नवी दिल्ली – मुळ भारतीय वंशाच्या अमेरिकन निवासी नीरा टंडन यांची राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या स्टाफ सेक्रेटरी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. नीरा टंडन या पदावर असणार्या पहिल्या भारतीय-अमेरिकन असतील. याआधी मे महिन्यात नीरा यांची बायडेन यांच्या वरिष्ठ सल्लागारपदी नियुक्ती करण्यात आली होती. आता अमेरिकेचे अध्यक्ष यांच्या सर्व कागदपत्रांवर नीरा यांचे नियंत्रण तथा देखरेख असेल.
भारतीय – अमेरिकन नीरा टंडन यांच्यासाठी ही मोठी सध्या आहे. व्हाईट हाऊसमध्ये स्टाफ सेक्रेटरी हे सन्माननीय स्थान मानले जाते. टंडन या व्हाईट हाऊसचे वरिष्ठ सल्लागारपदावरही कायम राहतील, त्यांनी राष्ट्रपतींना अनेक मुद्द्यांवर सल्ला दिला आहे. त्या आता व्हाईट हाऊसचे चीफ ऑफ स्टाफ रोनाल्ड क्लेन यांना अहवाल देतील.
अध्यक्ष बायडेन यांनी गेल्या वर्षी नीरा टंडन यांना अर्थसंकल्प आणि व्यवस्थापन कार्यालयाच्या प्रमुखपदी नामनिर्देशित केले होते, एक हे महत्त्वाचे कॅबिनेट पद आहे. मात्र, काही महिन्यांपूर्वी नीरा टंडन यांनी रिपब्लिकन सेनेटरच्या तीव्र विरोधामुळे व्हाईट हाऊस मॅनेजमेंट आणि बजेट ऑफिसच्या संचालक पदासाठीचे नामांकन मागे घेतले. टंडन यापूर्वी अमेरिकेच्या आरोग्य आणि मानवी सेवा मंत्रालयात आरोग्य सुधारणांचे वरिष्ठ सल्लागार होत्या. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या अंतर्गत महत्त्वाच्या कायद्याच्या काही तरतुदींवर त्यांनी अमेरिकन काँग्रेस आणि संबंधितासमवेत काम केले.
याआधी, टंडन यांनी व्हाईट हाऊसमध्ये देशांतर्गत धोरणाचे सहाय्यक संचालक आणि अमेरिकेचे माजी अध्यक्ष बिल क्लिंटन यांच्या कार्यकाळात फर्स्ट लेडीचे वरिष्ठ धोरण सल्लागार म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. विशेष म्हणजे टंडन यांनी कॅलिफोर्निया विद्यापीठातून बीएससी तर येल लॉ स्कूलमधून कायद्याची पदवी घेतली आहे. देशाच्या माजी परराष्ट्र सचिव हिलरी क्लिंटन यांच्या अध्यक्षीय मोहिमेचे धोरण संचालक म्हणूनही त्यांनी काम केले.