पुणे – गेल्या दोन वर्षांपासून जगभरात पसरलेल्या कोरोनाचा धोका आता पुन्हा एकदा वाढू लागला असून अनेक देशांनी या संदर्भात निर्बंध आणि नियम लागू केले आहेत. त्यामुळे नागरिकांच्या तोंडावर पुन्हा एकदा दिसू लागले आहेत. परंतु नेमके कोणते आणि कसे मास्क वापरावेत? यासंबंधी माहिती करून घेणे आणि काळजी घेणे आवश्यक आहे. कोरोनाचा धोका पुन्हा वाढू लागला असल्याने बहुतांश डॉक्टर व आरोग्य तज्ज्ञांच्या मते, मास्कपेक्षा चांगले काहीही नाही. परंतु, काही लोक कापडी मास्क (मुखवटे) पुन्हा-पुन्हा वापरतात आणि ते घाण झाल्यानंतरही तसेच ठेवतात. अशा मास्कमुळे ब्लॅक फंगस तसेच इतर रोग होण्याचा धोका वाढतो.
१) एकच मास्क जास्त वेळ घालणे टाळावे. ज्या रुग्णांची प्रतिकारशक्ती कमी आहे, त्यांनी अधिक काळजी घेणे आवश्यक आहे.
घाणेरड्या कापडाच्या मास्कचा एकाधिक आणि दीर्घकाळ वापर केल्याने म्यूकोर्मायकोसिसचा धोका वाढू शकतो.
२) आवश्यक असल्यास, कापडाच्या मास्कखाली सर्जिकल मास्क घाला किंवा स्वच्छ कापडाचा मास्क घाला.
जर तुम्ही कपड्याचा मास्क वारंवार धुतल्यानंतर घातला असाल तर त्याखाली सर्जिकल मास्क ठेवा आणि हा मास्कही सहा तासांत बदला.
३) विशेष म्हणजे N95 मास्क सर्वोत्तम संरक्षण प्रदान करतो. कोरोनाविरोधात मास्क किती सुरक्षित आहे हे जाणून घेण्यासाठी काही देशांमध्ये नुकतेच एक संशोधन करण्यात आले. या संशोधनाचा अहवाल इनोव्हेशन फॉर पॉवर्टी ॲक्शनमध्ये प्रकाशित करण्यात आला आहे.
४) सर्जिकल मास्कमुळे संसर्गाचे प्रमाण आधीपेक्षा ९.३ टक्क्यांनी घटले. सर्जिकल मास्कने नागरिकांना ११ टक्के अधिक सुरक्षा दिल्याचे दिसून आले. त्रिस्तरीय पॉली प्रोपाईलीनमुळे सर्जिकल मास्कची हवा गाळण्याची क्षमता (फिल्ट्रेशन एफिशियंसी) ९५ टक्के असल्याचे आढळून आले.
५) सुमारे १२ ते ६० वर्षांपेक्षा अधिक वयांच्या व्यक्तींमध्ये या मास्कमुळे ३५ टक्के संसर्ग रोखण्यात यश मिळाले. सर्जिकल मास्क वापरण्यासाठी अधिक आरामदायक असतात. उष्ण तसेच दमट वातावरणात राहणाऱ्या नागरिकांसाठी हे अधिक आरामदायी असल्याचे दिसून आले. हे मास्क बनवण्यासाठी कापडी मास्कच्या तुलनेत एक चतुर्थांश खर्च येतो, असे यात म्हटले आहे.
७) कोरोनाने संपूर्ण जगाला विळखा घातला आहे. आता तर ओमिक्रॉनमुळे प्रगत देश कोरोनापुढे हतबल झाले आहेत. रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे अनेक देशांमध्ये गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मास्क, सोशल डिस्टंसिंग, होम क्वारंटाईल, आयसोलेशनच्या माध्यमातून योग्य ती काळजी घेण्यात येत आहे.