्हणजे १३ फेब्रुवारी रोजी ३७ वा वाढदिवस साजरा केला. मात्र, तिच्या कामापेक्षा तिच्या लव्ह लाईफमुळे ती अधिक चर्चेत आली. आपला अभिनय आणि सौंदर्यामुळे रश्मी चर्चेत असते. छोट्या पडद्यावरील ‘उतरन’ आणि ‘दिल से दिल तक’ मालिकेमुळे रश्मीला प्रसिद्धी मिळाली.
रश्मी देसाईचा जन्म १३ फेब्रुवारी १९८६ रोजी आसाममध्ये झाला. वयाच्या १६ व्या वर्षी तिने अभिनय क्षेत्रात प्रवेश केला. २००६ मध्ये ‘रावण’ या मालिकेतून रश्मीने करिअरची सुरुवात केली असली तरी खरी ओळख ‘उतरन’ या मालिकेतून मिळाली. अभिनेता सिद्धार्थ शुक्लासोबतच्या ‘दिल से दिल तक’ मालिकेतील तिचा अभिनय प्रेक्षकांना विशेष भावला. याशिवाय रश्मीने हिंदी, भोजपुरी, इंग्रजी आणि गुजराती चित्रपटांमध्येही अभिनय केला आहे.
अभिनयासोबतच रश्मी तिच्या लव्ह लाईफमुळे अनेकदा चर्चेत आली. अभिनेता नंदिश संधूसोबत तिचं पहिल्यांदा नाव जोडलं गेलं. ‘उतरन’च्या सेटवर काम करत असताना या दोघांची मैत्री झाली आणि नंतर त्याचं रुपांतर प्रेमात झालं. रश्मी देसाई आणि नंदिश यांनी २०१२ रोजी लग्न केलं. मात्र, अवघ्या चार वर्षांतच त्यांचा घटस्फोट झाला. यानंतर रश्मीचं नाव लक्ष्य लालवानीसोबत जोडलं गेलं. मीडिया रिपोर्टनुसार, रश्मी तिच्यापेक्षा १० वर्षांनी लहान असलेल्या लक्ष्यासोबत रिलेशनशिपमध्ये होती. मात्र, रश्मीच्या घरून या नात्याला परवानगी नसल्याने हे नात पुढे टिकलं नाही.
रश्मीचं लव्ह लाईफ इथेच थांबत नाही. तर या दोघांनंतर रश्मीचं नाव अभिनेता सिद्धार्थ शुक्लासोबतही जोडले गेलं. ‘दिल से दिल तक’ या मालिकेदरम्यान सिद्धार्थ शुक्ला आणि रश्मी देसाई यांच्यात जवळीक वाढल्याची चर्चा होती. त्यानंतर रश्मीचं अरहान खानवर प्रेम जडलं. ‘बिग बॉस’ मध्ये ते एकमेकांना भेटले. पण हे नातं फार काळ टिकू शकलं नाही.
Utran Fame Actress Rashmi Desai Life Journey