पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – असे म्हणतात की, आजच्या काळात कार घेणे जितके सोपे आहे, तितकेच कारमध्ये इंधन भरणे कठीण बनले आहे. कारण आजच्या सध्याच्या काळात इंधनाचे दर गगनाला भिडले आहेत. परंतु त्याही परिस्थितीत आपल्याला कारचे मायलेज वाढवायची असेल तर या करिता काही उपाययोजना करणे आवश्यक ठरते.
सध्या आपल्या देशात इलेक्ट्रिक आणि सीएनजी वाहनांची मागणी वाढत असली तरी, तरीही मोठ्या संख्येने नागरिक पेट्रोल आणि डिझेलची वाहने वापरत आहेत. मात्र कार जुनी झाली की, बहुतेक जण तक्रार करतात की त्यांच्या कारचे मायलेज कमी झाले आहे. त्याच वेळी 5 सोप्या टिप्स जाणून घेऊन तुमच्या वाहनाचे मायलेज मोठ्या प्रमाणात वाढवू शकता.
1) ज्या कारची सर्व्हिस सातत्याने वेळेवर असते, तिला सर्व्हिस नसलेल्या कारपेक्षा 40 टक्के कमी इंधन लागते. जेव्हा इंजिन ऑइल कमी होते किंवा फिल्टर मध्ये काही अडकलेले असते तेव्हा इंधनाचा वापर वाढतो. एवढेच नाही तर तुमच्या टायरला योग्य दाब नसला तरीही तुमची कार जास्त इंधनाचा वापर करेल. सर्व्हिसिंग दरम्यान या सर्व गोष्टी दुरुस्त केल्या जातात.
2) एका अहवालानुसार, तुमची कार रस्त्यावर सुरू होत असली आणि जास्त चालत नसली तरी ती प्रति तास 3 लीटर इंधन वापरते. त्यामुळे ट्रॅफिक किंवा सिग्नल लाईट इत्यादी ठिकाणी 10 सेकंदांपेक्षा जास्त वेळ थांबल्यास अशा स्थितीत वाहन थांबवावे किंवा बंद करावे. अनेक नवीन वाहनांमध्ये हे कार्य आता आपोआप होते, ज्यामुळे मायलेज वाढण्यास मदत होते.
3) एका आकडेवारीनुसार, जास्त वेगाने कार चालवल्याने तिचे मायलेज 15 ते 30 टक्क्यांनी कमी होते. आपण कार नेहमी योग्य गियरमध्ये आणि सरासरी वेगाने चालवावी. जर हायस्पीड गाठायचा असेल तर हळूहळू वेग एका लयीत वाढवा. ट्रॅफिकमध्ये किंवा ज्या ठिकाणी वारंवार ब्रेक लावावा लागतो, अशा ठिकाणी अतिवेगाने जाण्याचा उपयोग होत नाही.
4) कोणत्याही कार किंवा गाडीत चांगले इंधन भरण्याबरोबरच किमान किती इंधन भरले पाहिजे हेही आपल्याला कळले पाहिजे. कारमध्ये नेहमी एक चतुर्थांश अधिक तेल असण्याचा प्रयत्न करा. मात्र इंधन कमी असेल तर इंजिनला अधिक ताण सहन करावा लागेल, ज्यामुळे मायलेज कमी होईल.
5) कधीही कारमध्ये जास्त सामान भरणे टाळा. कधी-कधी लांबच्या प्रवासाला जाताना आमची गाडी ओव्हरलोड होत असते, अशावेळी तुमच्या कारचे मायलेज कमी होते. अवजड मालाचा थेट परिणाम इंजिनवर होतो. त्यामुळे वारंवार असे करणे टाळावे. अनावश्यक वजनाच्या वस्तूही गाडीतून काढून टाकल्या पाहिजेत.